आपण स्वतः एक अव्वल दर्जाची कवयित्री आहात . मला स्तुतीला रिऍक्ट होता येत नाही त्यामुळे काय लिहू ? धन्यवाद !
Tuesday, December 27, 2016
Monday, December 26, 2016
WHY SPIRITUAL SOCIOLOGY IS NEEDED IN INDIA? SHRIDHAR TILVE NAIK
Spiritual sociology is the branch of sociology which underlines enlightenment or nirban /nirvan or moksha or salvation as an aim of each and every member of society and study SOCIAL as necessary evil which must be annihilated by every sadhak for his OR her MOKSHA. Without spiritual all social is bullshit because all spiritual values are the basic and necessary values for each and every society. These 12 values are spiritual necessities and without them attaining of divine is impossible. Naturally they provide the basic value-system and ethics to all societies. These values are not social but spiritual and many times self-evidental as they are irrational and unscientific.
These prime 12 spiritual values are
1 AKAM
2 AKAL
3 APARIGRAH
4 AAWKASH
5 ACHORY
6 AHINSA
7 ASAMBANDH
8 AVYASAN
9 ASTEY
10 ARANJAN
11 APRAMAD
12 A-AHANTA
As Indian society is consistently proving itself as spiritual society we have to develop spiritual sociology to understand Indian Society.

Saturday, October 8, 2016
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
आद्य शंकराचार्यांच्यावर लिहितांना मी नेहमीच अवघडतो कारण ते आणि नित्शे माझे आवडते शत्रू आहेत . दोघांच्याही प्रखर बुद्धिमत्तेने आणि काव्यात्मक प्रतिभेने मी दिपून जातो आणि त्यांच्या मांडणीने जे जन्माला घातले त्याने हळहळतो आणि संतापतोही . माझ्यासाठी शंकराचार्यांना समजून घेण्याचा अर्थ हिंदू धर्म समजून घेणे असा आहे . त्यामुळे शंकराचार्यांना गेली ३० वर्षे पुन्हा पुन्हा वाचतो आहे . हिंदू धर्म हा वैदिक धर्म आहे ह्या गैरसमजुतीपोटी अनेक लोक वेद वाचून स्मृती वाचून हिंदू धर्माविषयी आपली मते पक्की करत असतात प्रत्यक्षात हा धर्म शंकराचार्यांनी जन्माला घातला आहे .
हिंदू धर्म कुणी स्थापन केला हा नेहमीच कळीचा प्रश्न राहिला आहे . ह्या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर आद्य शंकराचार्यांनी असे आहे शंकराचार्यांच्या आधी वैदिक , ब्राह्मणी आणि व्यास वाल्मिकींनी स्थापन केलेला वैष्णव धर्म हा प्रचलित झाला होता आणि शैव , बौद्ध आणि जैन हे धम्म आधीपासूनच होते . ७ व्या ८व्या शतकात ह्यांच्यातील संघर्ष कळसाला पोहचला होता तंत्राने हे सर्वच आगम काळवंडायला सुरवात झाली होती आणि तंत्रसाधनेच्या नावाने स्वैराचार माजला होता सर्वत्र एक केऑस होता आणि ह्या केऑसात आणि केऑटिक पार्श्वभूमीवर शंकराचार्यांचा जन्म झाला . त्यांनी हिंदू धर्माची स्थापना का व कशी केली हे पाहायचे असेल तर त्यांच्या आयुष्यातील सर्वच अवस्थांचा विचार करावा लागेल
शैव धम्मीय अवस्था :
शंकराचार्यांच्या पूर्वी शैव धम्माची एक शिवसूत्र शाखा ही पूर्णपणे वैदिकांनी ताब्यात घेतली होती आणि तिचे रूपांतर वैष्णव शाखेत केले होते मूळ शिवांनी सांगितलेली शिवसूत्रे ब्रह्मसूत्रे म्हणून प्रचलित झाली होती ह्या ब्रह्मसूत्रांचे अर्थनिर्णयन कसे करायचे हा एक मोठाच प्रश्न निर्माण झाला होता . ह्या प्रश्नाने पछाडलेला एक ब्राह्मण होता त्याचे नाव गोविंद सगळ्याच संन्यासांची असते तशी ह्याचीही आयुष्यकथा विलक्षण होती
नकुलीशांचे दोन शिष्य एक लकुलीश जे गुजरातमध्ये गेले तर दुसरे पतंजली जे दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू केरळात आले त्यांचा एक शिष्य पाणिनी त्याच्या शिष्य परंपरेत गौडपादाचार्य हे होते ह्यांचा परमशिष्य गोविंद होता ही शैव ब्राह्मणांची परंपरा असल्याने त्यांच्या चार बायका होत्या ह्या शासक , व्यापारी आणि दास ह्या तीन समुदायातून आलेल्या होत्या आणि चौघींना एक एक पुत्र झाल्यावर ह्यांनी संन्यास घेतला होता .
इकडे शंकराचार्यांचा जन्म एका शैव घराण्यात झाला वडील शिवगुरू हे कालटी गावातील भगवती देवीच्या मंदिराचे पूजारी होते आणि शिवभक्तही होते आईचे नाव उपलब्ध नाही वैदिक तिला आर्याबा म्हणतात पण हे खरे नाव न्हवे . शंकराचार्यांचा जन्मच शंकराला नवस बोलून झाल्याने त्यांचे नाव शंकर ठेवण्यात आले होते . शिवगुरू हे शैवाचार्य असल्याने त्यांना सर्वच दर्शनशास्त्रांचा अभ्यास कम्पलसरी होता त्यांनी शंकराचार्यांना लहानपणापासूनच दर्शने शिकवायला सुरवात केली आणि तल्लख बुध्धीच्या ह्या बालकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच ती आत्मसात केली
शिकलेली दर्शने आणि भोवतालचा समाज ह्यांच्यात मेळ बसेना हा गोंधळ दूर करण्यासाठी ते गुरु शोधत गोविंदांच्या पाशी पोहचले ही पहिली भेट विलक्षण होती त्यांनी ह्या बालकाला तू कोण असे विचारले तर शंकराचार्य म्हणाले
“मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिव्हे न च घ्रार्णनेत्रे । न च व्योम भूमिर्न तेजो न वायुुः
चिदानन्दरूप : शिवोऽहम् शिवोऽहम् ॥”
ना मी बुद्धि ना मन ना अहंकार
ना कानजीभ ना नाकडोळे ना चित्त
ना आकाश ना भूमी ना वायू ना तेज
चिदानंद मी शिव शिव शिव
इथपर्यंत शंकराचार्य शैवच होते वर्णजातीपातीवर त्यांचा विश्वास न्हवता
गोविंदाचार्य हे वेदांती शैव होते ह्या शाखेची श्रद्धा अशी कि ब्रह्मसूत्रे भगवान शिवांनी सांगितली ह्यांना असा स्वप्नभास झाला होता कि खुद्द व्यास स्वप्नात त्यांना सांगत आहेत कि तुझ्याकडे साक्षात शिव अवतार घेऊन येणार आहे तू ह्या अवताराचा गुरु बन हा अवतार ब्रह्मसूत्रांचा नवा मांडणंअविष्कार करणार आहे '' शंकराचार्यांच्या उत्तराने त्यांना वाटले कि हाच तो शिवाचा अवतार . त्यांनी ताबडतोब त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि इथून शंकराचार्य शैव वेदांती बनणे सुरु झाले .
शैव वेदांती अवस्था
खुद्द शंकराचार्य शैव आणि त्यांचे गुरु गोविंद शैव वेदांती ह्यांच्या संबंधातून एक विलक्षण रसायन तयार होऊ लागले आणि शंकराचार्यांचा योगाभ्यास सुरु झाला ह्याच काळात त्यांनी आपल्या गुरूला उद्देशून लिहलेले स्तोत्र जे वैष्णवांनी श्रीकृष्णाला उद्देशून लिहिले आहे असा अपप्रचार केला आणि ज्यावर ओशोंनी ह्या गैरसमजाच्या आधारे भज गोविंदम मालिकेत व्याख्याने दिली आहेत त्यांनी लिहिले . हे गुरूला पहिले नमन होते . हा गैर समज का पसरु शकला ?
कारण ह्या काळात शंकराचार्यांनी शैव वेदांताचा वाक्यार्थ सिद्धांत स्वीकारला . ह्या सिद्धांतानुसार वाक्याला चार अर्थ असतात
१सरलार्थ
२ भावार्थ
३ ध्वन्यार्थ
४ गर्भितार्थ
शंकराचार्य हे उत्कृष्ट कवी असल्याने त्यांनी ह्या चारही अर्थाचा वापर करून अनेक कविता रचल्या पण त्यातील गर्भितार्थ न कळल्याने अनेकदा अर्थाचा अनर्थ झाला .जसे गोविंद गुरु कृष्णगोविंद झाले . असाच दुसरा अनर्थ गंगास्तोत्रमबाबत झाला . ह्यातला गर्भितार्थ मायेचा चिखल शुद्ध आत्मस्वरूप नदीत बुडवला कि नाहीसा होतो असा होतो त्यामुळेच गंगेला भगवती त्रिभुवनतारिणी भवसागर पार करणारी असे त्यांनी म्हंटले पण त्याने गंगेत डुबक्या मारून पाप नाहीसे होते असा गैरसमज पसरला आणि आजही हिंदू गंगेत आणि इतर नद्यांत डुबक्या मारतच आहेत
शंकराचार्यांनी पुढे ह्या अवस्थेत चारही ब्रह्मवाक्यांचा अनुभव घेतला आणि पंचायतन पूजाही प्रचलित करायला सुरु केली पंचायतन काय होते ? ह्या पांच देवता होत्या आणि ह्यातील कुठल्याही एका देवतेची इष्ट देवता म्हणून निवड करावी असे शंकराचार्यानीं सांगितले ह्या देवताच हिंदू धर्माच्या मुख्य देवता म्हणून आजही प्रचलित आहेत ह्या देवता पुढीलप्रमाणे
१शिव
२पार्वती
३गणेश
४ नारायण
५ सूर्य
ह्यातील
१शिव
२पार्वती
३गणेश
४ सूर्य
ह्या शैव देवता होत्या तर नारायण अर्धी पंचरात्र शैव अर्धी वैष्णव होती
ह्यामागचा उद्देश स्पष्ट होता उच्च्भ्रू वैष्णवांना शैवांच्यात सामावून घेणे पण परिणाम नेमका उलट झाला . शैवांच्यात उच्च्भ्रू वैष्णव सामावून जाण्याऐवजी उच्च्भ्रू वैष्णवांनीच शैवांना गिळंकृत केले उच्च्भ्रू वैष्णवांनी
१शिव
२पार्वती
३गणेश
४ सूर्य
ह्यांना दुय्यम करून नारायण ह्या देवतेची सांगड विष्णूशी घातली आणि कृष्ण व राम ह्यांना त्या विष्णूचे अवतार घोषित केले आणि विष्णूऐवजी नारायणाऐवजी रामकृष्ण पंचायतनात आणले आणि त्यामुळे
१शिव वा शिव अवतार
२पार्वती वा लक्ष्मी वा ह्यांचे अवतार
३गणेश
४ सूर्य
५ नारायण वा विष्णू वा विष्णूचे नऊ अवतार विशेषतः राम व कृष्ण वा ह्या नऊ अवतारांचे अवतार
असे पंचायतन प्रचलित केले जे आज हिंदूंचे प्रचलित पंचायतन आहे
प्रश्न असा कि हा नारायण शंकराचार्यांच्या पंचायतनात आला कुठून ? तो आला होता त्यांच्या गुरुपरंपरेतून
शंकराचार्य < गोविंदपाद < गौडपाद < शुकदेव < व्यास < पराशर < शक्त्तृ < वशिष्ठ < ब्रह्मा < नारायण <
अशी ही गुरुपरंपरा होती आणि ह्या परंपरेचे आद्य गुरु नारायण होते साहजिकच शंकराचार्यांनी आपल्या ह्या आद्य गुरूला पंचायतनात स्थान दिले ह्या गुरु नारायणांचा आणि वेदातील विष्णूचा काडीचाही संबंध न्हवता पण पुढे तो जोडला गेला शंकराचार्य ही शैव धम्मीयांच्या हातून निसटलेली एक फळी होती जिचा पुढे हिंदू धर्म नामक महावृक्ष झाला हे कसे घडले ते पुढील भागात पाहू
शंकराचार्यांनी ह्या काळात रचलेला पहिला ग्रंथ म्हणजे विवेकचूडामणी
ह्याच काळात जेव्हा त्यांना कैवल्य प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी जे पहिले लेखन केले ते पुढीलप्रमाणे
Lyrics of Nirvana/ Atma Shatakam with translation...
Shivoham ! Shivoham ! 1
. Mano BuddhyA-hankara ChittaNi naaham Nacha Shrotra Jihve Na Cha Ghrana Netre Nacha Vyoma Bhoomir Na Tejo Na Vayuh Chidananda Rupah Shivoham! Shivoham!! .
2. Na Cha Prana Sangyo Na Vai Pancha Vayu Na Vaa Sapta dhatur Na Vaa Pancha Koshah Na Vak Pani Padam Na Chopastha Payu Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!.
3. Na Me Dvesha Ragau Na Me Lobha Mohau Mado Naiva Me Naiva Maatsarya Bhavah Na Dharmo Na Chartho Na Kamo Na Mokshah Chidananda Rupah Shivoham! Shivoham!! I
4. Na Punyam Na Papam Na Saukhyam Na Dukham Na Mantro Na Teertham Na Veda Na Yajnaha Aham Bhojanam Naiva Bhojyam Na Bhokta Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!.
5. Na Me Mrityu Shanka Na Me Jati Bhedah Pita Naiva Me Naiva Mata Na Janma Na Bandhur Na Mitram Gurur Naiva Shishyah Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!
6. Aham Nirvikalpo Nirakaara Roopah Vibhur Vyapya Sarvatra Sarvendriyanaam Sada Me Samatvam Na Mukthir Na Bandhah, Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!
मागच्या वेळी मी एक प्रश्न विचारला होता कि निर्वाणप्राप्ती झाली तेव्हाही शंकराचार्य शैवच होते मग पुढे असे काय झाले कि ते वैदिकांना जाऊन मिळाले ?
