Sunday, March 12, 2017

मोदीनंतर काय

कुणाला आवडो अगर न आवडो ११ व्या शतकानंतर बहुतांशी भारत  १८६० पर्यंत प्रोमुस्लिमवादी होता १८६० नंतर १९४७ पर्यंत प्रोख्रिस्चनवादी  होता १९४७ ते २०१३ तो सेक्युलरवादी होता आणि आता बहुतांशी हा देश हिंदुत्ववादी जवळ जवळ झालाच आहे  प्रश्न इतकाच आहे इतरत्र अनेक पाकिस्तानसारखे मुस्लिमबहुल देश जसे कट्टर मुस्लिमवादी झाले तसा तो कट्टर हिंदुत्ववादी होणार कि सौम्य हिंदुत्ववादी राहणार ? जर तो कट्टर हिंदुत्ववादी होऊ लागला तर आपण त्याला कसा आळा घालणार आहोत ?

ह्या देशात दोन प्रकारचे सांस्कृतिक विचारप्रणालीय  राष्ट्रवाद जन्माला आले १ हिंदुत्ववादी आणि दुसरा २ आंबेडकरवादी ह्या दोहोंच्या दरम्यान १९८५ नंतर शैव राष्ट्रवाद जन्मला ह्या शैव राष्ट्रवादाची मांडणी मी २००५ साली शैव पॅराडाईम आणि युरोपिअन पॅराडाइम ह्या अंगाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका चर्चासत्रात केली होती (ह्याचे एक विशाल पुस्तक झाले आहे ) ह्या देशातला मुख्य संघर्ष हा निगम विरुद्ध आगम असा आहे हे त्याचे मुख्य सूत्र आहे .  शैव , बौद्ध आणि जैन ह्या आगम मानणाऱ्या लोकांनी १  वैदिक  २ ब्राह्मण ३ वैष्णव  आणि  ४ वैष्णव हिंदू  ह्या जात वर्ण मानणाऱ्या निगमाविरुद्ध एकत्र यावे अशी ही मांडणी आहे पण प्रत्यक्षात झाले असे कि बौद्धांनी शैवांचा तिरस्कार आणि टवाळी करण्याखेरीज काहीच केले नाही आणि प्रामुख्याने ओ बी सी असणारे शैव हे हिंदुत्ववाद्यांना जाऊन मिळाले यूपीत ह्या शैवांनी प्रथम मायावतींना पाठिंबा दिला होता पण मायावतींनी ह्या पाठिंब्याची माती केली आता अवस्था अशी आहे कि ओबीसी शैव दलित नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत
नेमके ह्याचवेळी भाजपने नरेंद्र मोदी हे व्यापारी समुदायातून आलेले पण ओबीसी असलेले शैव नेतृत्व पुढे आणले आणि आमच्यासारख्या शैवाचार्यांची आणि ओव्हरऑल  शैव गुरवांची चांगलीच पंचाईत केली नकुलीशाचे शिष्य असणाऱ्या आणि गुजरातमध्ये एक प्रभावी पंथ असणाऱ्या शैव लकुलीश दर्शनाशी नरेंद्र मोदींचा गाढा संबंध आहे (ह्या कुळाच्या मंदिराचे उदघाटन त्यांच्याच हस्ते झाले होते ) तर शैव असणाऱ्या रामकृष्ण परमहंसाच्या रामकृष्ण मिशन आणि विवेकानंदावर त्यांची श्रद्धा आहे त्यामुळेच उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी सतत शैव मंदिरांना भेटी देत आणि त्याचा फार मोठा परिणाम शैव जनतेवर झालेला होता आणि आहे जोवर मोदी सत्तेवर आहेत तोवर भाजप कट्टर हिंदुत्ववादी बनणार नाही पण मोदींच्यानंतर काय ? कधीकाळी निगमांनी आद्य शंकराचार्य नावाचा शैव ब्राह्मण वापरून वर्णजातिव्यवस्था पुढे आणली होती नंतर पहिल्या बाजीरावापर्यंत शैव असणाऱ्या भट घराण्याला