Friday, February 17, 2017

राजेंद्र बाणाईत : शेवटच्या ओळीवरून एक जाहीर प्रश्न विचारतो
तुम्हाला खूप बुद्धिमान आणि शरीराने अतिशय सुंदर प्रियेसी / पार्टनर मिळाली असती तर इतक्या सुंदर कविता तुम्ही लिहू शकला असता काय ? मुख्य म्हणजे तुमच्यातील कवी आज आहे असाच राहिला असता काय
स्वतःला सतत जागृत ठेऊन तुम्हाला काय मिळाले
तुम्हाला बुद्धिमान प्रियेसीचा नशा हवी होती .....असा माझा तर्क !
चुकले तर माफ करा !    



SHRIDHAR TILVE : 

तुम्ही जाहीरपणे विचारलय  म्हणून जाहीरपणे उत्तर देतोय  माझी प्रेयसी निर्वाण वा मुक्ती ! माझ्या सर्व कवितांच्या मुळांशी तीच आहे बाकी सर्व स्त्रिया ह्या माझ्या सेकंडरी स्पिरिच्युलीझम आहेत वा होत्या . ह्यातीलही मुख्य स्त्री माझी आई नंतर माझ्या दोन बहिणी माझी भाची प्रिया नार्वेकर जिने मला बापपण म्हणजे काय ते शिकवले बाकी प्रेयस्या ह्या माझ्या कधीच मुख्य श्रेयस न्हवत्या अपवाद काहीसा ज्ञचा आणि तिथेही तंत्रमार्गाने शेवटची उडी घेता येईल अशी अटकळ होती जी फसली त्यामुळे सुंदर बुद्धिमान प्रेयसी ह्या मिळणे मिळणे ही गोष्टच गैरलागू आहे कवी स्त्री असो कि पुरुष कधी ओप्पोझिट जेण्डर साठी अडून राहील ह्यावर माझा तरी विश्वास नाही आणि साधक असेल तर बिलकुलच नाही उलट अपोझिट जेंडर अनेकदा अडथळाच बनून साधनात येते अश्यावेळी मुक्ती कि कामवासना असाच प्रश्न निर्माण होतो आणि मी अश्यावेळी कामवासनेचा त्याग केला आहे तेव्हा जरतरला आयुष्यात फारसा अर्थ असत नाही ह्यातून फक्त अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक प्रश्नांची सरबत्ती सुरु होते 
 आपण  फारच काल्पनिक प्रश्नात अडकून आहोत काय असाच प्रश्न सर्वांनी विचारायला हवा . असे काल्पनिक प्रश्न ही आपल्या मनाची करमणूक असते किंबहुना मन स्वतःला शाबूत ठेवण्यासाठी ज्या युक्त्या करतं त्या युक्त्यांची ही बनवाबनवी असते अनेकदा पलायन असते फेसबुकवर आपण सर्वच अश्या पलायनात भाग घेऊन हे पलायन साजरे करत असतो ह्यातून मुक्ती सोडाच पण स्वातंत्र्याचीही शक्यता नसते फेसबुक हे ९९% सामूहिक पलायन आणि सामूहिक टाईमपास आहे आपण त्याचे किती बळी व्हायचे ही बनवाबनवी असते हे   लिमिट ज्याने त्याने ठरवावे बाय वे ही कविता प्रेयसीला नाही तर मित्राला उद्देशून आहे आपल्या प्रश्नांच्याबद्दल आभारी आहे . 
वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक
गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत  वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर  पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित्याच्या संदर्भात chosisme फार महत्वाची संकल्पना मानली जाते
रँडम हाउस ऑफ डिक्शनरी त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे देते

chosisme
[shaw-zeez-muh
Spell Syllables
·         Word Origin
noun
1.
a writing style in which plot and characterization are de-emphasizedand people, events, and setting are recorded as though seen by theauthor through the lens of a camera.
Origin of chosismeExpand
< French, equivalent to chose thing (see chose2) + -isme -ism
Dictionary.com Unabridged
Based on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.









प्रतिसृष्टीय युगात कॅमेरा फार महत्वाचा बनला आणि क्रयवस्तूही ह्या क्रयवस्तूंच्यावर फोकस करणारी नवी 


ऍन्टिनोवेल फ्रेन्च कादंबरीकार Alain Robbe-Grillet ह्याने लिहायला सुरवात केली आणि वस्तुवाद सर्वत्र पसरत गेला हिंदी कवितेत १९८५ नंतर त्याने उच्छाद मांडायला सुरवात केली मराठीत अरुण कोलटकरांची कॅमेरा ही कविता ह्या वस्तुवादाचे उत्तम उदाहरण आहे हिंदीच्या नादाने काही हिन्दीनिष्ठ मराठी कवीही वस्तुवादाचे मूळ आणि कुळ समजून न घेताच वस्तुवादी कविता लिहायला लागले माझा पोस्टमॉडर्नला विरोध असल्याने मी हळूहळू निर्वस्तुवादाकडे वळलो आणि त्यातूनच निर्वस्तुवादी कवितेचा जन्म झाला एका मराठी कवीने संपूर्ण युरोपियन एथॉसला चॅलेंज देणे मराठीतील कूपमंडूक परंपरेला पचणे अवघड होतेच गांडीत नाही किडा आणि भिकारी म्हणतोय मटण वाढा अश्या कलोनिअल  वातावरणात युरोपिअन एथॉसच्या दारात जाऊन युरोपिअन संवेदनशीलतेचे मटण भीक मागून खाणाऱ्यांना निर्वस्तुवाद हा खास भारतीय पद्धतीने तयार केलेला खादयप्रकार पचणे अवघडच देशीवादी समीक्षक तर महाभंपक त्यांनाही ही भारतीय थाळी पचली नाहीच मी अनेकदा म्हंटले आहे माझे साठोत्तरीविरुद्धचे बंड केवळ मराठी साठोत्तरीविरुद्ध नाही ते युरोपिअन ,आणि  हिंदी , कोकणी आणि कन्नड अश्या भारतीय साठोत्तरीविरुद्धही आहे निर्वस्तुवादी कविता हा त्याचा एक भाग आहे . 








Tuesday, February 14, 2017

शैव सावित्रीबाई फुले आणि व्हॅलेंटाईन डे

सावित्रीबाई फुले ह्या स्त्रीशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत आणि महात्मा फुलेंच्या पत्नी म्हणूनही ! पण बऱ्याच जणांना हे माहीत नाही कि त्या शैव होत्या . आपले शैवत्व त्यांनी कधीही लपवून ठेवले नाही . शिव हे त्यांचे उपास्य दैवत होते आणि सत्यशोधक समाज आणि शिव आराधना ह्यांची त्यांनी अतिशय उत्कृष्ट सांगड घातली होती . त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या देवनागरी लिपीबरोबर मोडी लिपीतही लिखाण करायच्या . त्यामुळेच त्यांच्या काही कविता ह्या मोडी लिपीत  सापडल्या आहेत . म्हणजे निदान १९ व्या शतकापर्यंत तरी देवनागरीने मोडीला मोडीत काढले न्हवते हे स्पष्टच दिसते ( मोडीत काढणे हा वाकप्रचार ह्या संदर्भात आलाय का तेही पाहायला हवे )

सावित्रीबाईंनी '' काव्यफुले '' (१८५४)ह्या त्यांच्या ४१ कवितांच्या काव्यसंग्रहात
(१)
शिकणेसाठी जागे व्हा.
(२)
मनु म्हणे
(३)
ब्रह्मवती  शेती.

(४)
शूद्रांची  दुखे
(५)
इंग्रजी माऊली.
(६)
शूद्र शब्दाचा  अर्थ
(७)
बळीस्तोत्र.
(८)
शूद्रांचे  परावलंबन.
(९)
तयास मानव म्हणावे  का?
(१०)
अज्ञान
(११)
सावित्री व जोतीबा संवाद.
(१२ )

अश्या खास फुलेवादी सत्यशोधकीय कविता लिहिता तच पण त्यांच्या प्रार्थनापर  कवितात

शिवप्रार्थना

शिवस्तोत्र .

ईशस्तवन

ह्या तीन  कविता भगवान शिवांच्यावर लिहिल्या आहेत त्या प्रथम शिवाची प्रार्थना पुढीलप्रमाणे सुरु  करतात




शिव  प्रार्थना
(ओवी )
सत्य सुंदर शिव थाट । शिरी शोभे जटाजपळट ॥
वाहती गंगाधरा उत्कट ॥ चर्तुदश विद्येच्या ॥ १ ॥
त्रिलोचन  त्रितिक्षू  ललाट ॥ त्रिपुरांतक त्रिभुवन चत्रपट
स्कंधी सर्प  नृत्या चा  थयथयाट ॥ चाले कर्ता  कर्म  क्रियेचा  ॥ २ ॥
आणि शेवट असा
नमस्कार तुज शिवप्रभो ॥ आदि निर्मिक  स्वयंभुविभो  ॥
अज्ञान नष्ट  कारी  वर सर्वा  लाभो ॥ प्रार्थना  ही सावित्रीची  ॥ ५ ॥


काव्य रचण्याच्या आधीही सावित्रीबाई शिवाला वंदन करताना  म्हणतात
शिवस्तोत्र
शिव  तुझे जपे स्तोत्र
प्रेम भावे गातसे मी
विश्वंभरा तू महेशा
सदभावे  तुला वंदी ॥
(श्लोक : वंसतचतलका)

मग शैव परंपरेनुसार त्या शिवाचे पुढीलप्रमाणे स्तवन करतात


ईशस्तवन
नमन तुला । शंकरा । श्रीधरा ॥ धृ ॥
नीलकंठ शिवशंभू सदाशिव
तुजीया चरणी  आमचा  भाव
अज्ञानी लेकरा । उद्दरा ॥
आम्ही लेकरे तुला प्रार्थितो
विद्या देई ज्ञान इच्छितो
दैन्यासुर संहारा । श्रीधरा ॥


अगदी  पिवळा चाफा ह्या कवितेतही त्या चाफ्यालाही  शिवाच्या संदर्भात पाहतात आणि म्हणतात

 शिव सत्याचे
सुदंशु  भूषण
सुंदरतेचा
पुतळा जणू  तो ॥ ४ ॥
आपणाला बी कवींचा चाफा माहित असतो पण बी कवींच्या कितीतरी आधी सावित्रीबाईंनी

पिवळा चाफा
(अक्षर छंद)
पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो ॥ १ ॥
नाव तयाचे
सुवर्ण चंपक
सृष्टी दागिना
मनास पटतो ॥ २ ॥
रंग मजेचा
ढंग दिमाखही
गंध तयाचा
शरीरि  खेळतो ॥ ३ ॥

असे लिहून ठेवले आहे ह्याशिवाय जाईवर जाईचे फुल आणि जाईची कळी अश्या  दोन कविता आणि गुलाबावर गुलाबाचे फूल अश्या कविता आहेतच ह्या कविता माळीपणाला साजेश्या अस्सल आहेत आणि थेट आणि ऐहिक आहेत गूढवाद आहे पण सूचक आहे .  मानवप्राणी हा गुलाबासारखा  आहे हे शेवटी सुचवलेले आहे .

इंग्रजी भाषेबाबतही त्या स्पष्ट आहेत त्या लिहितात
इंग्रजी  माऊली
(अभंग)
इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी
शूद्रांना उद्दारी । मनोभावे ॥
इंग्रजी माऊली । नाही मोंगलाई
नाही पेशवाई । मूर्खशाही ॥
इंग्रजी माऊली । देई सत्य ज्ञान
शूद्राला जीवन । देई प्रेमे ॥
इंग्रजी माऊली । शूद्रांना पान्हा पाजी
संगोपन आजी । करतसे ॥
इंग्रजी माऊली । तोडते पशुत्व
देई मनुष्यत्व । शूद्रलोका ॥

तेव्हा इंग्रजी हवीच आणि मराठीही हवी

ह्या संग्रहातील कवितांना त्याकाळातल्या काव्यशास्त्राच्या मर्यादा  पडलेल्या आहेत पण जे आहे ते महत्वाचे आहे स्त्रीवादी कवितेची  त्या सुरवात आहेत . तेव्हा व्हॅलेंटाईन डे साजरा करतांना आपल्या ह्या सावित्रीमायला थोडे आठवावे . असो .  सावित्रीबाईंची आठवण म्हणून  आपल्या आपल्या वॅलेन्टाईनला गुलाबाबरोबर चाफा आणि जाईही  द्यायला काय हरकत आहे ?