ह्या प्रश्नाचे उत्तर तात्कालीन परिस्थितीत आहे गुरूला समर्पण म्हणून विवेकचूडामणी त्यांनी लिहिला खरा पण त्यांच्या गुरूच्या आदेशावरून त्यांनी जेव्हा प्रस्थान त्रयी वर भाष्य लिहिण्यासाठी देशाटन सुरु केले तेव्हा त्यांना दिसला तो मतांचा गलबलाट आणि शैव , जैन , बौद्ध ह्या धम्मात आणि वैदिक , सनातन आणि वैष्णव धर्मात ह्यांच्यात पसरलेले प्रचंड पाखंड आणि कर्मकांड ह्या काळात शंकराचार्य सामान्य माणसांशी संवाद साधत होते आणि साध्या भाषेत शास्त्रार्थ समजावून सांगत होते ह्यातून त्यांच्या मनात एक द्विस्तरीय धर्माची सरंचना आकार घ्यायला लागली
१ सामान्यजन धर्मस्तर
२ विद्वानजन धर्मस्तर
गौतम बुध्दाने जसा कर्मकांडाविरुद्ध थेट उठाव केला तसा त्यांनी करायला हवा होता किंवा सरळ शून्यापासून सुरवात करून त्यांनी नवा धर्म स्थापन करायला हवा होता पण त्यांचा पिंड क्रांतिकारकांचा न्हवता ज्या गुरुशिष्य परंपरेत ते वाढले होते तिथे गुरूचा सन्मान आणि पूजन फार महत्वाचे होते त्यामुळे शिस्त तर आणायला हवी पण परंपरा मोडीत न काढता असा काहीसा हा व्यूह होता त्यातच ते फक्त ज्ञानयोगी न्हवते तर कवीही होते त्यामुळे कुठल्याही मंदिरात ते गेले कि त्यांना कविता सुचायच्या त्यामुळेच आपल्या पांडुरंगापासून ते अन्नपूर्णेपर्यंत त्यांनी सर्वांच्यावर कविता रचल्या रादर त्यांना त्या स्फुरल्या ज्या माणसाच्या तोंडून निर्वाणप्राप्तीनंतर उपदेश न येता कविता येते तो माणूस हाडाचाच कवी असला पाहिजे पण कवींचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे प्रतिभावंत कवी सर्वसाधारणपणे सर्वसमावेशक असतात अनुभव आणि भवताल शोषून घेणे ही त्यांची वृत्ती असते शंकराचार्य ह्याला अपवाद न्हवते फक्त ह्या धार्मिक अराजकाचे काय करायचे हे त्यांना सूचत न्हवते त्यावेळी संपूर्ण भारतात तेच एक असे होते ज्यांना निर्वाणप्राप्ती झाली होती आणि ज्यांच्यावर नवीन धर्म निर्माण करायची जबाबदारी येऊन पडली ते ज्या तामिळ केरळात वाढले होते तिथे वैष्णव ब्राह्मण अक्षरशः हैवान बनले होते विशेषतः केरळातील नंबुदुरींनी परशुराम ह्या विष्णूच्या अवताराने सर्व क्षत्रिय कापल्याने ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरलेत असा स्टान्स घेतला होता इतकेच न्हवे तर ते सर्वच ब्राह्मणेतरांना अस्पृश्य मानत होते ह्यांची मजल इथवर गेली कि नायर ह्या क्षत्रिय जमातीतील स्त्रीशी संबंधन प्रथेच्या नावाने ते संबंध ठेवत किंबहुना हा हक्क मानत आणि त्याद्वारे निर्माण झालेल्या पुरुषांचा वापर मिलिटरी म्हणून योद्धे म्हणून करत जर क्षत्रियांचीच ही अवस्था तर बाकीच्यांची काय ह्याची आपण कल्पना करू शकतो अशा वातावरणात वाढलेल्या शंकराचार्यांना उत्तरेकडचा चातुर्वर्ण्य हा सौम्यच वाटला असणार अशावेळी खरेतर चातुर्वर्ण्य त्यांनी भिरकावून द्यायला हवा होता पण नेमकी ह्याचवेळी त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जीचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला . ही घटना कुठल्याही निर्वाण प्राप्त झालेल्या माणसाच्या आयुष्यात घडली न्हवती .
शंकराचार्यांना जेव्हा कळाले कि त्यांची आई शेवटच्या घटका मोजतीये तेव्हा ते त्वरित आईला भेटायला गेले .
आई फक्त त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होती . तिने त्यांना जवळ घेतले आणि अद्वैत म्हणजे काय ते मला मरण्यापूर्वी तुझ्याकडून समजून घ्यायचे आहे असे सांगितले . आपल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या आईला शंकराचार्यांनी तिचे डोके मांडीवर घेऊन अद्वैत समजावून सांगितले पण आईला फक्त ज्ञान नको होते . तिला प्रचिती हवी होती . तिच्या आग्रहापुढे शंकराचार्य झुकले आणि त्यांच्या आयुष्यातील पहिला शक्तिपात त्यांनी केला . त्याने आई मुक्त झाली आणि मरण पावली . ह्याही अवस्थेत शंकराचार्यांच्या तोंडून बाहेर पडली ती कविताच !
मृत्यू झाल्यानंतर शव कुणी जाळायचे असा प्रश्न निर्माण झाला . वैष्णव परंपरेनुसार संन्याशाने संन्यास घेतला कि त्याचा घरातल्या कुठल्याच गोष्टीवर अधिकार रहात नाही आणि त्यात आई आणि वडिलांचे प्रेतही येते . त्यामुळे गावातले वैष्णव ब्राह्मण शंकराचार्यांना प्रेताला हात लावू देईनात शैव परंपरेनुसार संन्यासानंतरही हा हक्क उरतो त्यामुळे शंकराचार्यांनी मी आईच्या शवाला अग्नी देणार असा स्टान्स घेतला . शेवटी काही झाले तरी त्यांनी आईला तसे वचन दिले होते आणि दोघेही शैव असल्याने वचन देताना घेताना ह्यात काही गैर आहे असे त्यांना वाटले न्हवते पण ह्या स्टान्सचा परिणाम गंभीर झाला ह्या गावात शंकराचार्यांचे एकच घर शैव होते उरलेले वैष्णव होते त्यांनी सरळ सर्व काही आहे तिथे टाकून अंत्यविधीत भाग घ्यायला नकार दिला अशावेळी ब्राह्मणेतर मदत करतील अशी अपेक्षा होती पण तीही पूर्ण झाली नाही आणि मग शंकराचार्यांनी एक निर्णय घेतला आपल्या आईला एकट्याने जाळायचा ! ते मैलभर चालत गेले खरे पण शक्तिपातामुळे आणि वादळी घडामोडीमुळे ते प्रचंड अशक्त झाले होते . त्यांना आईचे शव पेलेना . त्यांनी आईच्या शवाचे तीन तुकडे केले आणि मग ते तीन तुकडे घेऊन ते स्मशानभूमीत गेले . चितेची लाकडे एकट्यानेच कापली रचली . आईच्या शवाचे तीनही तुकडे चितेवर ठेवले आणि भडाग्नी दिला .
ह्या घटनेने शंकराचार्य बदलले .
(पुढचाल )
मुमुक्षूंना नीट मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी प्रस्थानत्रयीवर नव्याने काम केले . शंकराचार्यांच्यापूर्वी बहुतांशी वैदिक आणि सनातनी (ब्राह्मणीधर्माचा पुरस्कार करणारे )ब्राह्मण प्रस्थानत्रयी म्हणजे १चार वेद , २सूत्र -स्मृती आणि ३ आरण्यके असे गणित मांडायचे वैष्णव प्रस्थानत्रयी म्हणजे १ वेदउपनिषदें ,२ ब्रह्मसूत्रे आणि ३ महाभारत महाकाव्य व पुराणे असे गणित मांडायचे आणि हे सारे वाङ्मय महर्षी वेदव्यासांनी लिहिलंय असं मानायचे (पुढे ह्यात रामायण आणि आणखी काही उपनिषद पुराणांची भर पडली ) ह्यातील ब्रह्मसूत्रे ह्या शैवांच्या कारिका होत्या आणि त्या शिवांनी ब्रह्माला सांगितल्या होत्या आणि ब्रह्माने त्या नारायणांना सांगितल्या होत्या त्यांचे प्राचीन नाव ब्रह्मकारिका हे होते ह्या सांख्यकारिका प्रमाणेच कारिका होत्या त्यांचे वैदिकीकरण करतांना वैदिकांनी आणि बादरायणाने त्यांना प्रथम कारिकासुत्र व पुढे सारिकासूत्र हे नाव दिले तर बौद्धानी त्यांना भिख्खुसारिका हे नाव दिले पुढे वैष्णवांनी ह्यांचे श्रेय व्यासांना दिले आणि व्यासांच्याकडून ही सूत्रे बादरायणला मिळाली अशी मांडणी केली . हा बादरायण संबंध पुढे चांगलाच प्रस्थापित झाला . आणि वैष्णवांच्यात ती प्रस्थानत्रयीचा भाग म्हणून स्थिर झाली मीमांसकांचा ह्या वैष्णव प्रस्थानत्रयीपेक्षा सनातन कर्मठ प्रस्थानत्रयीवर जास्त विश्वास होता साहजिकच नवी प्रस्थानत्रयी प्रस्थापित करण्यासाठी मीमांसकाचा पाडाव आवश्यक होता . शंकराचार्यांनी तो केला पण त्यांनी सनातन आणि वैष्णव अशा दोन्ही प्रस्थापित प्रस्थानत्रयी बाजूला सारल्या आणि नवी प्रस्थानत्रयी शोधायला प्रारंभ केला . त्यांना ज्ञानयोगी म्हणून पुराणे आणि महाकाव्ये अमान्य होती पण जनतेपर्यन्त पोहचण्यासाठी त्यांना ती आवश्यक वाटत होती . त्यासाठी त्यांनी महाभारतातील मूळ गीतेत बदल केले आणि नवी गीता लिहिली जिला आज आपण भगवद्गीता म्हणतो . महाभारतात ती ताबडतोब समाविष्ट झाली हा त्यांचा मोठा विजय होता . ह्यातून एक नवी प्रस्थानत्रयी उदयाला आली ती म्हणजे उपनिषदे , ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता ! ही प्रस्थानत्रयी आजच्या हिंदुधर्माचा गाभा आहे आणि कोर्टात भगवद्गीता हाच हिंदूंचा धर्मग्रंथ मानला जातो . हे करतांना त्यांनी वेद , पुराणे , स्मृती , आरण्यके , सूत्रे ह्या सर्वांना धार्मिक उपग्रंथ म्हणून मान्यता देऊन वैदिक आणि सनातनांना आपल्या मांडणीत सामावून घेतले आपण जर बारकाईने पाहिले तर एक गोष्ट सहज लक्ष्यात येईल ती म्हणजे ब्रह्मसूत्रे आणि गीता जी मुळात गीतोपनिषद ह्या नावाचे उपनिषदच आहे ही उपनिषदांचीच सारे आहेत म्हणजे एका अर्थाने हिंदुधर्म हा ब्रह्मधर्म आहे उपनिषदधर्म आहे
शंकराचार्यांनी जे काही मांडले त्यातील सर्वात क्रांतिकारक सिद्धांत होता ''ब्रह्म सत्य जगत मिथ्या '' दुर्देवाने नंतर शैव ज्ञान झोपी गेल्याने आणि शैवांच्यात शैवाचार्य औषधालाही शिल्लक न उरल्याने मिथ्या हा शब्द शैव अर्थाने वापरला आहे हेच अनेकांच्या लक्षात आलेले नाही . मिथ्थ्याचा शैव अर्थ आहे ''जे मितींनी बद्ध झाले आहे ते '' नकुलीश दर्शनाचा आचार्य म्हणून सांगतो कि शैव पांच मित्या मानतात . लांबी , रुंदी , उंची , काळ आणि दिशा ! एकेकाळी न्यूटनीय विज्ञान फक्त लांबी रुंदी उंची अश्या तीनच मित्या मानत होते पुढे आईन्स्टाईनने काळ हीही मिती आहे हे सिद्ध केले आज ना उद्या विज्ञान ''दिशा'' हीही मिती म्हणून मान्य करेल असा माझा विश्वास आहे . किंबहुना दिशेशिवाय सिमेट्री अशक्य आहे आणि दिशा बदलली कि सिमेट्री बदलते आणि सिमेट्री बदलली कि दिशा बदलते . असो . शंकराचार्यांना म्हणायचे होते ते असे कि ब्रह्म हे मितिशून्य सत्य असून जग हे मितीबद्ध आहे म्हणजे लांबी , रुंदी , उंची , काळ आणि दिशा ह्या पांच मितींनी बद्ध आहे .
दुर्देवाने मीमांसकांनी पुन्हा एकदा डोके गुडघ्यात आणून हे मिथ्थ्या जग परलोकात न्हेले आणि अजूनही हिंदूंच्यात ते मित्यात परतलेले नाही . दिशा ही मिती चुकल्याचा हा असाही परिणाम !
शंकराचार्यांनी जी मांडणी केली ती पुढीलप्रमाणे
१ ब्रह्म हे मूळ आहे अविनाशी अनादी आहे अनंत आहे हे ब्रह्म म्हणजे ईश्वर नाही मात्र ते सगुण आहे आणि अंतिमतः निर्गुण आहे .
२ शरीर विनाशी आहे त्यामुळे त्यात माणसाने अडकू नये आपले आत्मस्वरूप हे ब्रह्म आहे हे त्याने ओळखावे
३ आत्मा ब्रह्मस्वरूप आणि अविनाशी आहे तोच पुनर्जन्म घेतो आणि संसाराच्या भवपाशात अडकतो पण चार मार्गांनी मनुष्य ह्या संसारातून मोक्ष प्राप्त करू शकतो
४ ब्रह्मप्राप्तीचे राजयोग , ज्ञानयोग , कर्मयोग आणि भक्तियोग असे चार मार्ग आहे ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे ज्याने त्याने मार्ग निवडावा बुद्धिमान आणि तर्काने जाणाऱ्या माणसाने ज्ञानयोग निवडावा
५ सर्वसामान्य लोकांसाठी भक्तिमार्ग हाच योग्य आणि सोपा मार्ग आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पुराणे आणि महाकाव्ये ही योग्य आहेत पुराणातील आणि महाकाव्यातील कथा कपोलकल्पित आणि तर्काला धरून नसल्यातरी त्यांच्यात कुठले ना कुठले धर्मतत्व असल्याने त्यांच्यावर टीका करू नये त्यांचा वापर त्यांना वेदांत समजावून सांगण्यासाठी करावा .
