वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक
गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित्याच्या संदर्भात chosisme फार महत्वाची संकल्पना मानली जाते
रँडम हाउस ऑफ डिक्शनरी त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे देते
Based on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.
प्रतिसृष्टीय युगात कॅमेरा फार महत्वाचा बनला आणि क्रयवस्तूही ह्या क्रयवस्तूंच्यावर फोकस करणारी नवी
ऍन्टिनोवेल फ्रेन्च कादंबरीकार Alain Robbe-Grillet ह्याने लिहायला सुरवात केली आणि वस्तुवाद सर्वत्र पसरत गेला हिंदी कवितेत १९८५ नंतर त्याने उच्छाद मांडायला सुरवात केली मराठीत अरुण कोलटकरांची कॅमेरा ही कविता ह्या वस्तुवादाचे उत्तम उदाहरण आहे हिंदीच्या नादाने काही हिन्दीनिष्ठ मराठी कवीही वस्तुवादाचे मूळ आणि कुळ समजून न घेताच वस्तुवादी कविता लिहायला लागले माझा पोस्टमॉडर्नला विरोध असल्याने मी हळूहळू निर्वस्तुवादाकडे वळलो आणि त्यातूनच निर्वस्तुवादी कवितेचा जन्म झाला एका मराठी कवीने संपूर्ण युरोपियन एथॉसला चॅलेंज देणे मराठीतील कूपमंडूक परंपरेला पचणे अवघड होतेच गांडीत नाही किडा आणि भिकारी म्हणतोय मटण वाढा अश्या कलोनिअल वातावरणात युरोपिअन एथॉसच्या दारात जाऊन युरोपिअन संवेदनशीलतेचे मटण भीक मागून खाणाऱ्यांना निर्वस्तुवाद हा खास भारतीय पद्धतीने तयार केलेला खादयप्रकार पचणे अवघडच देशीवादी समीक्षक तर महाभंपक त्यांनाही ही भारतीय थाळी पचली नाहीच मी अनेकदा म्हंटले आहे माझे साठोत्तरीविरुद्धचे बंड केवळ मराठी साठोत्तरीविरुद्ध नाही ते युरोपिअन ,आणि हिंदी , कोकणी आणि कन्नड अश्या भारतीय साठोत्तरीविरुद्धही आहे निर्वस्तुवादी कविता हा त्याचा एक भाग आहे .

chosisme
[shaw-zeez-muh]
Spell Syllables
·
Word Origin
noun
1.
a writing style in which plot and characterization are de-emphasizedand people, events, and setting are recorded as though seen by theauthor through the lens of a camera.
Origin of chosismeExpand
Dictionary.com UnabridgedBased on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.
प्रतिसृष्टीय युगात कॅमेरा फार महत्वाचा बनला आणि क्रयवस्तूही ह्या क्रयवस्तूंच्यावर फोकस करणारी नवी
ऍन्टिनोवेल फ्रेन्च कादंबरीकार Alain Robbe-Grillet ह्याने लिहायला सुरवात केली आणि वस्तुवाद सर्वत्र पसरत गेला हिंदी कवितेत १९८५ नंतर त्याने उच्छाद मांडायला सुरवात केली मराठीत अरुण कोलटकरांची कॅमेरा ही कविता ह्या वस्तुवादाचे उत्तम उदाहरण आहे हिंदीच्या नादाने काही हिन्दीनिष्ठ मराठी कवीही वस्तुवादाचे मूळ आणि कुळ समजून न घेताच वस्तुवादी कविता लिहायला लागले माझा पोस्टमॉडर्नला विरोध असल्याने मी हळूहळू निर्वस्तुवादाकडे वळलो आणि त्यातूनच निर्वस्तुवादी कवितेचा जन्म झाला एका मराठी कवीने संपूर्ण युरोपियन एथॉसला चॅलेंज देणे मराठीतील कूपमंडूक परंपरेला पचणे अवघड होतेच गांडीत नाही किडा आणि भिकारी म्हणतोय मटण वाढा अश्या कलोनिअल वातावरणात युरोपिअन एथॉसच्या दारात जाऊन युरोपिअन संवेदनशीलतेचे मटण भीक मागून खाणाऱ्यांना निर्वस्तुवाद हा खास भारतीय पद्धतीने तयार केलेला खादयप्रकार पचणे अवघडच देशीवादी समीक्षक तर महाभंपक त्यांनाही ही भारतीय थाळी पचली नाहीच मी अनेकदा म्हंटले आहे माझे साठोत्तरीविरुद्धचे बंड केवळ मराठी साठोत्तरीविरुद्ध नाही ते युरोपिअन ,आणि हिंदी , कोकणी आणि कन्नड अश्या भारतीय साठोत्तरीविरुद्धही आहे निर्वस्तुवादी कविता हा त्याचा एक भाग आहे .
No comments:
Post a Comment