माझा धाकटा भाऊ भारत तिळवे गेला. एक अनाकलनीय वादळ संपले . ज्याने एकेकाळी हवे तसे वारे फिरवले तो श्वासाला महाग होत गेला . श्रद्धांजली नाहीच कारण त्याची कशावरच श्रद्धा न्हवती . आयुष्यावरही ! जगण्यावरही !एकेकाळी दहा दहा जणांना अंगावर घ्यायला न घाबरणारा माझा हा भाऊ एका अनाकलनीय सर्वनाशात किरकोळ होत संपला . माझे त्याच्यावर आणि त्याचे माझ्यावर जबरदस्त प्रेम होते पण तरीही एका मोहोळने त्याच्या कोवळ्या वयात आमच्या दोघांच्यात अशी काही दरी पेरली कि ती काढता काढता माझे हात गंजले पण दरी गंजून गळून गेली नाही . अस्सल कोल्हापुरी असलेला माझा हा भाऊ त्याची शान राखत जगाचा निरोप घेता तर मी त्याला आनंदाने निरोप दिला असता पण स्वतःच्या आत काय चाललंय हे कधीही कळू न देणारा हा माझा भाऊ जातानाही अधिकच अनाकलनीय होत गेला . भारत , माझ्या भावा माझा तुझ्या ताठपणाला हा शेवटचा कडक सॅल्यूट !महापुरात लव्हाळे वाचतात वृक्ष नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस .
तुझा दादा
तुझा दादा
No comments:
Post a Comment