Saturday, March 4, 2017

तीन टिपणे

मी कम्युनिस्टविरोधी आहे पण प्रामाणिक कॉम्रेड्सविषयी मला प्रचंड प्रेम आहे मात्र कम्युनिस्टांच्या हिंसेविषयी मात्र मला कसलीच आस्था नाही जगभर कम्युनिस्टांनी जे हिंसावादी थैमान घातले आहे त्याचा तीव्र निषेध आपण केलाच पाहिजे हिंसा कुठल्याच प्रश्नाचे समाधान न्हाही त्यामुळे केरळातल्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो


कुंदन चंद्रावत ह्यांनी लावलेले बक्षीस हे ह्या देशातील वैदिकांचे कसे तालिबानीकरण होत आहे त्याचा नमुना आहे . त्यांचाही मी तीव्र निषेध करतो . बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आपकी अदालत मध्ये ३००० वर्ष हिंदूंनी मार खाल्ला आत्ता बस आता मी हिंदू मिलिटनटीझम चा स्पष्ट पुरस्कार करतो असे म्हंटले होते हिंदूंची सर्वसहनशील इमेज हा एकेकाळी अभिमानाचा विषय होता तसा तो ह्यापुढे राहणार नाही हे आता स्पष्ट होते आहे तुम्ही दोन माराल तर आम्ही आता चार मारू अश्या मानसिक स्थितीत जर हिंदू आला असेल तर त्याला त्या अवस्थेपाशी कुणी पोहचवले ह्याची परखड समीक्षा करण्याची वेळ आता आली आहे आपल्याकडचे पुरोगामी ज्या सहनशील , सर्वधर्मसहिष्णू हिंदूंची इमेज उराशी बाळगून आहेत ती आता फक्त इमेजच उरली आहे काय हे तपासण्याची गरज आता निश्चितपणे निर्माण झाली आहे

समाज आत्ता जसा आहे तसाच पहावा लागतो  भूतकाळात तो काय होता ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही . मोदींना मिळणारी मते ही बदलत्या हिंदू मानसिकतेला मिळालेली मते आहेत ही बदललेली मानसिकता बहुसंख्याक मानसिकता होणार असेल तर तिच्याशी लढतांना जुनी विचारप्रणाली कामाला येणार नाही खुद्द दलितांच्यात महारेतर दलित सरळ सरळ भाजपला जाऊन मिळतो आहे आणि रामदास आठवले सारखे आंबेडकरवादी हे काळाची पावले ओळखून भाजपला व शिवसेनेला जाऊन मिळत आहेत ह्याला अपवाद केरळ हे राज्य होते पण अलीकडे   केरळमध्येही संघाचा आणि  भाजपचा प्रभाव वाढताना दिसतोय  आणि कम्युनिस्टांना संघाच्या ह्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटणे साहजिक आहे केरळ हे एकेकाळी वैदिक राज्य होते आणि तिथे ब्राह्मण आणि शूद्र असे  दोनच वर्ण होते त्यामुळेच ह्या कट्टर वर्णव्यवस्थेच्या समर्थक व्यवस्थेवर कम्युनिझम हाच उत्कृष्ट इलाज होता हा इलाज गेला तर पूर्वीचा कट्टर ब्राह्मण्यवाद उफाळून येणार नाही ह्याची खात्री काय ? त्यामुळे तिथे ह्या दोन विचारप्रणालीतील  संघर्ष हा निकराचा होणे अटळ आहे मात्र तो काहीकेल्या हिंसक बनता कामा नये   भाजपवादाला कम्युनिझम हा पर्याय नाही पण   केरळपुरता हा पर्याय  उगवलेला होता आणि आहे आणि तो हिंसक बनणे हे परिवर्तनवादी चळवळीला परवडणारे नाही .

कृष्णा किरवले हत्यासंदर्भात नक्की सत्य काय हे पुढे येईलच पण त्यांचे असे दुर्देवीपणे जाणे जिव्हारी लागते आहे . हे वैयक्तिक आर्थिक बाचाबाचीतून झाले असे क्षणभर गृहीत धरले तरी  ज्याने त्यांना मारले त्याला ते विचारवंत आहेत ह्या गोष्टीची कदर का वाटली नाही कि प्राध्यापक विचारवन्त लोकांची सामाजिक इज्जत संपली आहे ?

श्रीधर तिळवे नाईक

No comments:

Post a Comment