शंकराचार्यांची ही मांडणी हीच आजच्या निगम हिंदूंची मांडणी आहे
त्यांच्या ह्या मांडणीत भक्ती आणि भक्त ह्यांना खूप महत्व होते त्यामळे ह्यानंतर प्रश्न होता ३३ कोटी देवदेवता मानणाऱ्या भक्तीवादी लोकांच्या दैवतशास्त्रात सुधारणा कशी करायची हा ! वैदिक , भक्तीवादी शैव , वैष्णव व सनातन ह्यांना चमत्कार घातल्याशिवाय धार्मिक झोप येत नाही त्यामुळेच शंकराचार्यांच्या चरित्रात ह्या लोकांनी भरपूर चमत्कार घातले आहेत माझा चमत्कारांवर विश्वास नसल्याने मी इथे ते बाजूला सारून विश्लेषण करणार आहे मी मागे म्हंटल्याप्रमाणे शंकराचार्यांनी इष्टदेवता म्हणून
१शिव
२पार्वती
३गणेश
४ नारायण
५ सूर्य
असे पंचायतन आणले . पुढे भैरवनाथांच्या भक्तांची मागणी मान्य करून षडपूजा आणली विष्णू ,
राम , कृष्ण , पांडुरंग अशा अनेक देवतांना उपास्य उपदेवता म्हणून मान्यता दिली ह्याने हिंदुस्तानातील अनेक देवता इष्ट देवतांच्या अवतार होऊन सामावून जाण्याची प्रक्रिया सुरु झाली कृष्णाच्या द्वारकेतच त्यांनी आपला पहिला मठ स्थापन केला . त्यांनी मठ स्थापन केले तशी योग , भोग , मुक्ती ,वर आणि सुमोक्ष ह्या पाच लिंगांचीही स्थापना केली . अर्थात ते मूळचे शैव आहेत हे माहीत असलेल्या काही वैष्णवांनी त्यांना विरोध केला उदाहरणार्थ हरिहरच्या वैष्णव मंदिरात ते शैव आहेत म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला होता पुढे काही काळाने होयसाळांनी इथे हरिहरेश्वर मंदिर बांधले विष्णू पुढे इष्ट देवता म्हणून सामावला गेला आणि हर आणि हरी एकत्र झाले . मीमांसकांच्या यज्ञ संस्कृतीचा पाडाव होऊन पूजा संस्कृती मुख्य संस्कृती म्हणून प्रस्थापित झाली हे कार्य काहीसे ख्रिश्चन धर्माप्रमाणे होते ख्रिश्चन धर्माने जश्या सर्व पेगन देवता गॉड , जिझस , मदर मेरी आणि होली स्पिरिट ह्यांच्यात सामावून घेतल्या त्याप्रमाणे हिंदुस्तानातल्या सर्व देवदेवता शिव पार्वती विष्णू लक्ष्मी गणेश नारायण सूर्य ब्रह्मदेव ह्यांच्यात सामावून घेतल्या गेल्या .
आता प्रश्न उरला होता तो धर्मशास्त्राचा . मी मागेच म्हंटल्याप्रमाणे शैवांना धर्मशास्त्र मान्यच नाही त्यांचा अर्थशास्त्रावर कामशास्त्रांवर आणि मोक्षशास्त्रावर विश्वास आहे आणि राज्य आणि समाज अर्थशास्त्रांनुसार चालला पाहिजे असे ते मानतात आणि अर्थशास्त्र काळानुसार बदलते हाही त्यांचा विश्वास आहे शंकराचार्यांची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्यांना विष्णुगुप्त आणि इतरांचे अर्थशास्त्र माहीतच न्हवते . त्यांचा ह्या अंगाने काही अभ्यासच न्हवता ते कामशास्त्राच्याही विरोधी होते कारण काम आणि तंत्र ह्यांच्यामुळे आपल्या शैव धर्माचा अधःपात झाला असे त्यांना वाटत होते मग उरले काय तर मोक्षशास्त्र आणि वैदिकांचे धर्मशास्त्र . आणि इथेच त्यांनी विचारवंत म्हणून घोडचूक केली त्यांनी हा प्रश्न हातात घ्यायला नकोच होता पण वैदिक , सनातन आणि वैष्णवांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी तो हातात घेतला त्यांनी वैदिकांचे आणि सनातनांचे धर्मशास्त्र स्वीकारले ह्या धर्मशास्त्राचा चातुर्वर्ण्य सिद्धांत स्वीकारला त्यांच्या ह्या निर्णयाने हिंदुस्थानचा इतिहास पूर्ण बदलला ह्या निर्णयाने शंकराचार्य निगमी झाले
. मग आपोआपच ब्राम्हण उच्चंस्थानी आले त्यांनी स्थापन केलेल्या मठांपैकी एकाही मठाचा प्रमुख ब्राह्मणेतर न्हवता . ही वैदिक धर्मशास्त्र स्वीकारल्याची परिणीती होती . हा सामाजिक मूर्खपणा होता . ह्याने त्यांनी स्थापन केलेला हिंदू धर्म कायमचा निगमीं झाला . ह्याचे भारतीय समाजावर भीषण परिणाम झाले .
(पुढचाल )
ब्राह्मणांचे खरे प्रकार दोनच
१ मूळ अथवा शैव ब्राह्मण अथवा आगमी ब्राह्मण
२ निगमीं ब्राह्मण म्हणजेच वैदिक ,सनातन आणि वैष्णव
ह्यातील सनातन ब्राह्मण हा कमालीचा कर्मठ आणि स्मृती उराशी कवटाळून बसणारा ! वैदिक म्हणजे वैदिक सूक्ते लिहणारा जो आता नाहीसा झालाय आणि तिसरा ज्याने शैव धम्म आत घेतला आणि विष्णूच्या साहाय्याने त्याचे सनातनीकरण घडवले .
शंकराचार्यांच्यामुळे शैवांच्यात स्मार्त ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांचा एक नवीनच प्रकार उदयास आला आणि दक्षिणेकडचे अनेक शैव ब्राह्मण स्मार्त ब्राह्मण झाले शंकराचार्य स्वतः शैव ब्राह्मण होते तेच जेव्हा वैदिकांना जाऊन मिळाले तेव्हा त्याचा प्रचंड परिणाम उत्तरेकडील शैव ब्राह्मणांच्यावर झाला आणि अनेक शैव ब्राह्मणांनी स्वतःला वैदिक ब्राह्मण म्हणून घोषित केले .ह्यात आत्ताचे चित्पावन , सारस्वत , देशस्थ , कऱ्हाडे , देवरुखे वैगरे होते चित्पावन आणि कोकणस्थ वैदिक ब्राह्मण ह्यांची सरमिसळ झाली . बाटलेले नेहमीच जास्त कट्टर असतात असे म्हणतात ह्यांच्याबाबत हेच घडले ह्यांनी वैष्णव आणि वैदिकांच्या नादी लागून वर्णजातिव्यवस्थेचे कट्टर समर्थन करायला सुरवात केली आपली आडनावे बदलायला सुरवात केली आणि ती वैदिक याज्ञनिष्ठ केली उदा साने वैगरे शिवशिष्य असलेला योगी परशुराम आणि विष्णूअवतार परशुराम हे एकच झाले शिव आणि महारुद्र एक झाले ही सत्यानाशाची सुरवात होती
खुद्द आचार्यांच्या गावात ज्या नंबुदीरी ब्राह्मणांनी त्यांना आईचे प्रेत जाळू दिले नाही त्यांनी आचार्यांचे आडनाव नंबुदीरी होते असे सांगायला सुरवात केली आणि ज्या श्रीकृष्णाच्या मंदिरात त्यांना प्रवेशही न्हवता ते मंदिर त्यांचे खानदानी मंदिर असल्याचा प्रचारही सुरु केला खुद्द शंकराचार्यांना शिवाचे अवतार मानून त्यांच्या तोंडून निगम धर्माची स्थापना करवली गेली ह्यामुळे शैव धम्म जवळ जवळ १२०० वर्षे केरळात झोपी गेला आणि वैष्णव नाम्बुदरीचे वर्चस्व वाढत जाऊन चातुर्वर्णाचा पगडा केरळात अतोनात वाढला .
शंकराचार्यांना समाजपतित बौद्ध धर्म आणि समाजपतित तंत्र ह्यांचा पाडाव करून नवा धर्म आणायचा होता . खरेतर त्यांनी त्याजागी एक सामाजिक पातळीवर आधिक उन्नत धम्म आणायला हवा होता त्यांची प्रज्ञा निश्चितपणे त्या लायक होती पण त्यांनी त्याजागी आधिक समाजपतित असा चातुर्वर्ण्याने पीडित हिंदू धर्म आणला . हे त्यांनी जाणीवपूर्वक केले नाही पण त्यांच्या हातून हे झाले एरव्ही अद्वैत मांडणाऱ्या शंकराचार्यांनी आयुष्यभर अध्यात्म मोक्ष मुक्ती वेगळी आणि सामाजिक व्यवस्था वेगळी असे द्वैत पाळावे ह्याहून अध्यात्मिक शोकांतिका कुठली ? एका अर्थाने हा जिझस चातुर्वर्ण्याच्या क्रुसावर स्वतःहून क्रुसिफाय झाला
शंकराचार्यांचा मृत्यू आणि त्यांच्यापासून शिकावयाचे धडे
शंकराचार्यांच्या आयुष्यापासून आपण काही धडे निश्चित शिकतो
१ पहिला निर्वाण प्राप्त झाले म्हणून एखाद्या मुक्त पुरुषाला व स्त्रीला समाज आणि विज्ञान ह्यांच्यात गती प्राप्त होईलच असे नाही . ती व्यक्ती समाजशास्त्र वा अर्थशास्त्र वा राज्यशास्त्र ह्याबाबत हिमालयी चूक करू शकते
२ ज्यांना आपण सामावून घेऊ इच्छितो ते सामावले जातीलच असे नाही उलटपक्षी सनातनी असूनही तेच तुम्हाला गिळंकृत करण्याचा प्रयत्नही होऊ शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो
३ राजकीय ताकद सर्वच अध्यात्मिक चळवळी स्वतःसाठी वापरते यादव राजांनी आणि विजयनगरच्या साम्राज्याने शंकराचार्यांना वापरले आणि श्रीकृष्णाच्या द्वारे चातुर्वर्ण्य बळकट करून आपली वंशपरंपरागत सत्ता आधिक बळकट केली
४ प्रत्येकवेळी सभ्यता आणि शास्त्रीयता जिंकेलच असे नाही भक्तीवादी शैवांनी महायान शाखेची स्थापना करून बौद्ध धम्म गिळंकृत केला पुढे वैष्णवांनी शैव धम्म गिळंकृत केला आणि नंतर इस्लामने जगभर विशेषतः उत्तर आशियात पसरलेल्या ७०% शैव आणि वैष्णव अशा दोन्ही प्रकारच्या हिंदू धर्मवासीयांना गिळंकृत करून आपले वर्चस्व स्थापन केले ह्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते धार्मिक वर्चस्वाची लढाई तेच जिंकतात जे राजकीयदृष्टया जास्त सशक्त असतात अध्यात्मिक दृष्टया सशक्त असणारे लोक राजकीय पातळीवर कमजोर असतील तर हमखास हरतात ईश्वर राजकीय पातळीवर अध्यात्माला मदत करत नाही हेच खरे किंवा ईश्वर अस्तित्वात नाही हे आधिक खरे !
( इतिश्री )
शैव धम्मीय अवस्था :
शंकराचार्यांच्या पूर्वी शैव धम्माची एक शिवसूत्र शाखा ही पूर्णपणे वैदिकांनी ताब्यात घेतली होती आणि तिचे रूपांतर वैष्णव शाखेत केले होते मूळ शिवांनी सांगितलेली शिवसूत्रे ब्रह्मसूत्रे म्हणून प्रचलित झाली होती ह्या ब्रह्मसूत्रांचे अर्थनिर्णयन कसे करायचे हा एक मोठाच प्रश्न निर्माण झाला होता . ह्या प्रश्नाने पछाडलेला एक ब्राह्मण होता त्याचे नाव गोविंद सगळ्याच संन्यासांची असते तशी ह्याचीही आयुष्यकथा विलक्षण होती
नकुलीशांचे दोन शिष्य एक लकुलीश जे गुजरातमध्ये गेले तर दुसरे पतंजली जे दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू केरळात आले त्यांचा एक शिष्य पाणिनी त्याच्या शिष्य परंपरेत गौडपादाचार्य हे होते ह्यांचा परमशिष्य गोविंद होता ही शैव ब्राह्मणांची परंपरा असल्याने त्यांच्या चार बायका होत्या ह्या शासक , व्यापारी आणि दास ह्या तीन समुदायातून आलेल्या होत्या आणि चौघींना एक एक पुत्र झाल्यावर ह्यांनी संन्यास घेतला होता .
इकडे शंकराचार्यांचा जन्म एका शैव घराण्यात झाला वडील शिवगुरू हे कालटी गावातील भगवती देवीच्या मंदिराचे पूजारी होते आणि शिवभक्तही होते आईचे नाव उपलब्ध नाही वैदिक तिला आर्याबा म्हणतात पण हे खरे नाव न्हवे . शंकराचार्यांचा जन्मच शंकराला नवस बोलून झाल्याने त्यांचे नाव शंकर ठेवण्यात आले होते . शिवगुरू हे शैवाचार्य असल्याने त्यांना सर्वच दर्शनशास्त्रांचा अभ्यास कम्पलसरी होता त्यांनी शंकराचार्यांना लहानपणापासूनच दर्शने शिकवायला सुरवात केली आणि तल्लख बुध्धीच्या ह्या बालकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच ती आत्मसात केली
शिकलेली दर्शने आणि भोवतालचा समाज ह्यांच्यात मेळ बसेना हा गोंधळ दूर करण्यासाठी ते गुरु शोधत गोविंदांच्या पाशी पोहचले ही पहिली भेट विलक्षण होती त्यांनी ह्या बालकाला तू कोण असे विचारले तर शंकराचार्य म्हणाले
“मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिव्हे न च घ्रार्णनेत्रे । न च व्योम भूमिर्न तेजो न वायुुः
चिदानन्दरूप : शिवोऽहम् शिवोऽहम् ॥”
ना मी बुद्धि ना मन ना अहंकार
ना कानजीभ ना नाकडोळे ना चित्त
ना आकाश ना भूमी ना वायू ना तेज
चिदानंद मी शिव शिव शिव
इथपर्यंत शंकराचार्य शैवच होते वर्णजातीपातीवर त्यांचा विश्वास न्हवता
गोविंदाचार्य हे वेदांती शैव होते ह्या शाखेची श्रद्धा अशी कि ब्रह्मसूत्रे भगवान शिवांनी सांगितली ह्यांना असा स्वप्नभास झाला होता कि खुद्द व्यास स्वप्नात त्यांना सांगत आहेत कि तुझ्याकडे साक्षात शिव अवतार घेऊन येणार आहे तू ह्या अवताराचा गुरु बन हा अवतार ब्रह्मसूत्रांचा नवा मांडणंअविष्कार करणार आहे '' शंकराचार्यांच्या उत्तराने त्यांना वाटले कि हाच तो शिवाचा अवतार . त्यांनी ताबडतोब त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि इथून शंकराचार्य शैव वेदांती बनणे सुरु झाले .
शैव वेदांती अवस्था
खुद्द शंकराचार्य शैव आणि त्यांचे गुरु गोविंद शैव वेदांती ह्यांच्या संबंधातून एक विलक्षण रसायन तयार होऊ लागले आणि शंकराचार्यांचा योगाभ्यास सुरु झाला ह्याच काळात त्यांनी आपल्या गुरूला उद्देशून लिहलेले स्तोत्र जे वैष्णवांनी श्रीकृष्णाला उद्देशून लिहिले आहे असा अपप्रचार केला आणि ज्यावर ओशोंनी ह्या गैरसमजाच्या आधारे भज गोविंदम मालिकेत व्याख्याने दिली आहेत त्यांनी लिहिले . हे गुरूला पहिले नमन होते . हा गैर समज का पसरु शकला ?
