Sunday, September 11, 2016

नक्की मला आठवत नाही पण बहुदा गो म कुलकर्णी ह्यांनी असं म्हंटल होतं कि दुकानाचं दिवाळं निघालं कि हिशेबाच्या पोथ्या बाहेर पडतात . साहित्यातही हेच घडते . माझंही बहुदा कवी म्हणून असं काही झालं असावं . एकेकाळी वादळवेगानं कविता लिहणारा मी आता जवळ जवळ मुंगीच्या वेगाचा झालोय आणि प्रथमच स्वतःच्या सगळ्या कविता बाहेर काढून हिशेब सुरु झाले . स्वतःच्याच कवितांचं वर्गीकरण करतांना जीव मेटाकुटीस आलाय . फायदा एक झाला तो म्हणजे ह्या कविता ब्लॉग आणि फेसबुकवर टाकता आल्या  आणि काही वाचकांच्यामुळे आरश्यात पाहता आले . हिशेब संपलेला नाही  पण साधारण ५ ५ कवितासंग्रह होतील असे दिसते . असो . 

भारतीय समाजाची दशसमुदाय रचना आणि हिंदू ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी श्रीधर तिळवे नाईक 


         )   भारतीय समाजव्यवस्था 
भारतीय समाज व्यवस्था ही एक गुंतागुंतीची समाजव्यवस्था असून भारतात तिला पाहताना 
१वर्णाधिष्ठित 
२जात अधिष्ठित 
३वर्गाधिष्ठित 
अश्या  तीन दृष्टीकोनातून पाहिले जाते . माझ्या मते हे सर्व दृष्टीकोन उथळ असून भारतीय समाजव्यवस्था समजायला त्यांचा काहीही उपयोग होत नाही वैदिक निगम आणि युरोपिअन ह्यांनी प्रचलित केलेले हे मॉडेल आता फेकून देण्याची वेळ झाली आहे . मी माझ्या भारत भ्रमणातून मला सापडलेल्या मॉडेलची मांडणी इथे करत आहे . 
         
      )  भारतीय दशसमुदायी समाजरचना 

माझ्या मते भारतीय समाजव्यवस्था ही दहा समुदायांच्या बृहत जालांनी विणलेले महाजाल असून 
 ते सातत्याने विकास पावत अपडेट होत असते . त्याच्या अपडेट होण्याची गती मंद असल्याने ते वरकरणी स्थिर वाटत असते पण लॉंग टर्म मध्ये ते इवोल्व झालेलं दिसतेत्यामुळेच भारतीय समाजरचना ही एक गुंतागुंतीची समाजरचना भासते  आणि गेली दोन दशके ती विचारवंताना चकवा देते आहे . तिचा तोंडवळा वर्ण , जाती , वर्ग असा भासत असला तरी  प्रत्यक्षात ती  दशसमुदायी आहे  हे समुदाय खुले असून त्यांचा आकार चेंडूसारखा आहे त्यामुळे तोचतोचपणा आणि सावकाश सरकणारा नवेपणा ह्यांच्यात ती घुसमटत असते वसाहतवादाच्या प्रभावामुळे आणि मनुस्मृतीच्या अतिरिक्त माऱ्यामुळे आपण वर्ण आणि जात ह्यांच्या आहारी जाऊन बोलत असलो तरी त्यामुळे भारतीय समाजरचना कळण्याची सुतराम शक्यता नाही . मी सुचवलेले दशसमुदायी मॉडेलच ह्याबाबत जास्त कामाचे आहे हे दशसमुदाय म्हणजे दहा चेंडू आहेत  हे चेंडू जेव्हा एकावर एक चढतात तेव्हा ती उभ्या अक्षाची गुलाम वाटते जेव्हा ते एकमेकास लागून पसरतात तेव्हा ती आडव्या अक्षाची वाटते आणि ते स्पर्श करता विखुरतात तेव्हा आख्खा भारत पोस्टमॉडर्न वाटायला लागतोहे समुदाय  पुढीलप्रमाणे 


पुरोहित समुदाय  PUROHIT SAMUDAY 

धर्मशास्त्री SUPREME JUDITIAL DHARMSHASTRI
न्यायाधीश JUSTICE-NYAYADHISH
वैद्य VAIDYA
ब्राह्मण BRAHMINS
गुरव GURAV
भगत BHAGAT
महाभक्त BHAKT
भटके BHATKE SADHU
देवसेवक SEVAK ह्या समुहानी  बनलेला आहे.