श्रीधर तिळवे नाईक

संदर्भ
सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ



Wednesday, January 11, 2017

हिंदू कोण ?शैव कोण ? आणि आद्य शंकराचार्य शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक 
हिंदुत्ववाद्यांशी लढायचे असेल तर हिंदू कोण ह्या मूलभूत प्रश्नाचे उत्तर नीट द्यावे लागेल आणि ह्या प्रश्नाचे उत्तर टाळून जर कोणी ही लढाई लढू पाहत असेल तर तो अमूर्त शक्तीशी लढून ही लढाई हरणार हे उघड आहे . आद्य शंकराचार्यांच्यावर लिखाण करण्याचे कारण ह्या प्रश्नाचा शोध घेणे हे होते . फुले आणि आंबेडकरांनी पुरवलेल्या वैचारिक खाद्यावर संतुष्टपणे जगण्याऱ्या विचारवंतांना ह्यांच्या पलीकडे जाणारे चिंतन नकोच आहे त्यामुळे ह्यांच्याशिवाय काही वेगळ्या मांडण्या नकोच आहेत . हिंदुत्ववादाची जेवढी परखड मीमांसा बाबासाहेबानी केली तेवढी कुणीच केली नाही हे खरे असले तरी ही मीमांसा प्रामुख्याने हिंदू धर्माची होती शैव धम्माची न्हवती त्यामुळे बाबासाहेबांच्या विश्लेषणाला मर्यादा पडलेली आहे . बाबासाहेब शैव धम्म आणि हिंदू धर्म ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मानून विश्लेषण करतात , आणि सुलेमान रझवी सारखे अनेक मुस्लिम विचारवंत बाबासाहेबांची री ओढत हिंदू धर्म आणि शैव धम्म ह्यांना एकच मानण्याची चूक करतात . काही शैव विचारवंतांना शैव हे  हिंदूच पण वर्ण नाकारणारे पण जाती  व्यवस्था स्वीकारणारे वाटतात वास्तविक ज्यावेळी हिंदू धर्म अस्तित्वातही न्हवता तेव्हापासून शैव अस्तित्वात आहेत पण हे स्वीकारणे अनेकांना जड जाते . अनेक शैवांना राम आणि कृष्णाचा मोह सुटत नाहीये त्यामुळे असे शैववादी लोकही राम आणि कृष्णाचा आगमवाद दाखवून त्यांना सामील करू पाहतात . ह्यातून शैववादाचे नुकसान होणार कि फायदा हा एक प्रश्नच आहे . ह्या प्रश्नांची उकल करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रत्यक्षात काय घडले हे वस्तुनिष्ठपणे पाहणे भारतातील वैदिक सुरवातीला वर्ण आणि जातीव्यवस्था मानत न्हवते ही वस्तुस्थिती त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतीना आर्य समाजाची स्थापना करता आली पण ही व्यवस्था फार काळ टिकली असे दिसत नाही लवकरच वैदिकांनी स्वतःचे बंदिस्त रूप स्वीकारून ह्या रूपात कोणी शिरू नये म्हणून ब्राह्मण्य निर्माण करून ब्राह्मण धर्माची निर्मिती केली हा ब्राह्मण धर्म
१ वेद हे अपौरेषेय आहेत
२ चार वर्ण आहेत
३ वर्ण जन्माधिष्ठित आणि अपरिवर्तनीय आहेत
४ ब्राह्मण सर्वोच्च असून धर्मनिर्णय करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि अगदी राजालाही हा अधिकार नाही