कारण ह्या काळात शंकराचार्यांनी शैव वेदांताचा वाक्यार्थ सिद्धांत स्वीकारला . ह्या सिद्धांतानुसार वाक्याला चार अर्थ असतात
१सरलार्थ
२ भावार्थ
३ ध्वन्यार्थ
४ गर्भितार्थ
शंकराचार्य हे उत्कृष्ट कवी असल्याने त्यांनी ह्या चारही अर्थाचा वापर करून अनेक कविता रचल्या पण त्यातील गर्भितार्थ न कळल्याने अनेकदा अर्थाचा अनर्थ झाला .जसे गोविंद गुरु कृष्णगोविंद झाले . असाच दुसरा अनर्थ गंगास्तोत्रमबाबत झाला . ह्यातला गर्भितार्थ मायेचा चिखल शुद्ध आत्मस्वरूप नदीत बुडवला कि नाहीसा होतो असा होतो त्यामुळेच गंगेला भगवती त्रिभुवनतारिणी भवसागर पार करणारी असे त्यांनी म्हंटले पण त्याने गंगेत डुबक्या मारून पाप नाहीसे होते असा गैरसमज पसरला आणि आजही हिंदू गंगेत आणि इतर नद्यांत डुबक्या मारतच आहेत
शंकराचार्यांनी पुढे ह्या अवस्थेत चारही ब्रह्मवाक्यांचा अनुभव घेतला आणि पंचायतन पूजाही प्रचलित करायला सुरु केली पंचायतन काय होते ? ह्या पांच देवता होत्या आणि ह्यातील कुठल्याही एका देवतेची इष्ट देवता म्हणून निवड करावी असे शंकराचार्यानीं सांगितले ह्या देवताच हिंदू धर्माच्या मुख्य देवता म्हणून आजही प्रचलित आहेत ह्या देवता पुढीलप्रमाणे
१शिव
२पार्वती
३गणेश
४ नारायण
५ सूर्य
ह्यातील
१शिव
२पार्वती
३गणेश
४ सूर्य
ह्या शैव देवता होत्या तर नारायण अर्धी पंचरात्र शैव अर्धी वैष्णव होती
ह्यामागचा उद्देश स्पष्ट होता उच्च्भ्रू वैष्णवांना शैवांच्यात सामावून घेणे पण परिणाम नेमका उलट झाला . शैवांच्यात उच्च्भ्रू वैष्णव सामावून जाण्याऐवजी उच्च्भ्रू वैष्णवांनीच शैवांना गिळंकृत केले उच्च्भ्रू वैष्णवांनी
१शिव
२पार्वती
३गणेश
४ सूर्य
ह्यांना दुय्यम करून नारायण ह्या देवतेची सांगड विष्णूशी घातली आणि कृष्ण व राम ह्यांना त्या विष्णूचे अवतार घोषित केले आणि विष्णूऐवजी नारायणाऐवजी रामकृष्ण पंचायतनात आणले आणि त्यामुळे
१शिव वा शिव अवतार
२पार्वती वा लक्ष्मी वा ह्यांचे अवतार
३गणेश
४ सूर्य
५ नारायण वा विष्णू वा विष्णूचे नऊ अवतार विशेषतः राम व कृष्ण वा ह्या नऊ अवतारांचे अवतार
असे पंचायतन प्रचलित केले जे आज हिंदूंचे प्रचलित पंचायतन आहे
प्रश्न असा कि हा नारायण शंकराचार्यांच्या पंचायतनात आला कुठून ? तो आला होता त्यांच्या गुरुपरंपरेतून
शंकराचार्य < गोविंदपाद < गौडपाद < शुकदेव < व्यास < पराशर < शक्त्तृ < वशिष्ठ < ब्रह्मा < नारायण <
अशी ही गुरुपरंपरा होती आणि ह्या परंपरेचे आद्य गुरु नारायण होते साहजिकच शंकराचार्यांनी आपल्या ह्या आद्य गुरूला पंचायतनात स्थान दिले ह्या गुरु नारायणांचा आणि वेदातील विष्णूचा काडीचाही संबंध न्हवता पण पुढे तो जोडला गेला शंकराचार्य ही शैव धम्मीयांच्या हातून निसटलेली एक फळी होती जिचा पुढे हिंदू धर्म नामक महावृक्ष झाला हे कसे घडले ते पुढील भागात पाहू
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक भाग दुसरा
शंकराचार्यांच्या गुरूने गोविंदजींनी त्यांना माडुक्य कारिका शिकवली . शैवांच्यात कारिका हा एक वाङ्मय प्रकार विकसित झाला जसे कि सांख्यकारिका , वज्रसूचीकारिका पुढे वैदिकांनी ह्या कारिकांची उपनिषदे बनवली माडुक्य कारिका हीही अशी एक कारिका होती जिचे पुढे मांडुक्य उपनिषदात वैदिकांनी रूपांतर केले हे सर्व मी सांगतोय कारण ज्या दहा उपनिषदांच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केले म्हणून सांगितले जाते ती मूळात कारिकाभाष्ये आहेत . सूत्रे (शिवसूत्रे , तंत्रसुत्रे, कामसूत्रे ) कारिका , यंत्रे , तंत्रे आणि शास्त्रे (विष्णुगुप्ताचे अर्थशास्त्र ) हे शैवांचे पंचानन आहे . धर्मशास्त्र आणि धर्मसूत्रांना शैवांच्या धम्मात जागा नाही राज्य धर्मशास्त्रानुसार न्हवे तर कामशास्त्र आणि अर्थशास्त्रांनुसार चालले पाहिजे ही शैवांची धारणा आहे . कामशास्त्र आणि अर्थशास्त्र काळानुसार बदललं पाहिजे हा त्यांचा विश्वास आहे . किंबहुना शिवाला महाकाल म्हणण्याचे हेच कारण आहे हा महाकाल जुन्याला गिळत चाललाय , संहार करत चाललाय आणि शक्ती नवी नवी माया ( मायेचा अर्थ प्रेमाने रचलेले वास्तव असा आहे illusion आभास वा भ्रम न्हवे ) रचते आहे माया लावते आहे हे शैवांचे कालिक प्रमेय आहेशंकराचार्यांनी ह्या काळात रचलेला पहिला ग्रंथ म्हणजे विवेकचूडामणी
ह्याच काळात जेव्हा त्यांना कैवल्य प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी जे पहिले लेखन केले ते पुढीलप्रमाणे
Lyrics of Nirvana/ Atma Shatakam with translation...
Shivoham ! Shivoham ! 1
. Mano BuddhyA-hankara ChittaNi naaham Nacha Shrotra Jihve Na Cha Ghrana Netre Nacha Vyoma Bhoomir Na Tejo Na Vayuh Chidananda Rupah Shivoham! Shivoham!! .
2. Na Cha Prana Sangyo Na Vai Pancha Vayu Na Vaa Sapta dhatur Na Vaa Pancha Koshah Na Vak Pani Padam Na Chopastha Payu Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!.
3. Na Me Dvesha Ragau Na Me Lobha Mohau Mado Naiva Me Naiva Maatsarya Bhavah Na Dharmo Na Chartho Na Kamo Na Mokshah Chidananda Rupah Shivoham! Shivoham!! I
4. Na Punyam Na Papam Na Saukhyam Na Dukham Na Mantro Na Teertham Na Veda Na Yajnaha Aham Bhojanam Naiva Bhojyam Na Bhokta Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!.
5. Na Me Mrityu Shanka Na Me Jati Bhedah Pita Naiva Me Naiva Mata Na Janma Na Bandhur Na Mitram Gurur Naiva Shishyah Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!
6. Aham Nirvikalpo Nirakaara Roopah Vibhur Vyapya Sarvatra Sarvendriyanaam Sada Me Samatvam Na Mukthir Na Bandhah, Chidananda Rupah Shivoham! Shivoham!!
Without hate, without infatuation, without craving, without
greed;
Neither arrogance, nor conceit, never jealous I am;
Neither dharma, nor artha, neither kama, nor moksha am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Neither arrogance, nor conceit, never jealous I am;
Neither dharma, nor artha, neither kama, nor moksha am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Without sins, without merits, without elation, without sorrow;
Neither mantra, nor rituals, neither pilgrimage, nor Vedas;
Neither the experiencer, nor experienced, nor the experience am I,
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Neither mantra, nor rituals, neither pilgrimage, nor Vedas;
Neither the experiencer, nor experienced, nor the experience am I,
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Without fear, without death, without schism, without jati;
Neither father, nor mother, never born I am;
Neither kith, nor kin, neither teacher, nor student am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Neither father, nor mother, never born I am;
Neither kith, nor kin, neither teacher, nor student am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Without form, without figure, without resemblance am I;
Vitality of all senses, in everything I am;
Neither attached, nor released am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
Vitality of all senses, in everything I am;
Neither attached, nor released am I;
I am Consciousness, I am Bliss, I am Shiva, I am Shiva.
—Adi Shankara, Nirvana Shatakam, Hymns 3–6[79]
म्हणजेच निर्वाणप्राप्ती झाली तेव्हाही शंकराचार्य शैवच होते मग पुढे असे काय झाले कि ते वैदिकांना जाऊन मिळाले ?
म्हणजेच निर्वाणप्राप्ती झाली तेव्हाही शंकराचार्य शैवच होते मग पुढे असे काय झाले कि ते वैदिकांना जाऊन मिळाले ?
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक ३ लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
मागच्या वेळी मी एक प्रश्न विचारला होता कि निर्वाणप्राप्ती झाली तेव्हाही शंकराचार्य शैवच होते मग पुढे असे काय झाले कि ते वैदिकांना जाऊन मिळाले ?
ह्या प्रश्नाचे उत्तर तात्कालीन परिस्थितीत आहे गुरूला समर्पण म्हणून विवेकचूडामणी त्यांनी लिहिला खरा पण त्यांच्या गुरूच्या आदेशावरून त्यांनी जेव्हा प्रस्थान त्रयी वर भाष्य लिहिण्यासाठी देशाटन सुरु केले तेव्हा त्यांना दिसला तो मतांचा गलबलाट आणि शैव , जैन , बौद्ध ह्या धम्मात आणि वैदिक , सनातन आणि वैष्णव धर्मात ह्यांच्यात पसरलेले प्रचंड पाखंड आणि कर्मकांड ह्या काळात शंकराचार्य सामान्य माणसांशी संवाद साधत होते आणि साध्या भाषेत शास्त्रार्थ समजावून सांगत होते ह्यातून त्यांच्या मनात एक द्विस्तरीय धर्माची सरंचना आकार घ्यायला लागली
१ सामान्यजन धर्मस्तर
२ विद्वानजन धर्मस्तर
गौतम बुध्दाने जसा कर्मकांडाविरुद्ध थेट उठाव केला तसा त्यांनी करायला हवा होता किंवा सरळ शून्यापासून सुरवात करून त्यांनी नवा धर्म स्थापन करायला हवा होता पण त्यांचा पिंड क्रांतिकारकांचा न्हवता ज्या गुरुशिष्य परंपरेत ते वाढले होते तिथे गुरूचा सन्मान आणि पूजन फार महत्वाचे होते त्यामुळे शिस्त तर आणायला हवी पण परंपरा मोडीत न काढता असा काहीसा हा व्यूह होता त्यातच ते फक्त ज्ञानयोगी न्हवते तर कवीही होते त्यामुळे कुठल्याही मंदिरात ते गेले कि त्यांना कविता सुचायच्या त्यामुळेच आपल्या पांडुरंगापासून ते अन्नपूर्णेपर्यंत त्यांनी सर्वांच्यावर कविता रचल्या रादर त्यांना त्या स्फुरल्या ज्या माणसाच्या तोंडून निर्वाणप्राप्तीनंतर उपदेश न येता कविता येते तो माणूस हाडाचाच कवी असला पाहिजे पण कवींचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे प्रतिभावंत कवी सर्वसाधारणपणे सर्वसमावेशक असतात अनुभव आणि भवताल शोषून घेणे ही त्यांची वृत्ती असते शंकराचार्य ह्याला अपवाद न्हवते फक्त ह्या धार्मिक अराजकाचे काय करायचे हे त्यांना सूचत न्हवते त्यावेळी संपूर्ण भारतात तेच एक असे होते ज्यांना निर्वाणप्राप्ती झाली होती आणि ज्यांच्यावर नवीन धर्म निर्माण करायची जबाबदारी येऊन पडली ते ज्या तामिळ केरळात वाढले होते तिथे वैष्णव ब्राह्मण अक्षरशः हैवान बनले होते विशेषतः केरळातील नंबुदुरींनी परशुराम ह्या विष्णूच्या अवताराने सर्व क्षत्रिय कापल्याने ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरलेत असा स्टान्स घेतला होता इतकेच न्हवे तर ते सर्वच ब्राह्मणेतरांना अस्पृश्य मानत होते ह्यांची मजल इथवर गेली कि नायर ह्या क्षत्रिय जमातीतील स्त्रीशी संबंधन प्रथेच्या नावाने ते संबंध ठेवत किंबहुना हा हक्क मानत आणि त्याद्वारे निर्माण झालेल्या पुरुषांचा वापर मिलिटरी म्हणून योद्धे म्हणून करत जर क्षत्रियांचीच ही अवस्था तर बाकीच्यांची काय ह्याची आपण कल्पना करू शकतो अशा वातावरणात वाढलेल्या शंकराचार्यांना उत्तरेकडचा चातुर्वर्ण्य हा सौम्यच वाटला असणार अशावेळी खरेतर चातुर्वर्ण्य त्यांनी भिरकावून द्यायला हवा होता पण नेमकी ह्याचवेळी त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जीचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला . ही घटना कुठल्याही निर्वाण प्राप्त झालेल्या माणसाच्या आयुष्यात घडली न्हवती .
शंकराचार्यांना जेव्हा कळाले कि त्यांची आई शेवटच्या घटका मोजतीये तेव्हा ते त्वरित आईला भेटायला गेले .
आई फक्त त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होती . तिने त्यांना जवळ घेतले आणि अद्वैत म्हणजे काय ते मला मरण्यापूर्वी तुझ्याकडून समजून घ्यायचे आहे असे सांगितले . आपल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या आईला शंकराचार्यांनी तिचे डोके मांडीवर घेऊन अद्वैत समजावून सांगितले पण आईला फक्त ज्ञान नको होते . तिला प्रचिती हवी होती . तिच्या आग्रहापुढे शंकराचार्य झुकले आणि त्यांच्या आयुष्यातील पहिला शक्तिपात त्यांनी केला . त्याने आई मुक्त झाली आणि मरण पावली . ह्याही अवस्थेत शंकराचार्यांच्या तोंडून बाहेर पडली ती कविताच !