शासक समुदाय   SHASAK SAMUDAY 

राजा वा राज्याधीपती RAJYADHIPATI
पंतप्रधान PRIME MINISTER
मंत्री MINISTERS
सेनापती SENAPATI
योद्धे WARRIORS
अधिकारी OFFICERS
सैनिक SOLDIERS
भटके BHATKE
सेवक SEVAK ह्या समुहानी  बनलेला आहे.

व्यापारी पणी समुदाय 3 VYAPARI PANI SAMUDAY 

श्रेष्ठी / भांडवलदार SRESHTHI
निर्माता PRODUCER
कारागीर ARTISANS
वंजारी WANJARI/CARRIERS
वितरक DISTRIBUTORS
दुकानदार SHOPPERS
कामगार WORKERS
भटके विक्रेते BHATKE ह्या समुहानी  बनलेला आहे.


कृषी समुदाय 4 AGRICULTURS

श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI
क्षेत्रकरी FARM-OWNER
शेतकरी FARMER
कुणबी CULTIVATERS
माळी GARDENER
शेतमजूर FARM-WORKERS
भटके BHATKE
शेत सेवक SERVICERS ह्या समुहानी  बनलेला आहे.


पशुपालक समुदाय 5 ANIMALRS

श्रेष्ठी SHRESHTHI
धनगर SHEPHARDS
गोपालक  GOPALAKS
खाटिक BUTCHERS
कामगार WORKERS
सेवक SERVICERS
भटके BHATKE ह्या समुहानी  बनलेला आहे.

आदिवासी समुदाय 6  ADIVASI




सर्जक 7  SARJAK
बुद्ध मुक्त BUDDHAS
वैज्ञानिक  DISCOVERER
तंत्र वैज्ञानिक INVENTOR
कलावंत ARTIST
दार्शनिक DARSHNIK
नवविचारकार IDEOLOGIST
व्यवस्थापनगुरु GURU-MANEGER
चिन्हवैज्ञानिक SIGNOVENTOR
प्रोग्रामर PROGRAMMER ह्या समुहानी  बनलेला आहे.

8 DNYANKARI

ज्ञानश्रे ष्ठी SHRESHTHI
ज्ञानव्यवस्थापक KNOWLEDGE MANEGERS
विद्वान SCHOLAR 
संपादक EDITORS
आचार्य ACHARYAS
शिक्षक TEACHERS
 पत्रकार JOURNALIST
कामगार WORKERS
ज्ञानाधिकारी KNOWLEDGE OFFICERS
विद्यार्थी STUDENTS ह्या समुहानी  बनलेला आहे.

दास समुदाय 9 DAS
गावदास GAVDAS /SI I.E. UNTOUCHABLES
नगरदास NAGARDAS/SI
देवदास DEV DAS/ DEV DASI
राजदास RAJDAS/SI
गृहदास GRUHDAS/SI
व्यापारदास VYAPARDAS/SI
कृषिदास KRUSHIDAS/SI
पशुदास PASHUDAS/SI
गणिका GANIK/KA ह्या समुहानी  बनलेला आहे.

१० बाहेरील समुदाय वा उपरे समुदाय 10 EXTERNAL


नेमाडे ह्या दहाही समुदायांना कवेत घेण्याचा प्रयत्न करतात

फॉर्म  आणि हिंदू 
हिंदू या कादंबरीच्या फॉर्मबद्दल मी बोलणार नाही कारण ह्या फॉर्ममधील काही गोष्टी मी माझ्या अडॉहॉकाबानासुना  ह्या कादंबरीबाबत वापरल्या आहेत.  अडॉहॉकाबानासुना आधी आली नसती तर नेमाडेंच्या हिंदूचे अनुकरण काही ठिकाणी झाले आहे असा शिक्का नक्कीच माझ्यावर मारला गेला असता उदाहरणार्थ अडॉहॉकाबानासुनातील 
हा भाग हिंदुतील यक्षप्रश्नाचा भाग (पान २६१ ते २६९)