असे मानत होता .  ह्यातूनच ब्राह्मण आणि शासक  हा सत्तासंघर्ष निर्माण झाला आणि क्षत्रियांनी विश्वशैव , वैष्णव , बौद्ध आणि जैन धर्मांची व धम्माची स्थापना झाली ह्यांचे संस्थापक कपिल , राम कृष्ण , गोतम आणि महावीर हे क्षत्रिय होते ह्यांचे अधःपतन होत गेले म्हणून त्यांना संघटित करावे म्हणून विश्वशैव धारेतून आलेल्या आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली पण वैष्णवांनी हा नवा धर्म आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे वैष्णवीकरण घडवले आजचा हिंदू धर्म हा आदिशंकराचार्य आणि ह्या वैष्णवीकरणातून घडलेला आहे . ह्याने ब्राह्मण धर्म स्वीकारला आहे आणि त्याची सांगड वरील चार धर्माशी घालून एक नवा धर्म विकसित केला आहे काय आहे हा हिंदू धर्म ?
१ वेद हे अपौरेषेय आहेत
२ स्मृती कायद्याचा आधार आहेत
३ चार वर्ण आहेत असंख्य जाती आहेत
४ वर्ण आणि जात जन्माधिष्ठित आणि अपरिवर्तनीय आहेत
५ ब्राह्मण सर्वोच्च असून धर्मनिर्णय करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि अगदी राजालाही हा अधिकार नाही
६ रोटी आणि बेटी व्यवहार हे फक्त जातीतल्या जातीत व्हावेत
७ अस्पृश्य आणि अस्पृश्यता अटळ आणि अपरिवर्तनीय आहेत
८ जन्म , लग्न आणि मृत्यू ह्यांचे विधी वैदिक मंत्रांनी झाले पाहिजेत  आणि हे विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे . वेळप्रसंगी ब्राह्मणांना वैदिक आणि ब्राह्मणेतरांना पौराणिक मंत्र अशी विभागणी करण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे .
९ मानवाचे मुख्य जीवनउद्दीष्ट मोक्ष आहे
१०  मोक्ष राजयोग , ज्ञानयोग , कर्मयोग आणि भक्तियोग ह्या चारही मार्गांनी मिळतो
जो वरील दहा   गोष्टी स्वीकारतो तो हिंदू होय .
त्याउलट
१ वेद पौरुषेय आहेत आणि त्यांचे प्रमाण मानण्याची गरज नाही . वेद धर्मग्रंथ म्हणून अमान्य .  त्या ऐवजी आगम ग्रंथाचा अभ्यास करणे हे आधिक फलदायक आहे मात्र त्यांनाही प्रमाण मानण्याची गरज नाही
२ स्मृती पूर्णपणे अमान्य
३ वर्ण व  जातिव्यवस्थेला ठाम नकार
४ ब्राह्मण किंवा कुणीही सर्वोच्च नाही
५ रोटी बेटी व्यवहार कूणातही व्हावेत
६ अस्पृश्यतेस ठाम नकार कुणालाही अस्पृश्य मानू नये
७ जन्म , लग्न आणि मृत्यू ह्यांचे विधी  करण्याचा अधिकार सर्वांना  आहे .
८ विधी नाकारण्याचा अधिकारही सर्वांनाच आहे
९ जीवनउद्दिष्ट ज्याने त्याने ठरवावे मात्र मोक्ष वा निर्वाण हेही जीवनउद्दीष्ट असू शकते
१० मोक्ष वा निर्वाण अनेक मार्गांनी मिळू शकतो / शकते

ह्या दहा गोष्टी स्वीकारतो तो शैव होय 

Tuesday, December 27, 2016

आपण स्वतः एक अव्वल दर्जाची कवयित्री आहात . मला स्तुतीला रिऍक्ट होता येत नाही त्यामुळे काय लिहू ? धन्यवाद !

Monday, December 26, 2016

WHY SPIRITUAL SOCIOLOGY IS NEEDED IN INDIA? SHRIDHAR TILVE NAIK

Spiritual sociology is the branch of sociology which underlines enlightenment or nirban /nirvan or moksha or salvation as an aim of each and every member of society and study SOCIAL as  necessary evil which must be annihilated by every sadhak for his OR her MOKSHA. Without spiritual all social is bullshit because all spiritual values are the basic and necessary values for each and every society. These 12 values are spiritual necessities and without them attaining of divine is impossible. Naturally they provide the basic value-system and ethics to all societies. These values are not social but spiritual and many times self-evidental as they are irrational and unscientific.
These prime 12 spiritual values are
1 AKAM
2 AKAL
3 APARIGRAH
4 AAWKASH
5 ACHORY
6 AHINSA
7 ASAMBANDH
8 AVYASAN
9 ASTEY
10 ARANJAN
11 APRAMAD
12 A-AHANTA

As Indian society is consistently proving itself as spiritual society we have to develop spiritual sociology to understand Indian Society.