राज्य आणि विश्वीयता
विश्वीयता म्हणजे मितीमुक्त असणे . ह्या विश्वीयतेला संपूर्ण शरीर उपलब्ध असणे म्हणजे मोक्ष वा निर्वाण !
निर्वाणासाठी करायची साधना म्हणजे अध्यात्म आणि त्याविषयीची निर्माण करण्यात आलेली वा देण्यात आलेली पद्धत म्हणजे दर्शन होय . ह्या दर्शनाच्या आधारे निर्माण करण्यात आलेले कायदे म्हणजे धम्म होय
धम्म सातत्याने तर्कशास्त्रीय चिकित्सा करतो किंबहुना तर्कशास्त्रीय चिकित्सा हाच धम्माचा आधार आणि विश्वीयतेचा आधार आहे . इथे पुराव्याशी झटापट आहे आणि श्रध्देला ठाम नकार आहे जिथे माहीत नाही तिथे माहीत नाही हे सांगण्याची नम्रता आहे जर व्यक्त करता येत नसेल तर व्यक्त करता येत नाही ह्याची कबुली आहे आणि त्या अव्यक्ताविषयीं संशय घेण्याची पूर्ण मुभा आहे अधिकार आहे बाबा वाक्यम प्रमाणं शिवम वाक्यम प्रमाणम वा बुद्धम वाक्य प्रमाणमला ठाम नकार आहे .
ह्याउलट श्रद्धेच्या आधारे निर्माण करण्यात आलेले कायदे म्हणजे धर्म .इथे तर्कशास्त्र आणि चिकित्सेला नकार आहे संशयाला नकार आहे ह्या धर्मानी समाज संघटित केला आणि ९९. ९९ % धर्म काळाच्या ओघात नाहीशे झाले किंबहुना बलवान धर्मांनी ते नाहीसे करून स्वतःचा संघटित धर्म निर्माण केला ह्या संघटीत धर्मानी एकधर्मभाव निर्माण केला
ह्या संघटीत धर्मांना पहिले आव्हान भगवान शिवांनी दिले आणि जगातला पहिला धम्म स्थापन केला मात्र विविध राज्यातील एकधर्मभावाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातून सर्वधर्मसमभावाची संकल्पना उदयास आली
शैव धम्मांच्यात तीन प्रकारचे पुरोहित होते
१ गणपती
२ गुरु
३ ब्राह्मण
पुढे गणपतींच्यात राजकीय गणपती आणि धार्मिक गणपती असे दोन प्रकार झाले त्यातील राजकीय गणपतींना गणाधिपती आणि धार्मिक गणपतींना शैवाचार्य वा ऋषी वा मुनी म्हंटले जाऊ लागले
गणाधिपती मात्र राजे म्हणून काम करू लागले त्यांची निवड लोकशाही पद्धतीने होऊ लागली
गुरुंच्यातही १ गुरुव व २ आचार्य असे दोन प्रकार झाले ह्यातील गुरुव हे पुजारी झाले तर आचार्य शैव दर्शनाचे चिकित्सक !गुरूवांना धर्मगीते कम्पोज करण्याचा आणि गाण्याचा अधिकार होता तर ब्राह्मणांना गुरुवांना साहाय्य करण्याचा आणि धर्मगीते लिहिण्याचा .