कट्टर वैदिक बनवून मनुवाद पुढे आणला होता मोदींच्यानंतर असे काहीच होणार नाही ह्याची खात्री काय ? नेमाडेंच्यासारखा वैयक्तिक पातळीवर पुरोगामी असणारा लेखकही शेवटी वैष्णव हिंदुवाद स्वीकारून जातीव्यवस्था अटळ आहे असे म्हणतो कारण निगमाचा विळखा ! हा विळखा भाजपला पडणार नाही ह्याची काय खात्री ? शेवटी गोळवलकरांच्या लिखाणात ह्या विळख्याचे समर्थन आहेच . त्या समर्थनाचा आणि विळख्याचा कमबॅक होणार नाही कश्यावरुन ? प्रश्न फक्त मोदींचा नाही तर मोदीनंतर काय होईल हाही आहे . ब्राह्मण आणि बनिया एकवेळ सौम्य राहतील पण शैव हे लडाकु आहेत त्यांचा देव आणि देवीची चंड आणि चंडिका होतात शैव मानसिक गुलामगिरीतून आता बाहेर येतायत आणि लढायला तयार आहेत तुम्ही दोन मारलात तर आम्ही चार मारू हे स्पिरिट त्यांच्यात आहे त्यांचे हे लडाकूपन जर मिसमॅनेज झाले तर ते कुणालाही परवडणारे नाही मी शैवाचार्य म्हणून त्यांना रोज पाहतोय ते भाजपला मत देतायत आणि मी भाजपचे समर्थन करावे अशी मागणीही करतात . ब्राह्मण , बनिया आणि ओबीसी अशी ही  युती आहे आंबेडकरांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यांना पूर्ण अमान्य आहे किंबहुना आंबेडकरवाद्याचा  आक्रमकपणा ( जो फेसबुकवरही प्रकट होतो ) हा त्यांना ३% टक्के मतदारांचा टिवटिवपणा वाटतो उरलेले  २२ %  दलित  - आदिवासी हे हिंदुत्ववादाला मिळतायत कारण ह्या  २२ % दलितांना  मुख्य हिंदू प्रवाहाशी समरस व्हायचे आहे असे त्यांना वाटते  लोकशाहीत आंबेडकरवादी दलितांची  फारशी किंमत आहे असे त्यांना वाटत नाही ५ % ब्राह्मण १७ % वैश्य  १० % समरसतावादी  दलित - आदिवासी आणि ४२ % ओबीसी ह्यांचे एकत्रित मतदान निवडणूक जिंकायला पुरेसे आहे ह्याची त्यांना खात्री पटलेली आहे आंबेडकरवादी दलितआदिवासी  आणि मुस्लिम मताविषयीची हे बेफिकीरी यूपीत
एकही मुस्लिम उमेदवार न देण्यात प्रकट झाली आणि तिला यशही मिळाले ह्या बेफिकीरीचे कट्टर हिंदुत्ववादात रूपांतर होणार नाही ह्याची खात्री काय ?

थोडक्यात सगळ्या विचारवंतांनी आता भाजप कट्टर होऊ नये म्हणून काय करता येईल ह्याचा साधकबाधक विचार करणे आवश्यक आहे



Avinash Gaikwad यांची कंमेंट ओबीसींना आंबेडकरवादी नेतृत्व नको असते तर मायावतीपासून सुशीलकुमार शिंदेंच्यापर्यंत अनेकांना नेतृत्व मिळालेच नसते आंबेडकरवादी नेतृत्व अपयशी झाले ही वस्तुस्थिती त्याची कठोर चिकित्सा करण्याऐवजी इतरांना जातीयवादी म्हणून सुटका करून घेणे ही तर फॅशन झाली आहे . ओबीसींनी ज्याचे नेतृत्व मानावे असा आंबेडकरवादी नेता सांगू शकशील काय ? आंबेडकरवादी कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहेत कि नाहीत  ? दलित नेतृत्वाची फाटाफूट ही माझ्यासाठी  अगम्य गोष्ट आहे