मृत्यू झाल्यानंतर शव कुणी जाळायचे असा प्रश्न निर्माण झाला . वैष्णव परंपरेनुसार संन्याशाने संन्यास घेतला कि त्याचा घरातल्या कुठल्याच गोष्टीवर अधिकार रहात नाही आणि त्यात आई आणि वडिलांचे प्रेतही येते . त्यामुळे गावातले वैष्णव ब्राह्मण शंकराचार्यांना प्रेताला हात लावू देईनात शैव परंपरेनुसार संन्यासानंतरही हा हक्क उरतो त्यामुळे शंकराचार्यांनी मी आईच्या शवाला अग्नी देणार असा स्टान्स घेतला . शेवटी काही झाले तरी त्यांनी आईला तसे वचन दिले होते आणि दोघेही शैव असल्याने वचन देताना घेताना ह्यात काही गैर आहे असे त्यांना वाटले न्हवते पण ह्या स्टान्सचा परिणाम गंभीर झाला ह्या गावात शंकराचार्यांचे एकच घर शैव होते उरलेले वैष्णव होते त्यांनी सरळ सर्व काही आहे तिथे टाकून अंत्यविधीत भाग घ्यायला नकार दिला अशावेळी ब्राह्मणेतर मदत करतील अशी अपेक्षा होती पण तीही पूर्ण झाली नाही आणि मग शंकराचार्यांनी एक निर्णय घेतला आपल्या आईला एकट्याने जाळायचा ! ते मैलभर चालत गेले खरे पण शक्तिपातामुळे आणि वादळी घडामोडीमुळे ते प्रचंड अशक्त झाले होते . त्यांना आईचे शव पेलेना . त्यांनी आईच्या शवाचे तीन तुकडे केले आणि मग ते तीन तुकडे घेऊन ते स्मशानभूमीत गेले . चितेची लाकडे एकट्यानेच कापली रचली . आईच्या शवाचे तीनही तुकडे चितेवर ठेवले आणि भडाग्नी दिला .
ह्या घटनेने शंकराचार्य बदलले .
(पुढचाल )
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक ४ लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
ह्या घटनेमुळे शंकराचार्यांना चार गोष्टी कळल्या
१ ह्या समाजात विशेषतः वैदिक समाजात मीमांसा दर्शनाने पसरवलेले प्रचंड कर्मकांड आहे ह्या निरर्थक कर्मकांडाला कंटाळूनच प्रज्ञावान ब्राह्मणांनी वैदिक धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा त्याग केला हे थांबवायचे असेल तर प्रथम मीमांसकांचा पराभव केला पाहिजे आणि कर्मकांडांना अर्थ प्रदान केला पाहिजे . हा समाज ह्या समाजातील सर्वसामान्य लोक कधीही कर्मकांडातून बाहेर पडणार नाहीत त्यामुळे आपण ही कर्मकांडे रद्द करू शकत नाही आपण फक्त त्याला एक नीटनेटके रूप देऊ शकतो
२ प्रत्येक समाजात मुमुक्षु लोक असतात ते निर्वाण प्राप्तीसाठी काहीही करू शकतात जर त्यांना आपण नीट मार्ग दाखवला नाही तर ते धर्मांतर करतील म्हणून आपण त्यांना नीट मार्ग दाखवला पाहिजे . बौद्ध आणि जैन हेही आता कर्मकांडात गुंतून पडलेत त्यामुळे ज्ञानमार्गी लोकांसाठी ते निरुपयोगी बनत चाललेत त्यांच्यासाठी एक तर्कशुद्ध मार्ग तयार केला पाहिजे
३ लोक कठोर झालेत त्यांना मोक्ष निर्वाण मुक्तीविषयी काहीही पडलेले नाहीये तेव्हा त्यांच्यासाठी किमान सुरवात म्हणून नीट भक्ती हवी त्यासाठी दैवतशास्त्र नीटनेटके करणे आवश्यक आहे
४ वर्णजातीव्यवस्था कुणालाच तोडायची नाहीये अगदी वैष्णव ब्राह्मणेतरांनाही म्हणून वैदिकांचे धर्मशास्त्र स्वीकारले पाहिजे
ह्या चारही अंगांनी त्यांनी आपला नवा धर्म मांडायला सुरवात केली
कर्मकांडाला कमी करून कर्मकांडाला नीटनेटके रूप देण्यासाठी त्यांनी देशभरातल्या कट्टर मीमांसादर्शनाच्या पंडितांना वादविवादात हरवायला सुरवात केली मंडनमिश्राला त्यांनी हरवले होतेच आता इतरांची पाळी होती एकामागून एक असे ते मीमांसकांना हरवत गेले त्यांचा हा विजय शंकर विजय किंवा शांकर विजय म्हणून निगम ब्राह्मण नोंदवतात आणि त्यांच्या चरित्राचे नावही अनेकदा शंकर विजय असेच नोंदवले जाते ह्या विजयानंतर त्यांनी वेद फक्त औषधापुरते ठेवले आणि सनातनांना त्यान्च्याच ग्रंथांचे दाखले देत हरवले .आणि कर्मकांडातला कर्मठपणा नाहीसा करत त्याला एक नवा अर्थ देत त्यांनी कर्मकांडाला एक नेटके रूप दिले. शैवांच्यात कर्मकांड न्हवते आणि शंकराचार्य स्वतः शैव होते त्यामुळे ते आयुष्यात कधीही शैव पंडितांशी लढले नाहीत उलट त्यांचा मूळ हेतू शैव आणि शैवांच्यातील ब्रह्मपंथ व्यापक बनवून त्यात वैदिक , सनातन आणि वैष्णव ह्यांना सामावून घेणे हा होता . मुमुक्षूंना नीट मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी प्रस्थानत्रयीवर नव्याने काम केले . शंकराचार्यांच्यापूर्वी बहुतांशी वैदिक आणि सनातनी (ब्राह्मणीधर्माचा पुरस्कार करणारे )ब्राह्मण प्रस्थानत्रयी म्हणजे १चार वेद , २सूत्र -स्मृती आणि ३ आरण्यके असे गणित मांडायचे वैष्णव प्रस्थानत्रयी म्हणजे १ वेदउपनिषदें ,२ ब्रह्मसूत्रे आणि ३ महाभारत महाकाव्य व पुराणे असे गणित मांडायचे आणि हे सारे वाङ्मय महर्षी वेदव्यासांनी लिहिलंय असं मानायचे (पुढे ह्यात रामायण आणि आणखी काही उपनिषद पुराणांची भर पडली ) ह्यातील ब्रह्मसूत्रे ह्या शैवांच्या कारिका होत्या आणि त्या शिवांनी ब्रह्माला सांगितल्या होत्या आणि ब्रह्माने त्या नारायणांना सांगितल्या होत्या त्यांचे प्राचीन नाव ब्रह्मकारिका हे होते ह्या सांख्यकारिका प्रमाणेच कारिका होत्या त्यांचे वैदिकीकरण करतांना वैदिकांनी आणि बादरायणाने त्यांना प्रथम कारिकासुत्र व पुढे सारिकासूत्र हे नाव दिले तर बौद्धानी त्यांना भिख्खुसारिका हे नाव दिले पुढे वैष्णवांनी ह्यांचे श्रेय व्यासांना दिले आणि व्यासांच्याकडून ही सूत्रे बादरायणला मिळाली अशी मांडणी केली . हा बादरायण संबंध पुढे चांगलाच प्रस्थापित झाला . आणि वैष्णवांच्यात ती प्रस्थानत्रयीचा भाग म्हणून स्थिर झाली मीमांसकांचा ह्या वैष्णव प्रस्थानत्रयीपेक्षा सनातन कर्मठ प्रस्थानत्रयीवर जास्त विश्वास होता साहजिकच नवी प्रस्थानत्रयी प्रस्थापित करण्यासाठी मीमांसकाचा पाडाव आवश्यक होता . शंकराचार्यांनी तो केला पण त्यांनी सनातन आणि वैष्णव अशा दोन्ही प्रस्थापित प्रस्थानत्रयी बाजूला सारल्या आणि नवी प्रस्थानत्रयी शोधायला प्रारंभ केला . त्यांना ज्ञानयोगी म्हणून पुराणे आणि महाकाव्ये अमान्य होती पण जनतेपर्यन्त पोहचण्यासाठी त्यांना ती आवश्यक वाटत होती . त्यासाठी त्यांनी महाभारतातील मूळ गीतेत बदल केले आणि नवी गीता लिहिली जिला आज आपण भगवद्गीता म्हणतो . महाभारतात ती ताबडतोब समाविष्ट झाली हा त्यांचा मोठा विजय होता . ह्यातून एक नवी प्रस्थानत्रयी उदयाला आली ती म्हणजे उपनिषदे , ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता ! ही प्रस्थानत्रयी आजच्या हिंदुधर्माचा गाभा आहे आणि कोर्टात भगवद्गीता हाच हिंदूंचा धर्मग्रंथ मानला जातो . हे करतांना त्यांनी वेद , पुराणे , स्मृती , आरण्यके , सूत्रे ह्या सर्वांना धार्मिक उपग्रंथ म्हणून मान्यता देऊन वैदिक आणि सनातनांना आपल्या मांडणीत सामावून घेतले आपण जर बारकाईने पाहिले तर एक गोष्ट सहज लक्ष्यात येईल ती म्हणजे ब्रह्मसूत्रे आणि गीता जी मुळात गीतोपनिषद ह्या नावाचे उपनिषदच आहे ही उपनिषदांचीच सारे आहेत म्हणजे एका अर्थाने हिंदुधर्म हा ब्रह्मधर्म आहे उपनिषदधर्म आहे
शंकराचार्यांनी जे काही मांडले त्यातील सर्वात क्रांतिकारक सिद्धांत होता ''ब्रह्म सत्य जगत मिथ्या '' दुर्देवाने नंतर शैव ज्ञान झोपी गेल्याने आणि शैवांच्यात शैवाचार्य औषधालाही शिल्लक न उरल्याने मिथ्या हा शब्द शैव अर्थाने वापरला आहे हेच अनेकांच्या लक्षात आलेले नाही . मिथ्थ्याचा शैव अर्थ आहे ''जे मितींनी बद्ध झाले आहे ते '' नकुलीश दर्शनाचा आचार्य म्हणून सांगतो कि शैव पांच मित्या मानतात . लांबी , रुंदी , उंची , काळ आणि दिशा ! एकेकाळी न्यूटनीय विज्ञान फक्त लांबी रुंदी उंची अश्या तीनच मित्या मानत होते पुढे आईन्स्टाईनने काळ हीही मिती आहे हे सिद्ध केले आज ना उद्या विज्ञान ''दिशा'' हीही मिती म्हणून मान्य करेल असा माझा विश्वास आहे . किंबहुना दिशेशिवाय सिमेट्री अशक्य आहे आणि दिशा बदलली कि सिमेट्री बदलते आणि सिमेट्री बदलली कि दिशा बदलते . असो . शंकराचार्यांना म्हणायचे होते ते असे कि ब्रह्म हे मितिशून्य सत्य असून जग हे मितीबद्ध आहे म्हणजे लांबी , रुंदी , उंची , काळ आणि दिशा ह्या पांच मितींनी बद्ध आहे .
दुर्देवाने मीमांसकांनी पुन्हा एकदा डोके गुडघ्यात आणून हे मिथ्थ्या जग परलोकात न्हेले आणि अजूनही हिंदूंच्यात ते मित्यात परतलेले नाही . दिशा ही मिती चुकल्याचा हा असाही परिणाम !
शंकराचार्यांनी जी मांडणी केली ती पुढीलप्रमाणे
१ ब्रह्म हे मूळ आहे अविनाशी अनादी आहे अनंत आहे हे ब्रह्म म्हणजे ईश्वर नाही मात्र ते सगुण आहे आणि अंतिमतः निर्गुण आहे .
२ शरीर विनाशी आहे त्यामुळे त्यात माणसाने अडकू नये आपले आत्मस्वरूप हे ब्रह्म आहे हे त्याने ओळखावे
३ आत्मा ब्रह्मस्वरूप आणि अविनाशी आहे तोच पुनर्जन्म घेतो आणि संसाराच्या भवपाशात अडकतो पण चार मार्गांनी मनुष्य ह्या संसारातून मोक्ष प्राप्त करू शकतो
४ ब्रह्मप्राप्तीचे राजयोग , ज्ञानयोग , कर्मयोग आणि भक्तियोग असे चार मार्ग आहे ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे ज्याने त्याने मार्ग निवडावा बुद्धिमान आणि तर्काने जाणाऱ्या माणसाने ज्ञानयोग निवडावा
५ सर्वसामान्य लोकांसाठी भक्तिमार्ग हाच योग्य आणि सोपा मार्ग आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पुराणे आणि महाकाव्ये ही योग्य आहेत पुराणातील आणि महाकाव्यातील कथा कपोलकल्पित आणि तर्काला धरून नसल्यातरी त्यांच्यात कुठले ना कुठले धर्मतत्व असल्याने त्यांच्यावर टीका करू नये त्यांचा वापर त्यांना वेदांत समजावून सांगण्यासाठी करावा .
शंकराचार्यांची ही मांडणी हीच आजच्या निगम हिंदूंची मांडणी आहे
त्यांच्या ह्या मांडणीत भक्ती आणि भक्त ह्यांना खूप महत्व होते त्यामळे ह्यानंतर प्रश्न होता ३३ कोटी देवदेवता मानणाऱ्या भक्तीवादी लोकांच्या दैवतशास्त्रात सुधारणा कशी करायची हा ! वैदिक , भक्तीवादी शैव , वैष्णव व सनातन ह्यांना चमत्कार घातल्याशिवाय धार्मिक झोप येत नाही त्यामुळेच शंकराचार्यांच्या चरित्रात ह्या लोकांनी भरपूर चमत्कार घातले आहेत माझा चमत्कारांवर विश्वास नसल्याने मी इथे ते बाजूला सारून विश्लेषण करणार आहे मी मागे म्हंटल्याप्रमाणे शंकराचार्यांनी इष्टदेवता म्हणून
१शिव
२पार्वती
३गणेश
४ नारायण
५ सूर्य
असे पंचायतन आणले . पुढे भैरवनाथांच्या भक्तांची मागणी मान्य करून षडपूजा आणली विष्णू ,
राम , कृष्ण , पांडुरंग अशा अनेक देवतांना उपास्य उपदेवता म्हणून मान्यता दिली ह्याने हिंदुस्तानातील अनेक देवता इष्ट देवतांच्या अवतार होऊन सामावून जाण्याची प्रक्रिया सुरु झाली कृष्णाच्या द्वारकेतच त्यांनी आपला पहिला मठ स्थापन केला . त्यांनी मठ स्थापन केले तशी योग , भोग , मुक्ती ,वर आणि सुमोक्ष ह्या पाच लिंगांचीही स्थापना केली . अर्थात ते मूळचे शैव आहेत हे माहीत असलेल्या काही वैष्णवांनी त्यांना विरोध केला उदाहरणार्थ हरिहरच्या वैष्णव मंदिरात ते शैव आहेत म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला होता पुढे काही काळाने होयसाळांनी इथे हरिहरेश्वर मंदिर बांधले विष्णू पुढे इष्ट देवता म्हणून सामावला गेला आणि हर आणि हरी एकत्र झाले . मीमांसकांच्या यज्ञ संस्कृतीचा पाडाव होऊन पूजा संस्कृती मुख्य संस्कृती म्हणून प्रस्थापित झाली हे कार्य काहीसे ख्रिश्चन धर्माप्रमाणे होते ख्रिश्चन धर्माने जश्या सर्व पेगन देवता गॉड , जिझस , मदर मेरी आणि होली स्पिरिट ह्यांच्यात सामावून घेतल्या त्याप्रमाणे हिंदुस्तानातल्या सर्व देवदेवता शिव पार्वती विष्णू लक्ष्मी गणेश नारायण सूर्य ब्रह्मदेव ह्यांच्यात सामावून घेतल्या गेल्या .