          तीन नेमाडे आणि हिंदूतील नेमाडे 
साम टिव्हीवर चर्चेत भाग घेताना संजय आपटे ह्यांच्या प्रश्नाला 'लेखक नेमाडे जातीयवादी आहेत का ?' ह्या सुराला उत्तर देताना मी म्हंटले होते कि  नेमाडेंचे तीन टप्पे आहेत.
) लेखक नेमाडे जे  अत्यंत प्रामाणिक आहेत अस्सल आहेत आणि जे मुळीच जातीयवादी  नाहीत
) लेखकराव नेमाडे जे टीकास्वयंवरमध्ये प्रथम बालरुपात अवतरतात आणि ज्ञानपीठ मिळेपर्यंत वाढतच जातात
) लेखकराज नेमाडे जे साहित्यात ज्ञानपीठानंतर राजकारण्यासारखे बोलतायत आणि कोल्यांट्य़ा उडया मारतायत आणि जातीवादाचे समर्थन करतात. सुदैवाने हिंदू ही कादंबरी प्रामाणिक अस्सल लेखक नेमाड्यांनी लिहिली आहे. नामदेव ढसाळ  जसे कवितेबाहेर  वाट्टेल तसे कोलांट्या उड्या मारायचे मात्र कविता लिहिताना मांजरासारखे योग्यच पद्धतीने पायावर  पडायचे  तसे काहीच नेमाडेंचे आता  होणार कि काय अशी शंका येते आहे
लेखक नेमाडेंना राम राम आणि देशीवादी नेमाडेंना दुरूनच सलाम हे धोरण नाहीतरी मी पूर्वीपासून अवलंबले आहेच . 

       मी हिंदूची समीक्षा का करतोय ?
हिंदू जेव्हा मी आल्या आल्या वाचली तेव्हा ती मला मुळीच आवडली नव्हती नंतर सहा महिन्यांनी वाचली तेव्हा मात्र ती बरी वाटली आणि तिसऱ्या वाचनात मात्र  ती आवडायला लागली ह्याचे कारण उघड आहे. हिंदू कोसलाप्रमाणे चटकदार नाही ती एखाद्या दारू प्रमाणे आहे. प्रथम कडवट चव पण नंतर ती चढत जाते. कोसला नंतरच्या वाचनात बालिश वाटत जाते. हिंदुत नेमके उलट होते. एखादा अनवट शास्त्रीय राग सतत ऐकल्याने आवडत जावा तसे होते
प्रश्न असा कि मग आत्ताच हिंदुवर का लिहावे? कारणे उघड आणि  स्पष्ट आहेत

) सर्वात महत्वाचे कारण नेमाडेंचा प्रवास हा गावातून बाहेर पडलेल्या साठोत्तरी पिढीचा प्रवास आहे. त्यामुळे नेमाडेंच्या प्रवासात मला अनेकदा माझ्या बापाचा प्रवास दिसतो. नेमाडेंच्या वडीलात अनेकदा शेतात आणि व्यापारात खपलेले माझे आजोबा दिसतात. नेमाडे हे ह्या अर्थाने आमचे साहित्यीक बाप आहेत.  स्वत:च्या  बापाला समजून घेणे आणि नेमाडेंना (आणि इथे खंडेरावाला) समजून घेणे हे काहीसे एकच आहे. मला नेहमीच असे वाटते कि आपले पूर्वज समजून घेण्याचा साहित्य हा एक विश्वासपात्र मार्ग आहे.  (चित्रपट आणि नाटकाला हि विश्वासपात्रता प्राप्त नाही कदाचित पुढे प्राप्त होईलही सीरीअल ही त्यात नव्वदोत्त्तरी भर) साहजिकच हिंदुवर लिहिताना मला माझे आजोबा आणि बाप आठवतायत

)  हा मजकूर मी आत्ताच का लिहितोय असाही प्रश्न मला आत्ता ह्या क्षणी पडतोय कदाचित मुंबईहून मी माझ्या गावी आलोय त्याचा तर हा परिणाम नाही ना  अशीही शंका दाटून येतेय. गाव आपला पाठलाग करत आपण  गावाचा हेही हिंदुवर लिहिण्याच एक कारण असेल. मुंबईत हिंदूचे होणारे वाचन आणि आपल्या गावात होणार वाचन ह्यामुळे हा फरक पडला असेल का असाही प्रश्न मला पडतो आहे

) हा प्रश्न पडण्याचे कारण असेही असेल कि अनेकदा खंडेराव गावात असतो. तेव्हा त्याला गावातले लोकसाहित्य थोर वाटायला लागते. मग ते शाहिरी चौके असोत कि धनगरी गाणी असतो पण तो शहरात पोहोचला कि त्याची आर्कीऑलोजी सुरु !