ओबीसी समूहात ब्राहमण क्षत्रिय वैश्य ह्यांच्याही काही जाती येतात आणि त्या बहुतांशी शैव आहेत शूद्रांच्यातील बहुतांश  जाती ह्या मूळच्या शैव आहेत तेव्हा तुला त्यांना मी शैव कॅटेगरीत टाकलंय ह्याचं तुला आश्चर्य वाटतंय ह्याचं मला आश्चर्य वाटतंय .
शैव आरेसला जाऊन मिळतात तेव्हा ते गुलाम बनतात ही जुनी गोष्ट झाली अविनाशराव ! भाजप हा बदललेल्या ब्राह्मणी मानसिकतेचा अविष्कार आहे नरेंद्र मोदी गुलाम आहेत असं म्हणायचय का तुला ?मला वाटतं कि हिंदुत्ववाद  हा कमालीचा गुंतागुंतीचा मामला बनलाय आणि तो आंबेडकरवादाच्या चौकटीत समजून घेणे आता शक्य नाही शत्रूशी लढायचे असेल तर शत्रू नीट समजून घ्यावा लागतो माझा प्रयत्न त्या दिशेने चालू आहे हा प्रयत्न इतरांना मानवावा अशी अपेक्षा नाहीये .

पोस्टचा संदर्भ यूपीची निवडणूक आहे त्यामुळे संदर्भ राजकीय आहे हे तर उघड आहे . माझ्या दृष्टीने भाजप हा
सर्व निगमांनी एकत्र येऊन तयार झालेला पर्याय आहे आणि खुद्द संघाला तो असे वळण घेईल असे अपेक्षित नसावे आपण अनेकदा आरेससला प्लानर म्हणून गृहीत धरतो .
एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाला एकच पर्याय होता आणि तो म्हणजे आंबेडकरवाद पण आंबेडकरवाद्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही त्यांनी स्वतःला दलितांच्यापुरतं आणि आदिवासींच्यापुरतं मर्यादित करून घेतलं आणि व्यवहार तर जातीयवादीच केला मी स्वतःला आयुष्यभर आंबेडकरवादी म्हणवून घेतले पण माझ्या जातीची सर्वाधीक चौकशी आंबेडकरवाद्यांनी केली आंबेडकरवाद्यांना ही गरज का भासते हा जातीय किडा का वळवळतो ?आणि हा फक्त माझाच नाही अनेकांचा अनुभव आहे माझ्या समोर अनेकांनी आंबेडकरवाद सोडला मी संन्यासी असल्याने मला अपेक्षाच नाही पण इतरांचे तसे न्हवते नाहीये माणसांना प्रतिसाद लागतो . आनंद यादव हे ह्याचे उत्तम उदाहरण रिपब्लिकन पार्टीचे गैरदलित अध्यक्ष किती हे मला सांगशील का ? हिंदुत्ववाद्यांचा सर्वसामावेशकपणा वाढत असतांना आंबेडकरवाद अधिकाधिक संकुचित होत गेला. ह्या देशात समाजवाद आणि साम्यवाद ह्यांना कधीच भविष्य न्हवते पण आंबेडकरवाद्यांना  मात्र होते पण खुद्द आंबेड्करवाद्यांनीच ह्या भविष्यावर माती टाकली ह्यापुढे ओबीसी आंबेड्करवादाकडे परतणे शक्य नाही खरेतर हे योग्य नव्हे कारण ओबीसी ही कॅटेगरी बाबासाहेबांनी दिलीये पण ओबीसींच्याच्याच हे गावी नाही हे दोन एकत्र यावेत म्हणून मी आगमवाद मांडला होता पण त्याला दोन्ही बाजूचा प्रतिसाद शून्य आहे एकीकडे मराठ्यांचा मराठावाद आणि वैदिक ब्राह्मण वैष्णव आणि वैष्णव हिंदू ह्यांचा मोदीप्रणित हिंदुत्ववाद ह्यांच्या कचाट्यात दलित चळवळ सापडली जाणे अटळ आहे .