आता प्रश्न उरला होता तो धर्मशास्त्राचा . मी मागेच म्हंटल्याप्रमाणे शैवांना धर्मशास्त्र मान्यच नाही त्यांचा अर्थशास्त्रावर कामशास्त्रांवर आणि मोक्षशास्त्रावर विश्वास आहे आणि राज्य आणि समाज अर्थशास्त्रांनुसार चालला पाहिजे असे ते मानतात आणि अर्थशास्त्र काळानुसार बदलते हाही त्यांचा विश्वास आहे शंकराचार्यांची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्यांना विष्णुगुप्त आणि इतरांचे अर्थशास्त्र माहीतच न्हवते . त्यांचा ह्या अंगाने काही अभ्यासच न्हवता ते कामशास्त्राच्याही विरोधी होते कारण काम आणि तंत्र ह्यांच्यामुळे आपल्या शैव धर्माचा अधःपात झाला असे त्यांना वाटत होते मग उरले काय तर मोक्षशास्त्र आणि वैदिकांचे धर्मशास्त्र . आणि इथेच त्यांनी विचारवंत म्हणून घोडचूक केली त्यांनी हा प्रश्न हातात घ्यायला नकोच होता पण वैदिक , सनातन आणि वैष्णवांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी तो हातात घेतला त्यांनी वैदिकांचे आणि सनातनांचे धर्मशास्त्र स्वीकारले ह्या धर्मशास्त्राचा चातुर्वर्ण्य सिद्धांत स्वीकारला त्यांच्या ह्या निर्णयाने हिंदुस्थानचा इतिहास पूर्ण बदलला ह्या निर्णयाने शंकराचार्य निगमी झाले
. मग आपोआपच ब्राम्हण उच्चंस्थानी आले त्यांनी स्थापन केलेल्या मठांपैकी एकाही मठाचा प्रमुख ब्राह्मणेतर न्हवता . ही वैदिक धर्मशास्त्र स्वीकारल्याची परिणीती होती . हा सामाजिक मूर्खपणा होता . ह्याने त्यांनी स्थापन केलेला हिंदू धर्म कायमचा निगमीं झाला . ह्याचे भारतीय समाजावर भीषण परिणाम झाले .
(पुढचाल )
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक ५ लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
अनेकांना प्रश्न पडतो कि मी आद्य शंकराचार्यांच्यावर का लिहितो आहे ? मला अनेकदा ह्या प्रश्नाचे आश्चर्य वाटते कारण ह्यातल्या अनेकांना हिंदूंच्यावर हिंदुत्ववाद्यांच्यावर नरेंद्र मोदींच्यावर टीका करायची असते पण ज्या माणसाने हा हिंदुत्ववाद जन्माला घातला त्याला मात्र तो माणूस मात्र जसा आहे तसा समजून घ्यायचा नसतो फुल्यांनी , आंबेडकरांनी , समाजवाद्यांनी आणि मार्क्सवाद्यांनी जसा हिंदू आणि आद्य शंकराचार्य हा माणूस दाखवला तसाच झापडं बांधून स्वीकारायचा असतो ह्याने हिंदुत्ववाद आधिक बलवान होत जातो हेही ह्यांना कळत नाही . हिंदूंना समजणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही पण शंकराचार्यांना समजून घेतले कि ती बरीच सोपी होते . उत्तरेकडची आणि वारकरी भक्तिचळवळ ही शंकराचार्यांची देणगी आहे . ज्ञानेश्वर हे एका अर्थाने शंकराचार्यांचे मराठी अवतार आहेत . त्यांनी स्तोत्रे रचली ह्यांनी अभंग ! त्यांनी गीता नव्याने रचली ह्यांनी ज्ञानेश्वरी ! त्यांना उपनिषदे प्रमाण ह्यांनाही ! त्यांनी शिवावर अनेक स्तोत्रे रचली ह्यांनी अनुभवामृत हे शैव काव्य रचले ! त्यांना स्वतःच्या संन्यासाने वैदिकांनी आई जाळताना त्रास दिला ह्यांना वडिलांच्या संन्यासाने त्रास दिला . दोघेही आत्मज्ञानी प्रकांड पंडित ! दोघांनी लहानपणापासूनच दैदिप्यमान रचना केल्या . दोघेही शैव साधना करून निर्वाणाला मिळाले आणि दोघांनी वर्णजातीव्यवस्थपुढे सारखीच कच खाल्ली . शंकराचार्यांनी अध्यात्मिक समता स्वीकारली सामाजिक समता नाकारली . ज्ञानेश्वरांनी हेच केले किंबहुना उत्तरेकडच्या आणि वारकरी भक्तिचळवळीने हेच केले आहे . अपवाद आगमिक भक्ती चळवळी आहेत .
संतांचा प्रभाव हा शंकराचार्यांचाही प्रभाव आहे हे लक्षात घेतले कि मग शंकराचार्यांचे महत्व लक्ष्यात येते . त्यांच्या काळात शंकराचार्य जसे वर्णजातिव्यवस्थेपुढे हवालदिल झाले होते तसे भालचंद्र नेमाडे आणि आपल्यातील अनेकजण हवालदिल झाले आहेत शंकराचार्यांना ह्या सामाजिक व्यवस्थेचे काय करायचे ते कळले नाही तसेच आपल्यातील अनेकांना ते कळत नाहीये एका अर्थाने आपल्यातील अनेकजण आतून शंकराचार्य आहेत फक्त उघडपणाने कोणी बोलून दाखवत नाही . शंकराचार्य जसे पुढे महान परंपरा मान्य करत वेदस्मृतीश्रुती मान्य करून घोडचूक करून बसले तीच घोडचूक करण्याच्या मूडमध्ये अनेकजण आलेले आहेत . हा धोका टळावा म्हणूनच हे लिखाण . ही चूक कशी घडली त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न !
एखादी चुकीची समाजव्यवस्था हजारो वर्षे चालत आली म्हणून बरोबर होत नाही . ऍरिस्टॉटल बायकांना कमी दात असतात असं म्हणायचा शेकडो वर्षे युरोप ही गोष्ट सत्य मानायचा पण पुढे स्त्रीपुरुष दोघांना समान दात असतात हे सिद्ध झाले . वर्णजातिव्यवस्थेचे असेच आहे . ही एक पूर्ण चुकीची आणि वाट चुकलेली समाजव्यवस्था होती आणि आहे .
पण हेही खरेच आहे कि ऍरिस्टॉटलने डॉगफिशबद्दल जे लिहिले ते २२०० वर्षांनी तंतोतंत खरे निघाले शंकराचार्यांनी जगाबद्दल मिथ्या (मितीने बद्ध )म्हणताना जे शहाणपण दाखवले ते आता सत्य निघाले . किंवा असे म्हणू कि आगमिक शंकराचार्य खरे निघाले निगमिक शंकराचार्य पूर्ण चूकले
आगम आणि निगम ह्यांच्यातील सर्वात मोठा फरक हाच आहे कि आगम काळानुसार आणि नव्या ज्ञानानुसार शास्त्र बदलू शकते हे मान्य करतात आणि त्याप्रमाणे समाजात बदल झाले पाहिजेत असा आग्रह धरतात तर निगम स्वतःचा धर्म आणि धर्मशास्त्र अपरिवर्तनीय आणि सनातन मानतात . ह्या व्याख्येनुसार भारतातील शैव , बौद्ध , जैन , शीख हे आगम तर भारतातील वैदिक , ब्राह्मणी (सनातन ) , वैदिक धर्म हे निगम ठरतात . भारताबाहेरील रोमन कॅथॉलिक , इस्लाम हे रिलिजन निगम आहेत तर ताओ , प्रोटेस्टंट ख्रिश्चन , झेन , व्रजयानी हे आगम आहेत .
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक ६ लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
शांकरविजयाचे दुष्परिणाम
शंकराचार्यांनी अनेक उपासनापंथ एकत्र आणले आणि त्यांना पंचायतनातं एकत्र आणले पण त्यांना जे अपेक्षित होते ते घडले का ? त्यांच्या शिकवणुकीत वैष्णवांनी बदल घडवले आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिवाला हटवून विष्णूला आणि पार्वतीला हटवून लक्ष्मीला आणायला सुरवात केली गणपतीला व्यासांचा लेखनिक बनवले आणि त्याची वैदिक पूजा पुढे आणून शंकराचे महत्व कमी करायला सुरवात केली . पुढे शिवपुराण रचून शिवाला बदलून टाकले . त्यामुळे मूळचा शिव असलेला पांडुरंग विष्णूचा अवतार झाला कोल्हापूरची पार्वती अंबाबाई महालक्ष्मी झाली . वैष्णवांनी शैव गिळला आणि वैदिकांनी वैष्णवांना आपल्या धर्मशास्त्रात खेळवायला सुरवात केली ह्याविरुद्ध बंड होणे अटळ होते तसे ते पुढे बसवेश्वरांच्या रूपाने झाले . पण दुर्देवाने ज्ञानेश्वर आणि नामदेव ह्या दोन मराठी संतांनी हा बंडाचा झेंडा पुढे न्हेण्याऐवजी शंकराचार्यांची सामाजिक चूक आधिक विस्तृत केली आणि उत्तरेकडे ज्ञानेश्वर नामदेवांच्यामुळे वैष्णववादाच्या आणि चातुर्वर्ण्याच्याही चिपळ्या वाजल्याब्राह्मणांचे खरे प्रकार दोनच
१ मूळ अथवा शैव ब्राह्मण अथवा आगमी ब्राह्मण
२ निगमीं ब्राह्मण म्हणजेच वैदिक ,सनातन आणि वैष्णव
ह्यातील सनातन ब्राह्मण हा कमालीचा कर्मठ आणि स्मृती उराशी कवटाळून बसणारा ! वैदिक म्हणजे वैदिक सूक्ते लिहणारा जो आता नाहीसा झालाय आणि तिसरा ज्याने शैव धम्म आत घेतला आणि विष्णूच्या साहाय्याने त्याचे सनातनीकरण घडवले .
शंकराचार्यांच्यामुळे शैवांच्यात स्मार्त ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांचा एक नवीनच प्रकार उदयास आला आणि दक्षिणेकडचे अनेक शैव ब्राह्मण स्मार्त ब्राह्मण झाले शंकराचार्य स्वतः शैव ब्राह्मण होते तेच जेव्हा वैदिकांना जाऊन मिळाले तेव्हा त्याचा प्रचंड परिणाम उत्तरेकडील शैव ब्राह्मणांच्यावर झाला आणि अनेक शैव ब्राह्मणांनी स्वतःला वैदिक ब्राह्मण म्हणून घोषित केले .ह्यात आत्ताचे चित्पावन , सारस्वत , देशस्थ , कऱ्हाडे , देवरुखे वैगरे होते चित्पावन आणि कोकणस्थ वैदिक ब्राह्मण ह्यांची सरमिसळ झाली . बाटलेले नेहमीच जास्त कट्टर असतात असे म्हणतात ह्यांच्याबाबत हेच घडले ह्यांनी वैष्णव आणि वैदिकांच्या नादी लागून वर्णजातिव्यवस्थेचे कट्टर समर्थन करायला सुरवात केली आपली आडनावे बदलायला सुरवात केली आणि ती वैदिक याज्ञनिष्ठ केली उदा साने वैगरे शिवशिष्य असलेला योगी परशुराम आणि विष्णूअवतार परशुराम हे एकच झाले शिव आणि महारुद्र एक झाले ही सत्यानाशाची सुरवात होती
खुद्द आचार्यांच्या गावात ज्या नंबुदीरी ब्राह्मणांनी त्यांना आईचे प्रेत जाळू दिले नाही त्यांनी आचार्यांचे आडनाव नंबुदीरी होते असे सांगायला सुरवात केली आणि ज्या श्रीकृष्णाच्या मंदिरात त्यांना प्रवेशही न्हवता ते मंदिर त्यांचे खानदानी मंदिर असल्याचा प्रचारही सुरु केला खुद्द शंकराचार्यांना शिवाचे अवतार मानून त्यांच्या तोंडून निगम धर्माची स्थापना करवली गेली ह्यामुळे शैव धम्म जवळ जवळ १२०० वर्षे केरळात झोपी गेला आणि वैष्णव नाम्बुदरीचे वर्चस्व वाढत जाऊन चातुर्वर्णाचा पगडा केरळात अतोनात वाढला .
शंकराचार्यांना समाजपतित बौद्ध धर्म आणि समाजपतित तंत्र ह्यांचा पाडाव करून नवा धर्म आणायचा होता . खरेतर त्यांनी त्याजागी एक सामाजिक पातळीवर आधिक उन्नत धम्म आणायला हवा होता त्यांची प्रज्ञा निश्चितपणे त्या लायक होती पण त्यांनी त्याजागी आधिक समाजपतित असा चातुर्वर्ण्याने पीडित हिंदू धर्म आणला . हे त्यांनी जाणीवपूर्वक केले नाही पण त्यांच्या हातून हे झाले एरव्ही अद्वैत मांडणाऱ्या शंकराचार्यांनी आयुष्यभर अध्यात्म मोक्ष मुक्ती वेगळी आणि सामाजिक व्यवस्था वेगळी असे द्वैत पाळावे ह्याहून अध्यात्मिक शोकांतिका कुठली ? एका अर्थाने हा जिझस चातुर्वर्ण्याच्या क्रुसावर स्वतःहून क्रुसिफाय झाला
( पुढचाल )
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक ७ लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
शंकराचार्यांचा मृत्यू आणि त्यांच्यापासून शिकावयाचे धडे
शंकराचार्यांचा मृत्यू हा वादाचा विषय आहे . त्यांच्या मृत्यूबद्दल पांच कथा आहेत त्यातील दोन त्यांच्या समर्थकांनी सांगितल्या आहेत ज्या चमत्कारांनी नटलेल्या आहेत
पहिली उत्तराखंडातील केदारनाथमध्ये आसाममध्ये अभिनवगुप्ताचा पराभव करून ते परतले व त्यानंतर त्यांच्या देहाचे रूपांतर लिंगात झाले आणि हे लिंग केदारनाथच्या लिंगात विलीन झाले असे सांगितले जाते . त्यांनी केदारनाथच्या लिंगात समाधी घेतली असेही सांगितले जाते पण ते असे अचानक का गायब झाले हे मात्र कुणी सांगत नाही
दुसरी कांचीत त्यांना आपला मृत्यू कळून चुकला त्यांनी सर्व पीठांची व्यवस्था लावली नियम आखून दिले आणि मग ते गोविंदम गोविंदम असे गुरुचे नाव घेत गायब झाले
तिसरी फॅनेटिक वैष्णवांची आहे ह्या कथेनुसार आसाममध्ये त्यांनी अभिनवगुप्ताला हरवले आणि अभिनवगुप्ताने त्यांना विष घालून मारले
चौथी त्यांच्या विरोधकांची बौद्धांची आहे त्यांच्या मते शंकराचार्य ह्या बौद्ध पंडितांच्या कडून हरले आणि लाज वाटून त्यांनी उडी घेतली
पाचवी नकुलीश दर्शनाची ह्याबाबतीतील कथा अजीबोगरीब आहे ह्या कथेनुसार
शंकराचार्य आपला दिग्विजय पूर्ण करून परतले . सगळ्या पीठप्रमुखांना त्यांनी व्यवस्था कशी चालवायची ह्याविषयी मार्गदर्शन केले आणि ते नेहमीप्रमाणे झोपी गेले . त्यांच्या ह्या विजयाने नकुलीश मात्र अस्वस्थ होते . कारण अंतिमतः शंकराचार्य चातुर्वर्णाचा पुरस्कार करत होते जो नकुलीशांना अमान्य होता . शंकराचार्यांना हे पटवायचे असेल तर त्यांचा हा दिग्विजय उधळून लावणे आवश्यक होते आणि त्यासाठी त्यांचा संपूर्ण पराभव करणे ही आवश्यकता होती
दुसऱ्या दिवशी शंकराचार्य नेहमीप्रमाणे उठले . आंघोळीसाठी पादुका काढून पाण्यात शिरले . नकुलीशांनी चांडाळांचा वेष धारण केला आणि ते शंकराचार्य पाण्याबाहेर येण्याची वाट पाहू लागले . शंकराचार्य येताच त्यांनी त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले , '' आचार्य , मी चांडाळ , शूद्र ! मल्याळी प्रथेप्रमाणे ४० हात दूर राहावयास हवे पण आपण शैव ब्राहमण असल्याने वैष्णव प्रथा मानत नसाल म्हणून आपणास स्पर्श धारण करण्याचे धैर्य दाखवत आहे मी ऐकून आहे कि काशीत आपण चांडाळांना जवळ केलंत आणि आता मात्र त्यांना आपण दूर दूर लोटत आहात पण ज्याला प्रश्न पडलेत त्या चांडाळांनी कुठे जावे माझ्या प्रश्नांची उत्तरे फक्त आपण देऊ शकता आपण ती द्याल का ?''