) चौथे  कारण अर्थातच ह्या कादंबरीतील नेमाडे हे अस्सल लेखक आहेत हे आहे . नेमाडे लेखन करताना विशेषतः कादंबरी लेखन करताना चिकित्सक   असतात पण  देशीवादी नसतात त्यामुळे समीक्षा करताना त्यांचा डोक्यात चालणारा साहित्य व्यवहार कादंबरी लिहिताना ते सहजरीत्या बाजूला सरतात आणि निके तेवढे निवडावे असे चालू होते

) ह्या  कादंबरीत नेमाडेंनी एक उत्कृष्ट तंत्र वापरले आहे. ह्या तंत्रानुसार खंडेराव ,चित्रपटाप्रमाणे घटनापट पहात जातो आणि हा घटनापट त्याच्याबरोबर आपण पहात जातो आणि अचानक चाप्लीनच्या चित्रपटात शाब्दिक पाट्या येतात तश्या खंडेरावचा स्टीलमध्ये घटनापट थबकतो आणि शब्दपाट्या येतात 'खंडेराव आता हे नीट साठव' 'खंडू आता तू प्रमुख' वगैरे. समीक्षा करताना ही अश्या अनेक स्टील पाट्या येतायत .  

) मी टीकाहरणमध्ये कोसला, जरीला, झुल, बिढार (ह्यातच हूल येते) मेलडी आणि टीकास्वंवर ह्या ग्रंथावर लिहिले होतेच आता  हिंदूवर लिहितोय कारण ह्या निमित्ताने  त्यांच्या सर्व साहित्यावर लिहिणे पूर्ण होईल हि आशा आहे