*******************************************
गोवा यूपी मधील मुख्यामंत्रीपद , शैव धम्म  , भाजप आणि काँग्रेस

मी मागील पोस्टमध्ये निगमांनी मोदी सारख्या शैवाला पुढे टाकून आमच्यासारख्या आगमी लोकांच्या  केलेल्या  पंचाइतींबद्दल बोललो होतो शैव हा धम्म आदीशैव सांख्यशैव करत हिन्दुशैव पर्यंत पोहचला ह्या हिन्दुशैवची शंकराचार्यांनी कशी निर्मिती केली आणि पुढे ती शैव न राहता कशी वैष्णव बनवली गेली ह्याची सविस्तर चर्चाही मी ह्यापूर्वी दहा लेख लिहून केली होती

ज्यावेळेला शंकराचार्य हिन्दुशैव धर्म स्थापन करत होते त्याचकाळात मच्छिन्द्रनाथ आणि गोरखनाथ आदिनाथ म्हणजेच भगवान शिव ह्यांनी स्थापन केलेल्या योगकुळाला नवे जीवन देत होते आणि ह्यातूनच नाथशैव हा आणखी एक शैवपंथ निर्माण झाला . उत्तरेत मुसलमानांना सौम्य बनवण्यात ह्यांचा वाटा प्रचंड मराठीत हा पंथ स्थिर केला निवृत्तीनाथांनी पुढे त्यांचाच भाऊ ज्ञानेश्वर  वैष्णवांना जाऊन मिळाला आणि हरिहर एक करण्याचा सिलसिला सुरु झाला आणि त्याने हिन्दुशैवला हिंदूवैष्णव बनवणे सुरु केले ह्यातूनच मुस्लिमशैव व मुस्लिमवैश्णव नावाचा एक नवा फीनॉमिना जन्मला सुफी आणि शैव सुफी आणि वैष्णव ह्यांचे जबरदस्त कॉम्बिनेशन सुरु झाले आणि त्यातून कबीर आणि नानक असे महान संत जन्मले मराठीत हे कॉम्बिनेशन अवतरले ते एकनाथांचे गुरु जनार्दन ह्यांच्यात जनार्दनांचे काही शिष्य तर चक्क अरबी होते .