'' अवश्य ! ब्रह्मज्ञान देणे माझे कर्तव्य आहे . ''
''मीही आत्मा मानतो आपणही आत्मा मानता आपण स्वर्ग मानता आपण नरक मानता ''
'' हो स्वर्ग म्हणजे सदमार्गामुळे तयार होणारी मनाची अवस्था नरक म्हणजे असतमार्गामुळे तयार होणारी मनाची अवस्था आत्मा त्यापलीकडे असतो तो नित्य असतो ''
'' मग मी आत्मा असूनही अस्पृश्य कसा ?''
'' ना तू अस्पृश्य ना आत्मा अस्पृश्य !''
''म्हणजेच माझा आत्मा ब्रह्म आहे आणि शरीर ''जगत ''आहे !''
'' हो''
'' का हे ''जगत'' मिथ्थ्या आहे ?''
''हो''
'' का ही समाजव्यवस्था ''जगत '' आहे ?''
'' हो ''
'' जर समाजव्यवस्था ''जगत'' असेल जर हे शरीर जगत असेल तर शरीराला लावल्या जाणाऱ्या वर्ण आणि जातीही ''जगत'' नाहीत का ?''
'' त्याही ''जगत'' आहेत ''
'' जर त्या ''जगत'' असतील आणि जर ''जगत'' मिथ्या असेल तर वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थाही मिथ्थ्या नाहीत का ?''
''हो !''
" मग आपण त्या का सत्य मानत आहात ? जगत मिथ्थ्या आहे म्हणून सतत बदलते आणि जगतातील व्यवस्थाही सतत बदलतात त्यांना सनातन सत्य मानणे हे आपल्या अद्वैताच्या विरुद्ध नाही का ?''
ह्या प्रश्नांनी शंकराचार्यांचे डोळे उघडले त्यांनी विचारले '' आपण ज्ञानी आहात आपण कोण आहात ?''
'' मी नकुलीश आहे !"
'' साक्षात पतंजलीनाथ आणि लकुलीशनाथांचे गुरु आचार्य नकुलीश ?''

त्यांनी नकुलीशांना नमस्कार केला . ते सकाळी परतले . त्यांनी सर्व शिष्यांना बोलवून सांगितले
'' मी अद्वैती ! समाजात आणि अध्यात्मात ह्या क्षणापासून भेद मानत नाही मी शैव मला चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य नाही म्हणूनच माझ्या प्रत्येक पीठावर प्रमुख म्हणून मी चार वर्णाचे चार विद्वान बसवणार आहे आणि समाजाची शैव तत्वानुसार समता तत्वावर आधारित नवी रचना करणार आहे . मी नवे धर्मशास्त्र रचण्याचा निर्णय घेतला आहे . मला चार प्रमुख मिळेपर्यंत जे आहेत ते प्रमुख राहतील . जो श्रेष्ठ निघेल त्याला मी कायम करेन उरलेल्या तिघांना उपप्रमुख म्हणून काम करावे लागेल '
त्यांच्या ह्या उद्गारांनी एकच खळबळ उडाली . क्षत्रिय , वैश्य , शूद्रांच्या हाती काम करणे ? पापम पापम !
एकजण म्हणाला ''शंकराचार्यांचे डोके फिरले आहे ''. दुसरा म्हणाला "तुम्ही फक्त आज्ञा दिली पण खरे काम प्रमुखांनी केले ''
चारी प्रमुख शिष्य असल्याने गुरुची आज्ञा त्यांना शिरसावंद्य होती . ते तयार झाले पण जे कर्मठ होते ते मानेनात . शंकराचार्यांना ह्याचे वाईट वाटले आणि त्यांनी शांतपणे सगळ्याच शिष्यांच्याकडे पाठ फिरवली आणि हिमालयाच्या दिशेने चालायला सुरवात केली . त्यानंतर शंकराचार्य कुणालाच दिसले नाहीत .
ह्या कथेतील चमत्कार काढून टाकला तरी एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे त्यांना शैव असणाऱ्या विद्वान चांडाळाने म्हणजेच आत्ताच्या भाषेत एका दलिताने हरवले अर्थात ह्या कथेत एक प्रश्न उरतोच तो म्हणजे चार वर्णाचे चार प्रमुख म्हणजे आडवी व्यवस्था कायम राहतेच जी मला अमान्य आहे म्हणजे शंकराचार्यांच्या बोलण्यातून इथेही जातिव्यवस्थेचा उभा सुम्भ जळलाय पण आडवा पीळ गेलेला नाहीच .
नकुलीशदर्शन मानणाऱ्यांची श्रद्धा अशी कि शंकराचार्य पुन्हा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी पुनर्जन्म घेणार आहेत
ह्या पांचही कथेतील सत्य काय असत्य काय हे कधीही कळणार नाही पण एक मात्र खरे शंकराचार्यांचा मृत्यू अवघ्या बत्तिसाव्या वर्षी झाला
शंकराचार्य पुनर्जन्म घेवोत न घेवोत एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे आपण सर्वांनी चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था फेकून द्यायच्या आहेत
शंकराचार्यांच्यापासून शिकावयाचे धडे
शंकराचार्यांच्या आयुष्यापासून आपण काही धडे निश्चित शिकतो
१ पहिला निर्वाण प्राप्त झाले म्हणून एखाद्या मुक्त पुरुषाला व स्त्रीला समाज आणि विज्ञान ह्यांच्यात गती प्राप्त होईलच असे नाही . ती व्यक्ती समाजशास्त्र वा अर्थशास्त्र वा राज्यशास्त्र ह्याबाबत हिमालयी चूक करू शकते
२ ज्यांना आपण सामावून घेऊ इच्छितो ते सामावले जातीलच असे नाही उलटपक्षी सनातनी असूनही तेच तुम्हाला गिळंकृत करण्याचा प्रयत्नही होऊ शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो
३ राजकीय ताकद सर्वच अध्यात्मिक चळवळी स्वतःसाठी वापरते यादव राजांनी आणि विजयनगरच्या साम्राज्याने शंकराचार्यांना वापरले आणि श्रीकृष्णाच्या द्वारे चातुर्वर्ण्य बळकट करून आपली वंशपरंपरागत सत्ता आधिक बळकट केली
४ प्रत्येकवेळी सभ्यता आणि शास्त्रीयता जिंकेलच असे नाही भक्तीवादी शैवांनी महायान शाखेची स्थापना करून बौद्ध धम्म गिळंकृत केला पुढे वैष्णवांनी शैव धम्म गिळंकृत केला आणि नंतर इस्लामने जगभर विशेषतः उत्तर आशियात पसरलेल्या ७०% शैव आणि वैष्णव अशा दोन्ही प्रकारच्या हिंदू धर्मवासीयांना गिळंकृत करून आपले वर्चस्व स्थापन केले ह्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते धार्मिक वर्चस्वाची लढाई तेच जिंकतात जे राजकीयदृष्टया जास्त सशक्त असतात अध्यात्मिक दृष्टया सशक्त असणारे लोक राजकीय पातळीवर कमजोर असतील तर हमखास हरतात ईश्वर राजकीय पातळीवर अध्यात्माला मदत करत नाही हेच खरे किंवा ईश्वर अस्तित्वात नाही हे आधिक खरे !
( इतिश्री )
Sunday, September 11, 2016
नक्की मला आठवत नाही पण बहुदा गो म कुलकर्णी ह्यांनी असं म्हंटल होतं कि दुकानाचं दिवाळं निघालं कि हिशेबाच्या पोथ्या बाहेर पडतात . साहित्यातही हेच घडते . माझंही बहुदा कवी म्हणून असं काही झालं असावं . एकेकाळी वादळवेगानं कविता लिहणारा मी आता जवळ जवळ मुंगीच्या वेगाचा झालोय आणि प्रथमच स्वतःच्या सगळ्या कविता बाहेर काढून हिशेब सुरु झाले . स्वतःच्याच कवितांचं वर्गीकरण करतांना जीव मेटाकुटीस आलाय . फायदा एक झाला तो म्हणजे ह्या कविता ब्लॉग आणि फेसबुकवर टाकता आल्या आणि काही वाचकांच्यामुळे आरश्यात पाहता आले . हिशेब संपलेला नाही पण साधारण ५ ५ कवितासंग्रह होतील असे दिसते . असो .
भारतीय समाजाची दशसमुदाय रचना आणि हिंदू ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी श्रीधर तिळवे नाईक
१) भारतीय समाजव्यवस्था
भारतीय समाज व्यवस्था ही एक गुंतागुंतीची समाजव्यवस्था असून भारतात तिला पाहताना
१वर्णाधिष्ठित
२जात अधिष्ठित
३वर्गाधिष्ठित
अश्या तीन दृष्टीकोनातून पाहिले जाते . माझ्या मते हे सर्व दृष्टीकोन उथळ असून भारतीय समाजव्यवस्था समजायला त्यांचा काहीही उपयोग होत नाही वैदिक निगम आणि युरोपिअन ह्यांनी प्रचलित केलेले हे मॉडेल आता फेकून देण्याची वेळ झाली आहे . मी माझ्या भारत भ्रमणातून मला सापडलेल्या मॉडेलची मांडणी इथे करत आहे .
२) भारतीय दशसमुदायी समाजरचना
माझ्या मते भारतीय समाजव्यवस्था ही दहा समुदायांच्या बृहत जालांनी विणलेले महाजाल असून
ते सातत्याने विकास पावत अपडेट होत असते . त्याच्या अपडेट होण्याची गती मंद असल्याने ते वरकरणी स्थिर वाटत असते पण लॉंग टर्म मध्ये ते इवोल्व झालेलं दिसते . त्यामुळेच भारतीय समाजरचना ही एक गुंतागुंतीची समाजरचना भासते आणि गेली दोन दशके ती विचारवंताना चकवा देते आहे . तिचा तोंडवळा वर्ण , जाती , वर्ग असा भासत असला तरी प्रत्यक्षात ती दशसमुदायी आहे हे समुदाय खुले असून त्यांचा आकार चेंडूसारखा आहे त्यामुळे तोचतोचपणा आणि सावकाश सरकणारा नवेपणा ह्यांच्यात ती घुसमटत असते वसाहतवादाच्या प्रभावामुळे आणि मनुस्मृतीच्या अतिरिक्त माऱ्यामुळे आपण वर्ण आणि जात ह्यांच्या आहारी जाऊन बोलत असलो तरी त्यामुळे भारतीय समाजरचना कळण्याची सुतराम शक्यता नाही . मी सुचवलेले दशसमुदायी मॉडेलच ह्याबाबत जास्त कामाचे आहे हे दशसमुदाय म्हणजे दहा चेंडू आहेत हे चेंडू जेव्हा एकावर एक चढतात तेव्हा ती उभ्या अक्षाची गुलाम वाटते जेव्हा ते एकमेकास लागून पसरतात तेव्हा ती आडव्या अक्षाची वाटते आणि ते स्पर्श न करता विखुरतात तेव्हा आख्खा भारत पोस्टमॉडर्न वाटायला लागतो . हे समुदाय पुढीलप्रमाणे
१ पुरोहित समुदाय PUROHIT SAMUDAY
धर्मशास्त्री SUPREME JUDITIAL DHARMSHASTRI
न्यायाधीश JUSTICE-NYAYADHISH
वैद्य VAIDYA
ब्राह्मण BRAHMINS
गुरव GURAV
भगत BHAGAT
महाभक्त BHAKT
भटके BHATKE SADHU
देवसेवक SEVAK ह्या समुहानी बनलेला आहे.
२ शासक समुदाय SHASAK SAMUDAY
राजा वा राज्याधीपती RAJYADHIPATI
पंतप्रधान PRIME MINISTER
मंत्री MINISTERS
सेनापती SENAPATI
योद्धे WARRIORS
अधिकारी OFFICERS
सैनिक SOLDIERS
भटके BHATKE
सेवक SEVAK ह्या समुहानी बनलेला आहे.
३ व्यापारी पणी समुदाय 3 VYAPARI PANI SAMUDAY
श्रेष्ठी / भांडवलदार SRESHTHI
निर्माता PRODUCER
कारागीर ARTISANS
वंजारी WANJARI/CARRIERS
वितरक DISTRIBUTORS
दुकानदार SHOPPERS
कामगार WORKERS
भटके विक्रेते BHATKE ह्या समुहानी बनलेला आहे.
४ कृषी समुदाय 4 AGRICULTURS
श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI
क्षेत्रकरी FARM-OWNER
शेतकरी FARMER
कुणबी CULTIVATERS
माळी GARDENER
शेतमजूर FARM-WORKERS
भटके BHATKE
शेत सेवक SERVICERS ह्या समुहानी बनलेला आहे.
५ पशुपालक समुदाय 5 ANIMALRS
श्रेष्ठी SHRESHTHI
धनगर SHEPHARDS
गोपालक GOPALAKS
खाटिक BUTCHERS
कामगार WORKERS
सेवक SERVICERS
भटके BHATKE ह्या समुहानी बनलेला आहे.