) नेमाडे समीक्षक म्हणून जो वाचाळपणा करतायत त्याचा त्यांच्या  कविता कादंबरी लेखनाशी संबंध जोडण्यात काही अर्थ नाही. निखळ  कलाकृती म्हणून आपण त्यांच्याकडे समीक्षक नेमाडेंना बाजूला काढून पाहू शकतो. ह्याचा अर्थ मी सरंचनावादी भूमिका घेतोय असे नाही तर ह्या समीक्षक नेमाडेंना वगळून ह्या कादंबरीत जे  विचारवंत नेमाडे येतात त्यांचा ही विचार करतोय.
         मार्गी देशी आणि मोहेन्ज्दडो
मी एक म्हणणे नेहमी मांडले आहे ते म्हणजे नेमाडे लेखक म्हणून अजिबात देशीवादी नसतात. मार्गी आणि देशी ह्यांचा उत्कृष्ट संगम ह्यांचा कादंबऱ्यात आढळतो हिंदू ही कादंबरी ह्याला अपवाद नाही.
ह्या कादंबरीची  सुरुवातच युरोपिअन लोकांनी सुरु केलेल्या अर्कीओलोजीने होते. मोहंजोदडो अर्कीओलोजी, अर्थ्रोपोलोजी आणि सोशिओलोजी  हाच पहिल्या पन्नास पानांचा मजकूर आहे. मात्र ह्या मजकूराला नेमाडे खास  देशी touch  देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
महोन्जोदडो संस्कृतीचे काय करायचे हा एक यक्षप्रश्न आहे. ही संस्कृती व्यापारी समुदायाने जन्माला घातली होती. हे आत्ता स्पष्ट होत चालल्याने नेमाडेंचा गोंधळ उडाला आहे. हे स्पष्ट दीसते एकीकडे हिंदूची आद्य संस्कृती म्हणून त्यांना तीचावर क्लेम करायचा आहे तर दुसरीकडे ती व्यापारी समुदायाची असल्याने फेकूनही द्यायची आहे. हा  dwikhandipana  ह्या कादंबरीत वाहताना दिसतो.
गावातून स्थलांतरित होऊन हे लोक करणार काय? तर आणखी एक मोहंजोदाडो निर्माण करणार असे नेमाडे  म्हणतात तेव्हा आपण  आणखी विचारात पडतो कारण शहरांची संस्कृती हि फार काळ टिकत नाही अशी त्यांची ठाम धारणा आहे आणि हे देशीवादाला धरुन आहे. कारण खेड्यातील पिकाचामुळे जे भूमी सातत्य निर्माण होते ते शहरात कसे निर्माण होणार? त्यामुळे खेड्यातील संस्कृतीचे गुणगान प्रत्येक  पानावर! प्रश्न असा खंडेराव  मोहन्जोदडोत मग शोधतोय तरी काय ? हराप्पा संस्कृतीतील जाती, बांगड्या मोरगावमध्येही आढळतात त्यांचा अनुबंध तो शोधताना दिसतो. ५००० वर्षाचा एक विशाल फलक नेमाडेंना ह्या निमित्ताने  उभा करायचाय हे स्पष्ट आहे.
उत्क्रांति सामाजिक आणि जैविक हे नेमाडेचे ऑब्सेशन  आहे. खंडेरावने उत्क्रांतीवर सादर केलेला  निबंध चमकदार आहे. पण त्याचा प्रतिवाद सहज शक्य आहे मोहनजोदड़ो ही हिन्दू संस्कृतीच्या उत्क्रांतीची  सुरुवात आहे. साहजिकच नेमाडे तिथे अनेकदा स्टॉप  घेतात. ह्या बरोबरच आणखी एक समांतर शोध आहे तो तीरोनी आत्याचा ! खंडेराव जीवापाड प्रयत्न करतो पण  महानुभवी संन्यासिनी झालेली आत्या सापडत नाही
मोहन्जोदडो हि महानगरी संस्कृती होती असे खंडेरावाचे  मत आहे आणि महानगरी संस्कृती विरुध्द कृषी संस्कृती असे द्विध्रुविकरण तो मांडतो . महानगरी संस्कृती ही शोषण करणारी, ऐतखाऊ आहे असे त्याचे मत आहे. मोहन्जोदडो ही  अशी  नागर शोषण करणारी असल्याने नाहीशी झाली असे त्याला  वाटते. नागर संकृती ही आकाशात उंच जाते आणि युजलेस कुतुबमिनार बान्धते तर कृषी संस्कृती जमिनीत खोल जाऊन विहीर बांधते आणि पाणी आणते जे जीवनदायीनी असते असे तो सुचित करतो.
ही कादंबरी सुरु होते मोहन्जोदडोपासून ! इथेच वडील मरणांतिक  आजारी असल्याची न्यूज मिळते. त्यानंतर मोरगावला पोहोचेपर्यंत त्याला ज्या आठवणी येतात त्या आठवणी म्हणजे ही कादंबरी.
प्रश्न असा  कि नेमाडे मोहोन्जोदडो पासून कादंबरीची सुरुवात का करतात. दोन  कारणे आहेत.
. नेमाडे हे संस्कृतिसातत्याने विशेषत: हिंदू संस्कृतिसातत्याने पछाडलेले आहेत त्यामुळे हे सातत्य कादंबरीत आणण्यासाठी मोहन्जोदडो  अपरिहार्य होते.
. आणि दुसरे कारण ते भूमीसातत्याने पछाडलेले आहेत. भूमी सातत्य हे कृषी संस्कृतीचे वैशिष्ट  तर त्याचे विरोधी पक्ष म्हणजे शहरी संस्कृती आणि तिचा पहिला आविष्कार म्हणजे मोहन्जोदडो 
ही कादंबरी ह्या दोन्ही सातत्याचा आविष्कार करते एका अर्थाने नेमाडे मांडत असलेल्या देशिवादीचा ही कादंबरी सर्वोत्कृष्ट नमुना आविष्कार आहे आणि ह्या नमुन्याने बऱ्याच मार्गी   गोष्टी आयात केल्या आहेत.
ही दोन्ही सातत्ये  नेमाडेंना दोन समुदायात उभी करतात. - ज्ञानकरी समुदाय - शेतकरी समुदाय
प्रथम आपण ज्ञानकरी  समुदायाचा विचार करू कारण सरतेशेवटी लेखक प्राध्यापक ज्ञानकरी समुदायाचा सदस्य आहे.