उत्तरेत गोरखनाथांच्या मठांनी ह्या मुस्लिमशैव मताला कायमच सांभाळून घेतले आणि महाराष्ट्रातही साईबाबांनी मुस्लिम शैववादाला मजबुतीच दिली ह्याला तडे जायाला लागले ते १९७५ नंतर !१९७५ नंतर ख्रिश्चन लोकांनी सगळा ईस्ट इंडिया ख्रिश्चन बनवण्याचे मिशन सुरु केले आणि कमालीचे यश मिळवले भारतातल्या पुरोगामी आणि सेक्युलर लोकांनी धर्मांतर हा व्यक्तिगत मुद्दा आहे असा सेक्युलर स्टॅन्ड घेतला दक्षिणेत गोवा ३० % ख्रिस्चन झालाच होता तो ४० % ख्रिश्चन झाला आणि किमान ५० % गोवा ख्रिश्चन बनवण्याचे प्लॅनींग सुरु आहे ह्याला विरोध करण्याऐवजी काँग्रेसने सेक्युलॅरिज्मच्या  नावाखाली गोव्याच्या ख्रिश्चनीकरणाला उत्तेजन द्यायला सुरवात केली जाणीवपूर्वक कोंकणी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण केला ह्यातच काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधींच्याकडे गेले ह्या काळात झोपलेल्या शैव आचार्यांनी आणि गुरवांनी काही कृतीच केली नाही आणि ह्याचा पुरेपूर फायदा घेत गोव्यातला ब्राह्मणांनी संघटित व्हायला सुरवात केली ह्यातून एकीकडे सनातन धर्म ही संघटना सशक्त  झाली तर दुसरीकडे भाजप सशक्तीकरण मोहीम सुरु झाली . सोनिया गांधी ह्या रोमन कॅथलिक धर्माच्या हस्तक आहेत असा अपप्रचार सुरु झाला . नेमकी ह्याचवेळी माझ्या मामाने म्हणजे माजी आमदार रोहिदास नाईक ह्यांनी आपला शिष्य सुदिन ढवळीकर ह्याला मगोपमध्ये पुढे आणायला सुरवात केली . ढवळीकरांनी मगोप उत्तम सांभाळला खरा पण काँग्रेस ही ख्रिश्च्नांची पार्टी बनत आहे हे त्यांच्या लक्ष्यात आले नाही मगोप हा कायमच बहुजनांचा पक्ष होता आणि बहुजनांच्यात ख्रिश्च्नांच्या आक्रमकतेबद्दल एक अस्वस्थता दाटलेली आहे हे लक्ष्यात घेण्याची जबाबदारी मगोपची होती पण मगोपने ही जबाबदारी पार पाडली नाही आणि ह्या अस्वस्थतेचा पुरेपूर फायदा घ्यायला भाजपने सुरवात केली भाजप हा पर्याय पुढे आल्याने ढवळीकरांचे मगोपचे पुनर्जीवन हे फक्त स्वप्न बनून राहिले मगोप आणि काँग्रेस द्विध्रुवीकरण जाऊन  भाजप आणि   काँग्रेस हे द्विध्रुवीकरण आले ब्राह्मणकेंद्री शैव ओबीसीवाद विरुद्ध ख्रिश्चनकेंद्री सेक्युलरवाद असे ह्या द्विध्रुवीकरणाचे स्वरूप आहे हे लक्ष्यात येताच ढवळीकरांनी उघडपणे सनातन संस्थेची पाठराखण करायला सुरवात केली आणि ह्याविरुद्ध बंड होऊन  खुद्द माझ्याच घरात फूट पडली आणि माझा पुतण्या सुरेल तिळवे हा आपचे तिकीट घेऊन ढवळीकरांच्याविरुद्ध उभा राहिला घरातच मते विभागली गेली कारण गेली साठ वर्षे सिंहावर शिक्का मारायची असलेली सवय सुटणार कशी ?आत्तापर्यंत मगोपच्या  सिंहाला एकगठठा मतदान करणारी तिळवे नाईक फॅमिली प्रथमच फुटली ढवळीकर सनातनी मते आणि बहुजनी मते घेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी झाले पण मगोपला दुसरी भाजप बनवण्याचे आणि मुख्यमंत्रीपद हासील करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र हवेत विरून गेले मग निवड करायची वेळ आली काँग्रेस सुधारली असे वाटत असतानाच सोनिया गांधींनी लुईझिनहोच नाव मुख्यमंत्रीपदी आणलं झालं हे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं होतं त्यामुळे हिंदू मुख्यमंत्री विरुद्ध ख्रिश्चन मुख्यमंत्री असे काही समीकरण समोर आले आणि सगळे हिंदू परीकरांच्या मागे गेले वास्तविक आपली ख्रिश्चनवादी इमेज सुधारण्याची काँग्रेसला ही चांगली संधी होती प्रतापसिंग राणेंचे वा इतर कुणा हिंदू आमदाराचे नाव पुढे आणले गेले असते तर काँग्रेसचे सरकार आले असते पण एकंदरच काँग्रेस नेतृत्वाला जमिनीवर पाय ठेवायची सवय राहिलेली नाही परिणामी गोव्यात पर्रीकर

यूपीत लढाई झाली ती मुस्लिमधार्जिणेपणा आणि हिंदूधार्जिणेपणा ह्यांच्यात ! विकासाचा मुद्दा दोन्हीकडे समान होता त्यामुळे तिथे सेक्युलर मते समान प्रमाणात गेली आणि धार्मिक मते एकगठठा भाजपला गेली आणि त्याचे श्रेय योगी आदित्यनाथ ह्यांचे होते गोरखनाथांच्या मठाचे हे प्रमुख ! हर हर महादेव म्हणत त्यांनी सगळे शैव युवक ह्या मठाच्या झेंड्याखाली एकत्र आणायला सुरवात केली एकेकाळी बौद्ध झालेल्या भारताला शंकराचार्यांनी हिन्दुशैव धर्माची स्थापना करून पुन्हा स्वतःच्या घरात आणले तसे आपण मुस्लिम ख्रिश्चन धर्मांतराला आळा घालत आहोत हा सुरवातीचा दावा पुढे घरवापसी आंदोलनापर्यंत पोहचला . एकेकाळी सगळा भारत बौद्धमय करीन अशी आकांक्षा बाबासाहेबांनी बाळगली होती आदित्यनाथ उलट्या दिशेने गेले आणि सगळा भारत हिंदुराष्ट्र करीन म्हणत ऍक्टिव्ह झाले शैवांच्यात मठप्रमुख कोणीही होऊ शकतो( हे माहित नसल्याने कर्नाटकात बसवेश्वर दलित होते अशी मांडणी पुढे येताच त्याला विरोध झाला वास्तविक शैवांच्यात कोणीही शैवाचार्य होऊ शकतो खुद्द बसवेश्वरांचे गुरु अस्पृश्य शैवाचार्य होते आणि बसवेश्वरांना त्यामुळे काहीही फरक पडला न्हवता ज्याने शैव आगम अवगत केलेत तो शैवाचार्य अशी साधी सरळ व्याख्या आहे गुरु अस्पृश्य शैवाचार्य आणि शिष्य ब्राह्मण शैवाचार्य हे वैदिकांनाच का बौध्दानांही डायजेस्ट होत नाही  ) त्यामुळे गढवाली राजपूत असूनही ते मठप्रमुख झाले त्यामुळे ब्राह्मण्याचा शिक्का त्यांच्यावर मानणे शक्यच नाही सगळा बहुजन ओबीसी वर्ग त्यांच्याकडे सरकला प्रश्न होता आदित्यनाथांना सांभाळून विकासाचा कार्यक्रम पुढे कसा न्यायचा ? त्यातून धर्मवादी मुख्यमंत्री आणि दोन विकासवादी उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुढे आणला गेला म्हणजे दोन्ही प्रकारचे व्होटिंग शाबूत ठेवून पुढची इलेक्शन जिंकण्याची ही नीती आहे परिणामी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री ! संघही खुश आणि मोदीही खुश ! परीकरांच्याबाबत तर दोघांचीही एकवाक्यता !

तर झाले ते असे आहे . प्रश्न आहे भाजपच्या ह्या रणनीतीचा सामना कसा करायचा ? ब्राम्हण क्षत्रिय वैश्य ओबीसीम्हणजे  ७० %  पैकी ६०% भाजपकडे २६ % पैकी १६ % दलित आदिवासी व१५ - २०% मुस्लिमांपैकी पैकी ७%  मुस्लिम अशी २३ % मायावतीकडे  ह्यातील ५० % मते विकासवादी तर ५०% धर्मवादी मते आहेत  आदित्यनाथ हे ह्या ५०% धर्मवादी मतांची केली गेलेली राजकीय कदर आहे ही कदर भारतीय राजकारणाला रसातळाला न्हेते कि राजकारणाला उंचावते हे येणारा काळच ठरवेल
श्रीधर तिळवे नाईक






















No comments:

Post a Comment