६ आदिवासी समुदाय 6 ADIVASI
७ सर्जक 7 SARJAK
बुद्ध व मुक्त BUDDHAS
वैज्ञानिक DISCOVERER
तंत्र वैज्ञानिक INVENTOR
कलावंत ARTIST
दार्शनिक DARSHNIK
नवविचारकार IDEOLOGIST
व्यवस्थापनगुरु GURU-MANEGER
चिन्हवैज्ञानिक SIGNOVENTOR
प्रोग्रामर PROGRAMMER ह्या समुहानी बनलेला आहे.
8 DNYANKARI
ज्ञानश्रे ष्ठी SHRESHTHI
ज्ञानव्यवस्थापक KNOWLEDGE MANEGERS
विद्वान SCHOLAR
संपादक EDITORS
आचार्य ACHARYAS
शिक्षक TEACHERS
पत्रकार JOURNALIST
कामगार WORKERS
ज्ञानाधिकारी KNOWLEDGE OFFICERS
विद्यार्थी STUDENTS ह्या समुहानी बनलेला आहे.
९ दास समुदाय 9 DAS
गावदास GAVDAS /SI I.E. UNTOUCHABLES
नगरदास NAGARDAS/SI
देवदास DEV DAS/ DEV DASI
राजदास RAJDAS/SI
गृहदास GRUHDAS/SI
व्यापारदास VYAPARDAS/SI
कृषिदास KRUSHIDAS/SI
पशुदास PASHUDAS/SI
गणिका GANIK/KA ह्या समुहानी बनलेला आहे.
१० बाहेरील समुदाय वा उपरे समुदाय 10 EXTERNAL
नेमाडे ह्या दहाही समुदायांना कवेत घेण्याचा प्रयत्न करतात
३ फॉर्म आणि हिंदू
हिंदू या कादंबरीच्या फॉर्मबद्दल मी बोलणार नाही कारण ह्या फॉर्ममधील काही गोष्टी मी माझ्या अडॉहॉकाबानासुना ह्या कादंबरीबाबत वापरल्या आहेत. अडॉहॉकाबानासुना आधी आली नसती तर नेमाडेंच्या हिंदूचे अनुकरण काही ठिकाणी झाले आहे असा शिक्का नक्कीच माझ्यावर मारला गेला असता उदाहरणार्थ अडॉहॉकाबानासुनातील
हा भाग व हिंदुतील यक्षप्रश्नाचा भाग (पान २६१ ते २६९)
४ तीन नेमाडे आणि हिंदूतील नेमाडे
साम टिव्हीवर चर्चेत भाग घेताना संजय आपटे ह्यांच्या प्रश्नाला 'लेखक नेमाडे जातीयवादी आहेत का ?' ह्या सुराला उत्तर देताना मी म्हंटले होते कि नेमाडेंचे तीन टप्पे आहेत.
१) लेखक नेमाडे जे अत्यंत प्रामाणिक आहेत अस्सल आहेत आणि जे मुळीच जातीयवादी नाहीत.
१) लेखक नेमाडे जे अत्यंत प्रामाणिक आहेत अस्सल आहेत आणि जे मुळीच जातीयवादी नाहीत.
२) लेखकराव नेमाडे जे टीकास्वयंवरमध्ये प्रथम बालरुपात अवतरतात आणि ज्ञानपीठ मिळेपर्यंत वाढतच जातात.
३) लेखकराज नेमाडे जे साहित्यात ज्ञानपीठानंतर राजकारण्यासारखे बोलतायत आणि कोल्यांट्य़ा उडया मारतायत आणि जातीवादाचे समर्थन करतात. सुदैवाने हिंदू ही कादंबरी प्रामाणिक व अस्सल लेखक नेमाड्यांनी लिहिली आहे. नामदेव ढसाळ जसे कवितेबाहेर वाट्टेल तसे कोलांट्या उड्या मारायचे मात्र कविता लिहिताना मांजरासारखे योग्यच पद्धतीने पायावर पडायचे तसे काहीच नेमाडेंचे आता होणार कि काय अशी शंका येते आहे.
लेखक नेमाडेंना राम राम आणि देशीवादी नेमाडेंना दुरूनच सलाम हे धोरण नाहीतरी मी पूर्वीपासून अवलंबले आहेच .
५ मी हिंदूची समीक्षा का करतोय ?
हिंदू जेव्हा मी आल्या आल्या वाचली तेव्हा ती मला मुळीच आवडली नव्हती नंतर सहा महिन्यांनी वाचली तेव्हा मात्र ती बरी वाटली आणि तिसऱ्या वाचनात मात्र ती आवडायला लागली ह्याचे कारण उघड आहे. हिंदू कोसलाप्रमाणे चटकदार नाही ती एखाद्या दारू प्रमाणे आहे. प्रथम कडवट चव पण नंतर ती चढत जाते. कोसला नंतरच्या वाचनात बालिश वाटत जाते. हिंदुत नेमके उलट होते. एखादा अनवट शास्त्रीय राग सतत ऐकल्याने आवडत जावा तसे होते.
प्रश्न असा कि मग आत्ताच हिंदुवर का लिहावे? कारणे उघड आणि स्पष्ट आहेत.
अ) सर्वात महत्वाचे कारण नेमाडेंचा प्रवास हा गावातून बाहेर पडलेल्या साठोत्तरी पिढीचा प्रवास आहे. त्यामुळे नेमाडेंच्या प्रवासात मला अनेकदा माझ्या बापाचा प्रवास दिसतो. नेमाडेंच्या वडीलात अनेकदा शेतात आणि व्यापारात खपलेले माझे आजोबा दिसतात. नेमाडे हे ह्या अर्थाने आमचे साहित्यीक बाप आहेत. स्वत:च्या बापाला समजून घेणे आणि नेमाडेंना (आणि इथे खंडेरावाला) समजून घेणे हे काहीसे एकच आहे. मला नेहमीच असे वाटते कि आपले पूर्वज समजून घेण्याचा साहित्य हा एक विश्वासपात्र मार्ग आहे. (चित्रपट आणि नाटकाला हि विश्वासपात्रता प्राप्त नाही कदाचित पुढे प्राप्त होईलही सीरीअल ही त्यात नव्वदोत्त्तरी भर) साहजिकच हिंदुवर लिहिताना मला माझे आजोबा आणि बाप आठवतायत.
आ) हा मजकूर मी आत्ताच का लिहितोय असाही प्रश्न मला आत्ता ह्या क्षणी पडतोय कदाचित मुंबईहून मी माझ्या गावी आलोय त्याचा तर हा परिणाम नाही ना अशीही शंका दाटून येतेय. गाव आपला पाठलाग करत आपण गावाचा हेही हिंदुवर लिहिण्याच एक कारण असेल. मुंबईत हिंदूचे होणारे वाचन आणि आपल्या गावात होणार वाचन ह्यामुळे हा फरक पडला असेल का असाही प्रश्न मला पडतो आहे.
इ) हा प्रश्न पडण्याचे कारण असेही असेल कि अनेकदा खंडेराव गावात असतो. तेव्हा त्याला गावातले लोकसाहित्य थोर वाटायला लागते. मग ते शाहिरी चौके असोत कि धनगरी गाणी असतो पण तो शहरात पोहोचला कि त्याची आर्कीऑलोजी सुरु !
ई) चौथे कारण अर्थातच ह्या कादंबरीतील नेमाडे हे अस्सल लेखक आहेत हे आहे . नेमाडे लेखन करताना विशेषतः कादंबरी लेखन करताना चिकित्सक असतात पण देशीवादी नसतात त्यामुळे समीक्षा करताना त्यांचा डोक्यात चालणारा साहित्य व्यवहार कादंबरी लिहिताना ते सहजरीत्या बाजूला सरतात आणि निके तेवढे निवडावे असे चालू होते.
उ) ह्या कादंबरीत नेमाडेंनी एक उत्कृष्ट तंत्र वापरले आहे. ह्या तंत्रानुसार खंडेराव ,चित्रपटाप्रमाणे घटनापट पहात जातो आणि हा घटनापट त्याच्याबरोबर आपण पहात जातो आणि अचानक चाप्लीनच्या चित्रपटात शाब्दिक पाट्या येतात तश्या खंडेरावचा स्टीलमध्ये घटनापट थबकतो आणि शब्दपाट्या येतात 'खंडेराव आता हे नीट साठव' 'खंडू आता तू प्रमुख' वगैरे. समीक्षा करताना ही अश्या अनेक स्टील पाट्या येतायत .
ऊ) मी टीकाहरणमध्ये कोसला, जरीला, झुल, बिढार (ह्यातच हूल येते) मेलडी आणि टीकास्वंवर ह्या ग्रंथावर लिहिले होतेच आता हिंदूवर लिहितोय कारण ह्या निमित्ताने त्यांच्या सर्व साहित्यावर लिहिणे पूर्ण होईल हि आशा आहे.
ए) नेमाडे समीक्षक म्हणून जो वाचाळपणा करतायत त्याचा त्यांच्या कविता व कादंबरी लेखनाशी संबंध जोडण्यात काही अर्थ नाही. निखळ कलाकृती म्हणून आपण त्यांच्याकडे समीक्षक नेमाडेंना बाजूला काढून पाहू शकतो. ह्याचा अर्थ मी सरंचनावादी भूमिका घेतोय असे नाही तर ह्या समीक्षक नेमाडेंना वगळून ह्या कादंबरीत जे विचारवंत नेमाडे येतात त्यांचा ही विचार करतोय.
६ मार्गी देशी आणि मोहेन्ज्दडो
मी एक म्हणणे नेहमी मांडले आहे ते म्हणजे नेमाडे लेखक म्हणून अजिबात देशीवादी नसतात. मार्गी आणि देशी ह्यांचा उत्कृष्ट संगम ह्यांचा कादंबऱ्यात आढळतो हिंदू ही कादंबरी ह्याला अपवाद नाही.
ह्या कादंबरीची सुरुवातच युरोपिअन लोकांनी सुरु केलेल्या अर्कीओलोजीने होते. मोहंजोदडो अर्कीओलोजी, अर्थ्रोपोलोजी आणि सोशिओलोजी हाच पहिल्या पन्नास पानांचा मजकूर आहे. मात्र ह्या मजकूराला नेमाडे खास देशी touch देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
महोन्जोदडो संस्कृतीचे काय करायचे हा एक यक्षप्रश्न आहे. ही संस्कृती व्यापारी समुदायाने जन्माला घातली होती. हे आत्ता स्पष्ट होत चालल्याने नेमाडेंचा गोंधळ उडाला आहे. हे स्पष्ट दीसते एकीकडे हिंदूची आद्य संस्कृती म्हणून त्यांना तीचावर क्लेम करायचा आहे तर दुसरीकडे ती व्यापारी समुदायाची असल्याने फेकूनही द्यायची आहे. हा dwikhandipana ह्या कादंबरीत वाहताना दिसतो.
गावातून स्थलांतरित होऊन हे लोक करणार काय? तर आणखी एक मोहंजोदाडो निर्माण करणार असे नेमाडे म्हणतात तेव्हा आपण आणखी विचारात पडतो कारण शहरांची संस्कृती हि फार काळ टिकत नाही अशी त्यांची ठाम धारणा आहे आणि हे देशीवादाला धरुन आहे. कारण खेड्यातील पिकाचामुळे जे भूमी सातत्य निर्माण होते ते शहरात कसे निर्माण होणार? त्यामुळे खेड्यातील संस्कृतीचे गुणगान प्रत्येक पानावर! प्रश्न असा खंडेराव मोहन्जोदडोत मग शोधतोय तरी काय ? हराप्पा संस्कृतीतील जाती, बांगड्या मोरगावमध्येही आढळतात त्यांचा अनुबंध तो शोधताना दिसतो. ५००० वर्षाचा एक विशाल फलक नेमाडेंना ह्या निमित्ताने उभा करायचाय हे स्पष्ट आहे.
उत्क्रांति सामाजिक आणि जैविक हे नेमाडेचे ऑब्सेशन आहे. खंडेरावने उत्क्रांतीवर सादर केलेला निबंध चमकदार आहे. पण त्याचा प्रतिवाद सहज शक्य आहे मोहनजोदड़ो ही हिन्दू संस्कृतीच्या उत्क्रांतीची सुरुवात आहे. साहजिकच नेमाडे तिथे अनेकदा स्टॉप घेतात. ह्या बरोबरच आणखी एक समांतर शोध आहे तो तीरोनी आत्याचा ! खंडेराव जीवापाड प्रयत्न करतो पण महानुभवी संन्यासिनी झालेली आत्या सापडत नाही
मोहन्जोदडो हि महानगरी संस्कृती होती असे खंडेरावाचे मत आहे आणि महानगरी संस्कृती विरुध्द कृषी संस्कृती असे द्विध्रुविकरण तो मांडतो . महानगरी संस्कृती ही शोषण करणारी, ऐतखाऊ आहे असे त्याचे मत आहे. मोहन्जोदडो ही अशी नागर शोषण करणारी असल्याने नाहीशी झाली असे त्याला वाटते. नागर संकृती ही आकाशात उंच जाते आणि युजलेस कुतुबमिनार बान्धते तर कृषी संस्कृती जमिनीत खोल जाऊन विहीर बांधते आणि पाणी आणते जे जीवनदायीनी असते असे तो सुचित करतो.
ही कादंबरी सुरु होते मोहन्जोदडोपासून ! इथेच वडील मरणांतिक आजारी असल्याची न्यूज मिळते. त्यानंतर मोरगावला पोहोचेपर्यंत त्याला ज्या आठवणी येतात त्या आठवणी म्हणजे ही कादंबरी.
प्रश्न असा कि नेमाडे मोहोन्जोदडो पासून कादंबरीची सुरुवात का करतात. दोन कारणे आहेत.
१. नेमाडे हे संस्कृतिसातत्याने विशेषत: हिंदू संस्कृतिसातत्याने पछाडलेले आहेत त्यामुळे हे सातत्य कादंबरीत आणण्यासाठी मोहन्जोदडो अपरिहार्य होते.
२. आणि दुसरे कारण ते भूमीसातत्याने पछाडलेले आहेत. भूमी सातत्य हे कृषी संस्कृतीचे वैशिष्ट तर त्याचे विरोधी पक्ष म्हणजे शहरी संस्कृती आणि तिचा पहिला आविष्कार म्हणजे मोहन्जोदडो
ही कादंबरी ह्या दोन्ही सातत्याचा आविष्कार करते एका अर्थाने नेमाडे मांडत असलेल्या देशिवादीचा ही कादंबरी सर्वोत्कृष्ट नमुना आविष्कार आहे आणि ह्या नमुन्याने बऱ्याच मार्गी गोष्टी आयात केल्या आहेत.
ही दोन्ही सातत्ये नेमाडेंना दोन समुदायात उभी करतात. १- ज्ञानकरी समुदाय २- शेतकरी समुदाय
प्रथम आपण ज्ञानकरी समुदायाचा विचार करू कारण सरतेशेवटी लेखक प्राध्यापक ज्ञानकरी समुदायाचा सदस्य आहे.
Subscribe to:
Posts (Atom)