Thursday, June 27, 2019

मराठा आरक्षण श्रीधर तिळवे नाईक shridhar 

मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता संपला सामाजिक मागासलेपणाकडून आरक्षण आर्थिक मागासलेपणाकडे सरकलं खरतर आर्थिक मागासलेपणा ध्यानात ठेऊनच कुणबी मराठ्यांना ओबीसिंच्यात आरक्षण देण्यात आले होते पण सामाजिक उतरंडीकरणात अडकलेल्या कुणबी मराठ्यांपैकी अनेकांनी स्वतःची ओळख शहाण्णव कुळी अशी कास्ट सर्टिफिकेटवर प्रमोट केली आणि एक भलताच पेच निर्माण झाला शासक समुदायातील मराठ्यांचे वर्चस्व जसे जसे सम्पत गेले तशी तशी अस्वस्थता वाढत गेली पूर्वी शासन समुदायात प्रतिभावंत कुणबी मराठ्यांना हमखास जागा मिळे पण हळूहळू ओबीसींनी बीसींनी शासक समुदाय व्याप्त करायला सुरवात केली आणि ५० ते ६० टक्के अधिकारी ह्या समाजातून शिकून पुढे येऊ लागले आणि उच्च मराठांची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढायला सुरवात केली स्वतःची आयडेंटिटी उच्च मराठा ठेवणाऱ्या अनेक कुणबी मराठ्यांना त्यांच्याजवळ मोठ्या जमिनी आणि उद्योगधंदे नसल्याने काय करायचं ते सुचेनासं झालं आणि आरक्षण हा शॉर्टकट खुणावू लागला मूळ शहाण्णव कुळी राजकारणी लोकांना ह्यात आपले हरवलेले राजकीय भविष्य पुन्हा प्राप्त करण्याची संधी दिसली त्यांना ही संधी मिळू नये म्हणून भाजपनेही हे आरक्षण देण्यासाठी काय करता येईल ते पाहायला सुरवात केली आणि आता आरक्षण मंजूर झाले ह्याचा अर्थ स्पष्ट आहे

१ कुणबी मराठा अशी ज्यांची नोंद आहे त्यांना ओबीसी कोट्यातून आधीच देण्यात आलेल्या जागा देण्यात येतील
२ ज्यांनी अशी नोंद केलेली नाही त्यांना नव्या कोट्यातून  आरक्षित जागा मिळतील प्रश्न इतकाच ह्या जागा खरोखर पूर्वाश्रमीचा कुणबी मराठ्यांना मिळणार का माझ्या मते त्या त्यांना मिळाव्यात अशी इच्छा असेल तर आर्थिक निकषही ह्या जागांना लावण्यावाचून पर्याय नाही असे निकष शासन लावणार आहे कि नाही हे अद्याप स्पष्ट नाही

मूळ प्रश्न शेतीचा होता आपल्या राजकारणी लोकांनी तो आरक्षणाचा करण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे

श्रीधर तिळवे नाईक 

No comments:

Post a Comment