Tuesday, February 14, 2017

शैव सावित्रीबाई फुले आणि व्हॅलेंटाईन डे

सावित्रीबाई फुले ह्या स्त्रीशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत आणि महात्मा फुलेंच्या पत्नी म्हणूनही ! पण बऱ्याच जणांना हे माहीत नाही कि त्या शैव होत्या . आपले शैवत्व त्यांनी कधीही लपवून ठेवले नाही . शिव हे त्यांचे उपास्य दैवत होते आणि सत्यशोधक समाज आणि शिव आराधना ह्यांची त्यांनी अतिशय उत्कृष्ट सांगड घातली होती . त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या देवनागरी लिपीबरोबर मोडी लिपीतही लिखाण करायच्या . त्यामुळेच त्यांच्या काही कविता ह्या मोडी लिपीत  सापडल्या आहेत . म्हणजे निदान १९ व्या शतकापर्यंत तरी देवनागरीने मोडीला मोडीत काढले न्हवते हे स्पष्टच दिसते ( मोडीत काढणे हा वाकप्रचार ह्या संदर्भात आलाय का तेही पाहायला हवे )

सावित्रीबाईंनी '' काव्यफुले '' (१८५४)ह्या त्यांच्या ४१ कवितांच्या काव्यसंग्रहात
(१)
शिकणेसाठी जागे व्हा.
(२)
मनु म्हणे
(३)
ब्रह्मवती  शेती.

(४)
शूद्रांची  दुखे
(५)
इंग्रजी माऊली.
(६)
शूद्र शब्दाचा  अर्थ
(७)
बळीस्तोत्र.
(८)
शूद्रांचे  परावलंबन.
(९)
तयास मानव म्हणावे  का?
(१०)
अज्ञान
(११)
सावित्री व जोतीबा संवाद.
(१२ )

अश्या खास फुलेवादी सत्यशोधकीय कविता लिहिता तच पण त्यांच्या प्रार्थनापर  कवितात

शिवप्रार्थना

शिवस्तोत्र .

ईशस्तवन

ह्या तीन  कविता भगवान शिवांच्यावर लिहिल्या आहेत त्या प्रथम शिवाची प्रार्थना पुढीलप्रमाणे सुरु  करतात




शिव  प्रार्थना
(ओवी )
सत्य सुंदर शिव थाट । शिरी शोभे जटाजपळट ॥
वाहती गंगाधरा उत्कट ॥ चर्तुदश विद्येच्या ॥ १ ॥
त्रिलोचन  त्रितिक्षू  ललाट ॥ त्रिपुरांतक त्रिभुवन चत्रपट
स्कंधी सर्प  नृत्या चा  थयथयाट ॥ चाले कर्ता  कर्म  क्रियेचा  ॥ २ ॥
आणि शेवट असा
नमस्कार तुज शिवप्रभो ॥ आदि निर्मिक  स्वयंभुविभो  ॥
अज्ञान नष्ट  कारी  वर सर्वा  लाभो ॥ प्रार्थना  ही सावित्रीची  ॥ ५ ॥


काव्य रचण्याच्या आधीही सावित्रीबाई शिवाला वंदन करताना  म्हणतात
शिवस्तोत्र
शिव  तुझे जपे स्तोत्र
प्रेम भावे गातसे मी
विश्वंभरा तू महेशा
सदभावे  तुला वंदी ॥
(श्लोक : वंसतचतलका)

मग शैव परंपरेनुसार त्या शिवाचे पुढीलप्रमाणे स्तवन करतात


ईशस्तवन
नमन तुला । शंकरा । श्रीधरा ॥ धृ ॥
नीलकंठ शिवशंभू सदाशिव
तुजीया चरणी  आमचा  भाव
अज्ञानी लेकरा । उद्दरा ॥
आम्ही लेकरे तुला प्रार्थितो
विद्या देई ज्ञान इच्छितो
दैन्यासुर संहारा । श्रीधरा ॥


अगदी  पिवळा चाफा ह्या कवितेतही त्या चाफ्यालाही  शिवाच्या संदर्भात पाहतात आणि म्हणतात

 शिव सत्याचे
सुदंशु  भूषण
सुंदरतेचा
पुतळा जणू  तो ॥ ४ ॥
आपणाला बी कवींचा चाफा माहित असतो पण बी कवींच्या कितीतरी आधी सावित्रीबाईंनी

पिवळा चाफा
(अक्षर छंद)
पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो ॥ १ ॥
नाव तयाचे
सुवर्ण चंपक
सृष्टी दागिना
मनास पटतो ॥ २ ॥
रंग मजेचा
ढंग दिमाखही
गंध तयाचा
शरीरि  खेळतो ॥ ३ ॥

असे लिहून ठेवले आहे ह्याशिवाय जाईवर जाईचे फुल आणि जाईची कळी अश्या  दोन कविता आणि गुलाबावर गुलाबाचे फूल अश्या कविता आहेतच ह्या कविता माळीपणाला साजेश्या अस्सल आहेत आणि थेट आणि ऐहिक आहेत गूढवाद आहे पण सूचक आहे .  मानवप्राणी हा गुलाबासारखा  आहे हे शेवटी सुचवलेले आहे .

इंग्रजी भाषेबाबतही त्या स्पष्ट आहेत त्या लिहितात
इंग्रजी  माऊली
(अभंग)
इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी
शूद्रांना उद्दारी । मनोभावे ॥
इंग्रजी माऊली । नाही मोंगलाई
नाही पेशवाई । मूर्खशाही ॥
इंग्रजी माऊली । देई सत्य ज्ञान
शूद्राला जीवन । देई प्रेमे ॥
इंग्रजी माऊली । शूद्रांना पान्हा पाजी
संगोपन आजी । करतसे ॥
इंग्रजी माऊली । तोडते पशुत्व
देई मनुष्यत्व । शूद्रलोका ॥

तेव्हा इंग्रजी हवीच आणि मराठीही हवी

ह्या संग्रहातील कवितांना त्याकाळातल्या काव्यशास्त्राच्या मर्यादा  पडलेल्या आहेत पण जे आहे ते महत्वाचे आहे स्त्रीवादी कवितेची  त्या सुरवात आहेत . तेव्हा व्हॅलेंटाईन डे साजरा करतांना आपल्या ह्या सावित्रीमायला थोडे आठवावे . असो .  सावित्रीबाईंची आठवण म्हणून  आपल्या आपल्या वॅलेन्टाईनला गुलाबाबरोबर चाफा आणि जाईही  द्यायला काय हरकत आहे ?

श्रीधर तिळवे नाईक

संदर्भ
सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ



No comments:

Post a Comment