Friday, February 17, 2017

राजेंद्र बाणाईत : शेवटच्या ओळीवरून एक जाहीर प्रश्न विचारतो
तुम्हाला खूप बुद्धिमान आणि शरीराने अतिशय सुंदर प्रियेसी / पार्टनर मिळाली असती तर इतक्या सुंदर कविता तुम्ही लिहू शकला असता काय ? मुख्य म्हणजे तुमच्यातील कवी आज आहे असाच राहिला असता काय
स्वतःला सतत जागृत ठेऊन तुम्हाला काय मिळाले
तुम्हाला बुद्धिमान प्रियेसीचा नशा हवी होती .....असा माझा तर्क !
चुकले तर माफ करा !    



SHRIDHAR TILVE : 

तुम्ही जाहीरपणे विचारलय  म्हणून जाहीरपणे उत्तर देतोय  माझी प्रेयसी निर्वाण वा मुक्ती ! माझ्या सर्व कवितांच्या मुळांशी तीच आहे बाकी सर्व स्त्रिया ह्या माझ्या सेकंडरी स्पिरिच्युलीझम आहेत वा होत्या . ह्यातीलही मुख्य स्त्री माझी आई नंतर माझ्या दोन बहिणी माझी भाची प्रिया नार्वेकर जिने मला बापपण म्हणजे काय ते शिकवले बाकी प्रेयस्या ह्या माझ्या कधीच मुख्य श्रेयस न्हवत्या अपवाद काहीसा ज्ञचा आणि तिथेही तंत्रमार्गाने शेवटची उडी घेता येईल अशी अटकळ होती जी फसली त्यामुळे सुंदर बुद्धिमान प्रेयसी ह्या मिळणे मिळणे ही गोष्टच गैरलागू आहे कवी स्त्री असो कि पुरुष कधी ओप्पोझिट जेण्डर साठी अडून राहील ह्यावर माझा तरी विश्वास नाही आणि साधक असेल तर बिलकुलच नाही उलट अपोझिट जेंडर अनेकदा अडथळाच बनून साधनात येते अश्यावेळी मुक्ती कि कामवासना असाच प्रश्न निर्माण होतो आणि मी अश्यावेळी कामवासनेचा त्याग केला आहे तेव्हा जरतरला आयुष्यात फारसा अर्थ असत नाही ह्यातून फक्त अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक प्रश्नांची सरबत्ती सुरु होते 
 आपण  फारच काल्पनिक प्रश्नात अडकून आहोत काय असाच प्रश्न सर्वांनी विचारायला हवा . असे काल्पनिक प्रश्न ही आपल्या मनाची करमणूक असते किंबहुना मन स्वतःला शाबूत ठेवण्यासाठी ज्या युक्त्या करतं त्या युक्त्यांची ही बनवाबनवी असते अनेकदा पलायन असते फेसबुकवर आपण सर्वच अश्या पलायनात भाग घेऊन हे पलायन साजरे करत असतो ह्यातून मुक्ती सोडाच पण स्वातंत्र्याचीही शक्यता नसते फेसबुक हे ९९% सामूहिक पलायन आणि सामूहिक टाईमपास आहे आपण त्याचे किती बळी व्हायचे ही बनवाबनवी असते हे   लिमिट ज्याने त्याने ठरवावे बाय वे ही कविता प्रेयसीला नाही तर मित्राला उद्देशून आहे आपल्या प्रश्नांच्याबद्दल आभारी आहे . 

No comments:

Post a Comment