ब्राह्मणांना आपले हे दुय्यम स्थान सहन करणे अवघड झाले विशेषतः अफगाणिस्तानमधून भारतात शिरलेल्या टोळ्यांच्या पुजाऱ्यांना ब्राह्मण म्हणून ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले असले तरी ते त्यांच्या स्थानाविषयी फारसे खुश न्हवते हीच गोष्ट शैव ब्राह्मणांच्या बाबत होती ते समाधानी न्हवते पण व्यवस्था लवचिक असल्याने त्यांना गुरुव बनणे शक्य होते त्यामुळेच अनेक ग्रीक , सेमिटिक आणि शक हुन पुरोहित ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले
ह्या व्यवस्थेला छेद मिळाला तो लिखित क्रांतीने ! ह्या हस्तलिखित क्रांतीने ब्राह्मणांच्या रचनांना संघटित करायला सुरवात केली आणि त्यातून वेदांची निर्मिती झाली . गुरूवांनी ह्या नवीन तंत्रज्ञानाकडे साफ दुर्लक्ष्य केले आणि त्यातून मौखिकतेत अडकलेला मूळ शैव धम्म मागे पडायला लागला आणि हस्तलिखितप्रधान ब्राह्मणांचा नवा धर्म उदयाला येऊन प्रबळ होऊ लागला त्यातून दोन धर्म तयार झाले असुरधर्म आणि सुरधर्म
असुर प्रबळ असल्याने त्यांनी भारतावर किमान सहाशे वर्षे राज्य केले त्याउलट सुरधर्म मात्र मागे पडला असुरधर्माने स्वतःचा झोरोस्ट्रियन धर्म तयार केला तर सुरांनी स्वतःचा वैदिक धर्म ! हे दोन्हीही अग्निप्रधान धर्म होते कारण दोघेही हिमालयाच्या पायथ्याशी बर्फात जन्मले होते हे दोन्हीही हिमालयीन भारतीयांनी जन्माला घातलेले धर्म होते असुर धर्म तर थेट इराणपर्यंत पसरला आणि असुरांनी भारतीयांच्यावर वारंवार राज्य केले . ह्यातील काही असुरांनी असुरधर्म आणि शैव धम्म ह्यांची सांगड घालायला सुरवात केली आणि त्यातून असुर कपिलाने नव्या शैव धम्माची स्थापना केली हा शैवधम्म म्हणजे विश्वशैव किंवा ब्रह्मशैव धम्म होय ह्यातूनच उपनिषदे जन्मली
हा कपिलच गौतम बुद्धाचा गुरु होता आणि गौतम बुद्धांनी सुरधर्माला नकार देण्याऱ्या नवीन असुर धम्माची स्थापना केली तो असुर धम्म म्हणजे आत्ताचा हीनयान बौद्धधम्म होय पुढे राजा अशोकाने सर्वच शैवांना बुद्धधम्म स्वीकारायला सांगितले तेव्हा शैवांच्यापुढे वेगळाच पेच निर्माण झाला तो म्हणजे हा मूळ हीनयान आणि आपला शैवधम्म ह्यांची सांगड कशी घालायची त्यातून सकृतदर्शनी बुद्धाची मूर्ती स्वीकारायची पण बाकी सगळी जीवनपद्धती शैवांची ठेवायची अशी सांधेजोड जन्माला आली . त्यातूनच शैवांचा भक्तोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून महायान बौद्ध तर शैवांचा तंत्रोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून वज्रयान ह्यांचा जन्म झाला . जगभर जो बौद्ध धर्म पसरला आहे तो हा महायान आणि वज्रयान शैव बौद्धधम्म आहे मूळचा गौतम बुद्धांचा निखळ ज्ञानकेंद्रित ज्ञानोपायी हीनयान धम्म आज जवळ जवळ कुठेच नाही आंबेडकरांनी हे ओळखून बुध्दाच्या मूळ हीनयानाकडे वळून त्याला नवीन सामाजिकतेची जोड देऊन नवयानाची स्थापना केली खरी पण शैव प्रवृत्तीच्या भक्तोपायी प्रवृत्तीने आता भगवान शिवांच्याऐवजी भगवान बुद्ध आणि बोधिसत्व भीम ह्यांची पूजा बांधायला सुरवात केली आहे ह्यातून पुन्हा एकदा पूजा अर्चना आणि श्रद्धा ह्या तीन अप्सरांचे पुनरागमन होणे अटळ आहे . नवंयांनी लोकांनी स्वतःला सांभाळले तर ठीक अन्यथा आंबेडकरी शैव बौद्ध धर्म उदयाला आल्याशिवाय राहणार नाही आणि मग जे शिवाचे आणि गौतम बुध्दाचे झाले तेच ह्या नवयानाचे होईल
श्रीधर तिळवे नाईक

No comments:
Post a Comment