कृपया फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका जी यादी आहे तीच अनेक मातब्बरांना कट करत ८३६ वर आणलीये आणि ती ५०० वर आणतांना कुणाला कट करायचं कुणाला वगळायचं हे आता अवघड बनत चाललंय त्यात नवीन लोकांना कुठून जागा देणार ?हे अकाउंट फिल्मी लोकांसाठी बिलकुल नाहीये हे तर पुन्हा पुन्हा सांगितले आहेच त्यामुळे बॉलीवूडवाले असाल तर ह्या अकाउंटकडे बघूही नका हे फक्त साहित्यिक ऍक्टिव्हिटीसाठी सुरु केलेले प्रामुख्याने मराठी अकाउंट आहे इथल्या यादीत असलेल्या अपवादात्मक फिल्मी व्यक्ती ह्या मुळात प्रथम माझ्या मित्र आहेत काहींच्या आईबापांबद्दल आदर आहे म्हणून त्या आहेत काही अपवाद वगळता माझे ९९ % वैयक्तिक मित्रही आणि नातेवाईकही ह्या इथे नाहीत ज्यांच्याशी रोज फोनवर बोलता येते त्यांना फेसबुकवर भेटणे हा मला मूर्खपणा वाटतो पी आर ओ शीप आजच्या जगात महत्वाची गोष्ट आहे ह्याची मला कल्पना आहे आणि फेसबुक त्यासाठी उत्तम माध्यम आहे ह्याची मला कल्पना आहे पण संन्याश्यांनी ह्या भानगडीत पडू नये असे मला वाटते . साधनेला फेसबुकचा काडीचाही फायदा नाही त्यामुळे तुमच्यापैकी जे अध्यात्मिक आहेत त्यांनी थेट भेटावे किंवा ई-मेल करावा थिएटर अकादमीतल्या विद्यार्थ्यांनो तुम्हाला पेंडिंग ठेवलंय म्हणून माफी मागतो लवकरच निर्णय घेईन . काहींनी खांदे द्यायला कोण येणार असं विचारलंय मित्रांनो माझ्या मृत्यूनंतर देहदान करा हे मी सांगितलेले आहेच आणि जे उरेल ते विद्युतदाहिनीत जाळा हेही ! त्यामुळे खांदेकऱ्यांची गरज नाही . मी संन्यासी आहे धार्मिक नाही . मी आयुष्यात मिञफुगवटा कायमच टाळलाय इथेही तोच प्रयत्न आहे पुन्हा एकदा क्षमाप्रार्थी आहे
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment